Sunday, October 16, 2011
अपघात, मदत आणि कायदा...
Saturday, December 18, 2010
व्यथा धनगरवाडीची ...
Sunday, October 3, 2010
प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः
चिरविजयाच्या संकल्पाने हृदये काठोकाठ भरू | मातृभूमीच्या दिग्विजयाची सुप्त मनीषा पूर्ण करू ||
संदर्भ:- www.ekal.org, http://www.causes.com/causes/2781, http://www.youtube.com/watch?v=QFlaCRXoMJA, http://www.youtube.com/watch?v=CzMSBhLPO2Q&feature=related
Wednesday, February 10, 2010
एकात्मतेचे शिवधनुष्य....आणि सर्वांचा गोवर्धन!
Thursday, January 21, 2010
'गोल्डमोहर' मधील आग आणि ....
छताचे लाकडी वासे, लाकडी खिडक्या ह्यांनी पेट घेतला होता. अग्निशमन दलाचे बंब आले होते आणि पाईप्स जोडून ते पुढेपर्यंत नेण्याचे काम करायचे होते. एकमेकांत गुंतलेले पाईप्स सोडवून होल्डर मध्ये ते अडकवत पुढे न्यायचे होते. आधी ओरडणारे, हुकूम सोडणारे आणि आतमध्ये आधीपासून असणार्या काही कर्मचार्यांवर खेकसून मध्ये न येण्याचे दरडावणारे अग्निशमन दलाचे अधिकारी बघून भीती वाटली की हे आपल्याला बाहेर तर घालवणार नाहीत! परंतु आम्ही स्वाभाविकपणे दिसणारे काम करायला सुरुवात केली आणि आधी इतरांना पाईपला हात लावू नका असे सांगणारे अधिकारी आम्हाला मात्र स्मितहास्याने स्वीकारत असल्याची खात्री झाली.



Friday, October 9, 2009
वनवासी कल्याण आश्रम
आधी या समाजाला 'आदिवासी' म्हणणेच चूक आहे. कोण आधी कोण नंतर राहावयास आले, असा विचार केला तर मग शहरातीलही बरेचजण 'आदिवासी' होतील! म्हणूनच शहरवासी, ग्रामवासी ह्याप्रमाणे वनात राहणारे ते 'वनवासी'. त्यामुळे 'आदिवासी' या शब्दाऐवजी 'वनवासी' शब्दच आपण वापरला पाहिजे. जेव्हा या वनवासी बांधवांचा विकास होईल तेव्हा समग्र समाजाच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वाच्या जवळ जाईल, कारण हा समाज पोहोचायला खूप कठीण आहे आणि म्हणून अंतिम घटकांपैकी एक आहे.
वनवासी हे निसर्गपूजक आहेत. वृक्ष, नाग, सूर्य, नदी ह्यांना ते देवता मानतात. त्यादृष्टीने ते पूर्णपणे हिंदूच आहेत. परंतु ’तुम्ही हिंदू आहात’ असं जाणीवपूर्वक सांगायला कोणी गेलं नव्हतं. जेव्हा ख्रिश्चन मिशनरी या देशात आले आणि आपले सावज शोधू लागले तेव्हा हे वनवासी त्यांच्या नजरेतून सुटले असते तरच नवल! त्यांनी वनवासी बांधवांना सुविधा देऊ केल्या व बदल्यात ख्रिश्चन मत त्यांच्यावर लादले.
अशाप्रकारचे दुर्भाग्यपूर्ण मतपरिवर्तन सुरु असतानाच बाळासाहेब देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून मध्य प्रदेशात काम करत होते. त्यांना जो प्रदेश दिला होता त्यातील जशपूर या ठिकाणी अशी उपासना पद्धतीची चाललेली विक्री त्यांनी हेरली. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची स्थापना १९५२ साली केली. वनवासी बंधूंची उन्नती आणि त्यांची मूळ उपासनापद्धती टिकवून ठेवणे ही आव्हाने समोर ठेवून वनवासी कल्याण आश्रम कामाला लागली. या कामी त्यांना जशपूरच्या राष्ट्रीय दृष्टिकोण असलेल्या महाराजांचे फार सहकार्य झाले.
हळुहळू आश्रमाचे कार्यक्षेत्र वाढू लागले. समाजातील सज्जनशक्तीचे सहकार्य लाभू लागले. आणि वनवासी कल्याण आश्रमाने एका नव्या पहाटेची निश्चिती केली. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, प्रचारक, व.क.आ चे कार्यकर्ते या सर्वांमुळे आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशभरातील दुर्गम भागांमध्ये काम सुरु आहे. त्याचे संख्यात्मक विवरण पुढे दिले आहे. सद्यस्थितीत ३१५ हून अधिक जिल्ह्यांत , १०,००० हून अधिक ठिकाणी आश्रमाचे काम सुरु आहे. यात शेकडो पूर्णवेळ कार्यकर्ते समर्पित वृत्तीने काम करत आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्रात पुढील प्रमाणे काम सुरु आहे-
शैक्षणिक प्रकल्प-वसतिगृहे - १९, प्राथमिक शाळा - २, माध्यमिक शाळा - २, बाल संस्कार केंद्रे - १२
लाभार्थी - १,६००
आर्थिक विकास प्रकल्प-औद्योगिक शिक्षण केंद्र - २८, शेतकी प्रकल्प - ४, बचत गट - ५५८
लाभार्थी - १६,०००
आरोग्य प्रकल्प-साप्ताहिक आरोग्य केंद्रे - ४, दैनिक केंद्रे - १, आरोग्य रक्षक - ५८६
लाभार्थी - ४,००,०००
खेलकूद केंद्रे - १५
श्रद्धा जागरण केंद्रे - ६०
एकूण प्रकल्प १,१२३
पूर्णवेळ कार्यकर्ते ८१ - ६५ पुरुष, १६ महिला.
वनवासी कल्याण आश्रमाला सहकार्य करण्यासाठी आपण या लेखाला प्रतिसाद देऊ शकता.

Sunday, October 4, 2009
'सेवाभारती'चे अभिनंदन!

तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे याही भागात पक्षांच्या आणि त्यांच्या मान्यवर नेत्यांच्या सभा ठरल्या होत्या. परंतु त्या सर्व त्या सर्वांनी रद्द केल्या आहेत. हे योग्यच झाले. आधीच पिचलेल्या जनतेला अजून का पिडायचे! परंतु चिंतनीय बाब ही आहे की, एकाही नेत्याला या भागाला भेट द्यावी आणि तेथे काही आपात्कालीन सेवा-व्यवस्था सुरु करावी असे अजून तरी वाटलेले नाही. महाराष्ट्राची, मराठीची चिंता वाटणारे, केंद्रात मंत्रिपदे भूषविणारे, खासदार असलेले, उभे असलेले, बसून असलेले अशा कोणाच नेत्याला चिंता वाटू नये?
गडगंज संपत्ती सांभाळणारे हे सर्व वेगळाच 'पूर' वाहवण्याच्या चिंतेत आहेत. ते असो. चालायचेच. पण मुंबईत २६ जुलै ला झालेल्या अतिवृष्टीमध्ये आम्ही केलेले काम आठवले. प्रत्यक्ष मदत व नंतर निधी संकलन हे सर्व रा.स्व.संघाच्या प्रेरणेतून केले होते त्याची संस्मरणीय आठवण झाली. आताही अपवाद म्हणून की काय किंवा स्वाभाविक म्हणून की काय, 'सेवाभारती' ही संघ प्रेरणेतून चालणारी संस्था कामाला लागली सुद्धा आहे। नि:स्वार्थ भावनेने आणि राजकीय फायदा नसताना निरलसपणे काम करत राहणाऱ्या अशा संस्था जेवढ्या अधिक बलिष्ठ होतील तेवढेच अधिक समाजकार्य होईल!


