"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, November 18, 2010

ठसे - क्रमशः ३



५. गोष्ट आहे २६ जुलै च्या अतिवृष्टीनंतरची. सगळीकडेच मुसळधार पाऊस झाला होता. मुंबईसह महाड, पोलादपूर इथे धुवांधार पावसाने अतोनात नुकसान केले होते. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’ कामाला लागली होती. आमच्याकडे निधी संकलनाचे काम आले. मी आणि माझा कल्याणातील किरण म्हणून स्वयंसेवक बंधू- आम्ही दादरमधील काही इमारतींमध्ये जायचे निश्चित केले. बरोबर माहिती पत्रक व पावती पुस्तक होते. एरवी निधी संकलनाला काही न्यूनतम मर्यादा नसते. स्वेच्छेने एक रुपयापासून ते कितीही. पण तत्कालीन निकड पाहता किमान ५० रुपयाच्यावर निधी घेऊन पावती द्यावी असे ठरले. अंदाज घेऊन १० रुपयांच्यावर रकमेला पावती दिली तरी चालेल असे आम्ही ठरवले.

संघ कार्यालयाजवळीलच एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर गेलो. बेल वाजवूनही वाजवीपेक्षा जास्त वेळ गेला तरी आतून कोणी येईना म्हणून आम्ही पत्रक सरकवले व वर गेलो. वरून इतर घरे पूर्ण करून खाली जिना उतरत असताना त्याच दरवाज्यातून आम्हाला शुकशुक् करून बोलावले गेले. आतून काम करणाऱ्या एक मोलकरीण बाई बाहेर आल्या. आम्हाला म्हणाल्या, “अहो घरी कोणीच नाही म्हणून मगाशी दार उघडले नाही. पण पत्रक वाचलं. मी काही मदत करू शकते का?” झालं, आता आमचं धोरण ठरलं होतं किमान निधीचं. पण परिस्थिती अशी, की कसली न्यूनतम रक्कम आणि काय. आम्ही दोघंही जवळपास एकदमच म्हणालो, “अहो जेवढं शक्य असेल तेवढं द्या”. आम्ही विवंचनेत ‘आता पावतीचं कसं करायचं’.. त्या आत गेल्या आणि शंभराची एक नोट त्यांनी आम्हाला दिली. आश्चर्यचकित आम्ही, त्यांचे नाव विचारले पावतीवर टाकण्यासाठी, तर आम्हाला अजून धक्का देत त्या म्हणाल्या, “पावती नको. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाव आहे ना!”. आम्ही कसली पावती देतो, आम्हालाच पावती मिळाली होती! पक्क्या झालेल्या त्या ठशाकडे आम्ही अवाक् होऊन पाहत होतो!


६. नागपूर ला दरवर्षी तृतीय संघ शिक्षा वर्ग होतो. २०१० सालच्या तृतीय वर्षाच्या वर्गात शिक्षार्थी म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले होते. त्याबद्दल विस्ताराने मी लिहिलेच आहे. त्यातलीच एक साठवण.

आमच्या गणात २२ जण होते. त्यातल्या आसामहून आलेल्या कुमुद हलोई चे आणि माझे छानच जुळले. त्याला कारणही तसंच होतं. एकदा हा पिवळे द्रावण असलेली बाटली घेऊन चालला होता. मधेच पीत होता. मी विचारलं काय आहे? म्हणाला, “दवाई है |” मी रोखून पाहिलं आणि म्हटलं, “मैं समझ गया तेरी दवाई..छास में तुम बचाया हुआ गुड मिलाकर घुम रहे हो |” जेवणाच्या वेळी मिळणारे ताक बाटलीत भरून त्यात कधीतरी मिळणारे साठवलेले गूळ घालून एक न ओळखता येणाऱ्या रंगाचे द्रावण बनवले होते. कोणी पिऊ नये म्हणून ‘दवाई’ ही बतावणी. सगळेजण “अच्छा, ठीक है |” असं म्हणून पुढे जात असत. पण  मी सांगितलं आणि मला मागूनच घेतलं चव बघायला. मग तिथपासून आमची घट्ट मैत्री सुरु झाली. त्याने आणलेलं एकशिंगी गेंड्याच्या शिंगाच्या आकाराचे वाद्य वाजविणे, एकमेकांची मजा-मस्करी, जेवताना एकत्र, वाढप करताना एकत्र असं चालू होतं.

जायच्या आदल्या दिवशी हा माझ्याजवळ आला आणि एक गडद जांभळ्या रंगाचा रुमाल देत म्हणाला, “ये मेरी याद में | दो ही लाये थे | सबसे अच्छी दोस्ती जिनसे होगी उनके लिये |” आसाम प्रांतातला कुमुद आणि कोंकण प्रांतातला मी..त्या गडद रंगाच्या घट्ट विणलेल्या आसामी रुमालापेक्षा अधिक घट्ट वीण अनुभवत होतो..

समाप्त .

7 comments:

  1. wa chhan.. yatla pahila anubhav chatka lavnara ahe. javaljaval eka diwsachya eka gharchya bhandyanchya dhigache 10 rupaye miltat. keval vishvasavar 100 mhanje tu sonyacha mungus zala asnar :))

    ReplyDelete
  2. vikram,
    mala tuza heva vatato itak chan chan lihitos sarvach velela pratikriya det nahi.uttam asach lihita raha. aajach kuldeep purandare yacha lagnala punyala gelo hoto, yetana sahaj tuzi aathavan zali. kiti divsat tuzyashi sampark sadhala nahi yachi janeev zali, vibhaschya nimittane sampark karat hoto to svarth hota ka? asahi manat ala. kssamasva! vibhas sadhya suttcha ikade alibagla ahe. 22 pasoon collage suru hoeel.mala tuze sarva number kalav mazya cellmadhala contact data corrupt zala ahe.

    ReplyDelete
  3. @ Anamika, @ let's chat the new ideas -

    Thanks for reading, enjoying and commenting. Visit blog, Stay connected...

    ReplyDelete
  4. @ Uday ji -
    उदय जी असा विचार चुकूनही करू नका. विभास दादरमध्ये असतानाचे दिवस आनंदात गेले. आपल्याला कृत्रिम संपर्काची गरज नाही.
    मी मधे एकदा कॉलेजवर भेटलो त्याला. परत भेट होत राहीलच आमची.
    तुम्हाला ब्लॉग आवडला हे वाचून आनंद झाला. बरं वाटलं.
    वाचत रहा आणि प्रतिक्रियाही देत रहा.

    ReplyDelete
  5. तीनही ठसे वाचले! फार हृद्य लिहिलं आहेस, आवडलं!!! अनेक अनेक अनेक शुभेच्छा!

    ReplyDelete