"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, June 19, 2011

सावधान! 'लव्ह जिहाद'...

प्रेम ही एक दैवी गोष्ट आहे. ते कधी कुठे कसं निर्माण होईल कोणीच सांगू शकत नाही. प्रेमाला भाषेची, प्रांताची, जातीचीही गरज नसते. या सर्वांसकट अथवा या सर्वांशिवायही प्रेम होऊ शकते. मुक्यांचेही प्रेम एकएकमेकांवर असते आणि अंधसुद्धा आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा भाषा, प्रांत, जाती, धर्म, आहार-विहार या पलिकडे प्रेम आहे.


पण ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असं सांगणाऱ्या भारतामध्ये मात्र एक भयानक परिस्थिती उद्भवली आहे. इथल्या हिंदू समाजाला येनकेनप्रकारेण फोडण्याचे, संघटित होऊ न देण्याचे आणि धर्मांतरित करण्याचे प्रयत्न शतकानुशतके चालत आलेले आहेत. बळाचा, दडपशाहीचा वापर करून आणि त्यासाठी राजसत्तेचा वापर करून केलेले धर्मांतरण आपण इस्लामी/मोगल काळात अनुभवले आहे. जिझिया कर, मूर्तिभंजन, जोहार आणि हिंदू स्त्रियांनी भरलेला जनानखाना. पुढे इंग्रज राजवटीतसुद्धा बळजोरीने केलेले धर्मांतरण इतिहासात नोंदले गेले आहे, भले ते शिकविले जात नसेल किंवा नजरेस न पडण्याची काळजी सरकार घेत असेल तरी. गोव्यात सेंट (?) झेविअरने केलेले मनुष्यतेला लाजवतील असे अत्याचार आणि केरळ च्या किनाऱ्यावर झालेल्या नृशंस हत्या. पूर्वांचलात (मिझोरम, अरुणाचल प्रदेश, नागाभूमी, त्रिपुरा इ.) तिथल्या जनजातींवर आपली प्रार्थनापद्धत लादायची आणि तुम्हाला मुक्तिसाठी अन्य मार्ग नाही असे सांगायचे. हा धर्मांतरणाचा प्रश्न खूप मोठा आणि विविध पैलू असलेला आहे. लेखनसीमेस्तव इथे सध्याच्या एका ज्वलंत परंतु आपल्याला अपरिचित अशा प्रश्नाचा उहापोह केला आहे. हा ‘विचारप्रवाह’ अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवाल या विश्वासाने लिहितो आहे.


केरळ हे तसे शांत, सुशिक्षित, निसर्गरम्य राज्य. पण तिथे एक विषवल्ली फोफावू पाहतेय हे कोणाच्या ध्यानातही येणार नाही. संपूर्ण भारतभर एक सुप्त आणि घातक चळवळ सुरु केली गेली आहे. तिचं नाव आहे “लव्ह जिहाद” अथवा “रोमियो जिहाद”. आणि तिचे अनेक यशस्वी(!) प्रयोग केरळच्या भूमीत झालेत आणि देशभरात त्याचे अनुकरण सुरु आहे.


काय आहे ही चळवळ?                                                                                   
केरळमधल्या महाविद्यालयीन तरुणींना (केवळ मुस्लिमेतर) परिचित करून घ्यायचे, मैत्री वाढवायची, आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्या धर्मावर टीका करत राहायची आणि इस्लामचे उदात्तीकरण करायचे, त्यांना त्यांच्या कुटुंबापासून फूस लावून तोडायचे, आणि मग त्यांना धर्मगुरू कडे नेऊन धर्मांतरित करायचे, स्वखुषीने लग्न केल्याचे भासवायचे (कागदावर सह्या घेऊन), एकदा शरीरसबंध झाला की सोडून द्यायचे. या कामाचे रीतसर पैसे, दुचाकी आणि अन्य भेटवस्तू घ्यायच्या आणि पुढील मुस्लिमेतर मुली शोधायला कॉलेज कॅम्पस वर चकरा मारायच्या. अशाप्रकारे हळूहळू मुस्लिम जनसंख्या वाढवत न्यायची. ही चळवळ “लव्ह जिहाद” अथवा “रोमियो जिहाद” या नावाने पोलीस, गुप्तहेर खाते आणि याकामाशी परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते, संशोधक, यातील न्यायालयीन कामकाजाशी सबंधित न्यायमूर्ती व वकील आणि काही पत्रकार यात सुपरिचित आहे. परंतु आम जनतेला अजून याचा सुगावा लागलेला नाही. ‘जिहाद’ च परंतु एक नवीन रूप घेऊन पुढे आला आहे.

शेहान शा आणि सिराजुद्दीन विरुद्ध केरळ राज्य
ह्या दाव्यामुळे बरेचसे चित्र स्पष्ट होण्यास मदत झाली आहे. यातील आरोपी शेहान शा आणि सिराजुद्दीन यांची वये अनुक्रमे २३ वर्षे आणि २७ वर्षे आहेत. ह्या दाव्यातील एका निकालात न्यायमूर्ती श्री. के. टी. शंकरन् ह्यांनी विशेष आस्था दाखवत प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ प्रस्तुतचा दावा निकालात काढून स्वस्थ बसण्याकडे त्यांचा कल दिसून येत नाही. मूळ समस्येची खोली जाणून घेऊन त्यांनी प्रस्तुतचे निकालपत्र दिले आहे. हे निकालपत्र मी खाली जोडले आहे. त्यात सर्व कथानक/घटनाक्रम त्यांनी व्यवस्थित दिला आहे.
प्रस्तुतच्या दाव्याचे कथानक असे – २ मुली, ज्यांची ओळख गुप्त राहावी म्हणून न्यायालयाने त्यांचा उल्लेख ‘हिंदू मुलगी’ आणि ‘ख्रिश्चन मुलगी’ असाच केला आहे, एम्.बी.ए. शिकत असलेल्या, आपसात मैत्रिणी असलेल्या. शेहान हा त्यांचा सिनिअर, पण कॉलेजने काही कारणाने काढून टाकलेला. त्याने मैत्री प्रस्थापित केली हिंदू मुलीशी. लगेचच तो हिंदू धर्माविषयी वाईट बोलू लागला, टीका करू लागला. घरी गेल्यावर शेहान ची आईसुद्धा हिंदू धर्मावर टीका करत असे. शेहान ने आता इस्लाम मधे धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली, आणि असे न केल्यास आपली मैत्री संपेल असे सांगितले. दुसऱ्या मैत्रिणीला (ख्रिश्चन मुलगी) असंच सांगून दोन्ही मुलींना आपले घर सोडण्यासाठी फूस लावण्यात आली. एका पहाटे ३ वाजता ठरल्याप्रमाणे दोन्ही मुली आपापल्या घराबाहेर आल्या आणि त्यांना एका स्कॉर्पिओत घालून एर्नाकुलम् ला नेण्यात आले. आत आधीपासून बसलेल्या अन्य दोन महिलांप्रमाणेच या मुलींनाही बुरखा घालण्याची सक्ती करण्यात आली. गाडीत केरळमधल्या ‘पॉप्युलर फ्रंट’ या राजकीय संघटनेच्या सीडीज लावण्यात आल्या होत्या. एर्नाकुलम् ला एका जागेत त्यांना नेण्यात आल्यावर तिथून घरच्यांशी संपर्क साधून देण्यात आला आणि ‘आम्ही पोन्नानी नावाच्या ठिकाणी इस्लाम स्वीकारण्यास जात आहोत’ असे सांगण्यास लावण्यात आले. दुसऱ्या दिवसी खदीजा नामक एका महिलेने दोन्ही मुलींना लॅन्सर गाडीत घालून मलप्पुरम ला हनीफा हाजी च्या घरी नेले. १० मिनिटातच त्यांना कोंडोट्टी मधे दुसऱ्याच एका घरात नेले. तेथे २ आठवडे राहिल्यावर पुन्हा हनीफा हाजीच्या घरी २ आठवडे ठेवण्यात आले. हा सर्व काळ ‘पॉप्युलर फ्रंट’ चे सदस्य सतत भेट देत होते.
‘ख्रिश्चन मुली’चे कोणाशीच प्रेमसंबंध नव्हते. तिला अनेकांना ‘दाखवण्यात’ आले. मग लग्नाबद्दल विचारण्यात आले. पण दोन्ही मुलींना हा सुगावा लागला की त्यांना लग्न करून बंगलोर ला नेण्यात येणार आहे आणि तिथे दुसऱ्याच कोणाला देऊन टाकण्यात येणार आहे. शेवटी शेहान ने आपला मित्र सिराजुद्दीन (प्रस्तुत दाव्यातील आरोपी क्र. २), जो कर्नाटक राज्य परिवहन सेवेत कंडक्टर आहे, याला बोलावून घेतले. मध्यंतरीच्या काळात मुलींच्या घरच्यांनी ‘हेबिअस कॉर्पस्’ चा रिट पिटीशन दाखल केला. शेहान आणि सिराजुद्दीन दोन्ही मुलींना घेऊन कालिकत ला वकिलाकडे गेले व तिथे लग्न करायला तयार असल्याच्या करारावर सह्या करायला लावण्यात आल्या. तिथून पुन्हा हनीफा हाजीच्या घरी. रात्री शेहान व हिंदू मुलगी एकत्र राहिले आणि सिराजुद्दीन व ख्रिश्चन मुलगी एकत्र राहिले. सिराजुद्दीन ने ख्रिश्चन मुलीला अनैसर्गिक संभोगास भाग पाडले, ज्याबद्दल त्याच्यावर भा.दं.वि. ३७७ कलम लावण्यात आले आहे.
कोर्टासमोर हजर झाल्यावर मुली पालकांसोबत जायला तयार नव्हत्या.  पण कोर्टाने समजावल्यावर त्या तयार झाल्या. पुढील तारखेला त्या मुली आरोपींसोबत जायला तयार नव्हत्या.
त्या मुलींना अश्लील सीडीज देण्यात आल्या होत्या आणि त्याबरोबरच इस्लाम ची महती सांगणारी आणि इस्लाम स्वीकारण्याला प्रवृत्त करणारी पुस्तके देण्यात आली होती. शिवाय पोलीस यंत्रणेकडे काहीही झाले तरी ‘पॉप्युलर फ्रंट’ चे सदस्य या धर्मांतराच्या कामात मदत करत असल्याचे उघड न करण्याबाबत आणि त्यांचे नाव न घेण्याबाबत वारंवार बजावण्यात आले होते.


न्यायालयाचा दृष्टिकोन
न्यायालयाने या दाव्याचे निकालपत्र देताना आपली मते नोंदवली आहेत. न्यायालयाने यात निःसंशय ‘धर्म’ आणि ‘धर्मांतर’ या गोष्टी मुळाशी असल्याचे नोंदवले आहे. शिवाय केवळ या दाव्यापुरते मर्यादित न राहता अशा अन्य घटना, त्यातून बाहेर येणारे एक सर्वव्यापी ‘डिझाईन’, एक चळवळ यावर प्रकाश टाकला आहे. यात येणारा आंतरराष्ट्रीय सबंध, पैसा, धार्मिक नेते, संस्था याबद्दल अधिक चौकशी करण्याचा न्यायालयाचा मास दिसून येतो. या दाव्यात न्यायालयाने केरळ राज्याचे ‘डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस’ (डीजीपी) यांना ८ प्रश्न विचारले आणि त्यावर सविस्तर अहवाल दाखल करायला सांगितले.


न्यायालयाने डीजीपी यांना विचारलेले ८ प्रश्न
१.     ‘लव्ह जिहाद’ अथवा ‘रोमियो जिहाद’ अशी काही चळवळ केरळ राज्यात कार्यरत आहे का?
२.     जर हो असेल तर त्यांची योजना आणि डाव काय आहे?
३.     या प्रकारच्या कामात कोणत्या संस्था/संघटना सहभागी आहेत?
४.     ह्या प्रकारच्या कार्यकलापांना पैसा कोठून येतो?
५.     गेल्या ३ वर्षांत अशाप्रकारे किती शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण इस्लाममध्ये धर्मांतरित झाले आहेत?
६.     या तथाकथित प्रकल्पाची व्याप्ती आणि योजना अखिल भारतीय स्तरावर आहे काय?
७.     ह्या कामी विदेशातून आर्थिक मदत येते आहे का?
८.     ‘लव्ह जिहाद’ चळवळ आणि बनावट चलन, तस्करी, अंमली पदार्थ व्यवहार आणि आतंकवाद यांच्यात काही सबंध आहे काय?

डीजीपी, केरळ राज्य यांनी वरील प्रश्नांना दिलेली उत्तरे
१.     ‘लव्ह जिहाद’ अथवा ‘रोमियो जिहाद’ नामे कोणतीही संस्था अथवा चळवळ केरळ राज्यात कार्यरत असलेली आढळून आली नाही.
२.     वर म्हटल्याप्रमाणे अशा संस्था/संघटनांच्या कार्याबाबत सबळ पुरावा नाही.
३.     अशा प्रकारच्या जबरदस्तीच्या धर्मांतरात गुंतलेल्या विशिष्ट संस्था/संघटना आढळून आल्या नाहीत.
४.     याबाबत विश्वासार्ह पुरावा अद्याप उपलब्ध नाही.
५.     आत्ता दाखल असलेळी २ प्रकरणे वगळता अशी जबरदस्तीच्या प्रेमाधारित धर्मांतराची अन्य तक्रार प्रकरणे नाहीत. प्रस्तुत २ प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून तपास चालू आहे.
६.     ह्याबद्दल सबळ पुरावा नाही.
७.     आंतरराष्ट्रीय आर्थिक पाठबळाबाबत सबळ पुरावा नाही.
८.     याबद्दल सबळ माहिती नाही.
पुढे डीजीपी आपल्या अहवालात म्हणतात – मुलींना जाळ्यात ओढून जबरदस्तीने अथवा फसवणुकीने धर्मांतर करण्याचे आरोप काही संस्था/संघटनांवर झाले आहेत. पोलीस अधिक शोध घेत आहेत. त्यात तथ्य आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. आंतरधर्मीय विवाह खूप मोठ्या संख्येने केरळात होत आहेत.  आणि त्यात अनेक धर्मांतरण प्रकार होत असतात. पोलीस यंत्रणेकडे याचा ठोस आकडा अथवा तपशील उपलब्ध नाही. परंतु तरीही मुस्लिम तरुणाशी प्रेमात पडल्यानंतर मुलीला तिचा धर्म बदलायला प्रवृत्त करण्यात येत असल्याचे निश्चित प्रयत्न होत असल्याचा संशय घेण्यास पुरेशी कारणे आहेत. विभागाला मिळालेल्या अनिश्चित सूत्रांकडच्या माहितीनुसार अशा प्रकारच्या तंत्राने धर्मांतरण करायला प्रोत्साहन देणारे काही गट तरुणांमध्ये कार्यरत आहेत. या कमी गुंतलेल्या तरुणांना कपडे, वाहने आणि कायदेशीर मदत यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे विदेशातून आर्थिक मदत येते आहे. आणि अशांचे भारतातील अन्य ठिकाणीही संपर्क-संबंध आहेत.

या प्रकारची प्रस्तुत प्रकरणे, आरोप आणि सूत्रांकडची माहिती या आधारे पोलीस सतर्क आहेत आणि अधिकाधिक माहिती गोळा करत आहेत. अशा प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल करायला शक्यतो कोणी पुढे येत नाही ही मुख्य अडचण आहे. तरीही पोलीस स्वतः सतर्क राहून अशा प्रकारच्या जबरदस्तीच्या धर्मांतरणावर त्वरित कारवाई करतील.

केरळ पोलीस च्या गुप्तहेर खात्याला सुद्धा अशा जबरदस्तीच्या धर्मांतरणात गुंतलेल्या संस्था/संघटना यांवर करडी नजर ठेवायला सांगण्यात आले आहे.

न्यायालयाचा शेरा व अधिक महितीसाठीचा प्रयत्न
डीजीपी यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर न्यायालयाने त्यातील माहिती ही अस्पष्ट असल्याचे आणि आपसात मेळ न राखणारी असल्याचे मत व्यक्त करीत पुढील माहिती सीलबंद लखोट्यात मागवली -  जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांकडून (एस्. पी.) प्राप्त झालेले जिल्हाशः अहवाल, अन्य कनिष्ठ अधिकाऱ्यांकडचे अहवाल, अन्य माहिती ज्यावर आधारून अहवाल बनवण्यात आला. ही माहिती सादर करताना डीजीपी यांनी काही अधिकाऱ्यांकडून काही जिल्ह्यात असे कार्य चालल्याचे मान्य करून १८ अहवाल सादर केले.

न्यायालयाने १८ अहवालांचा अभ्यास करून नोंदवलेले मत
१८ पैकी १४ अहवाल हे अतिशय त्रोटक आहेत. एक अहवाल तर म्हणतो – मी माहिती आणि पुढील कार्यवाही  याबाबतीत शून्य अहवाल पाठवतो आहे.  (“I am herewith forwarding a NIL report favour of information and further necessary action".). अन्य १३ अहवाल १ ल्या प्रश्नाचे उत्तर सर्वसाधारणपणे “जिल्ह्यात आढळले नाही”, “जिल्ह्यात दिसून येत नाही”, “जिल्ह्यात अशी कोणती संघटना नाही” असे देतात आणि अन्य प्रश्नांची उत्तरे तर NA (Not Applicable) अशी देतात. कोणत्या आधारावर हे निष्कर्ष काढले याचीही काही माहिती त्यात दिलेली नाही. १ अहवाल मुसलमानांनी आणि हिंदूंनी कोझिकोडे शहरात चालवलेल्या धर्मांतरणाच्या केंद्राबाबत नमूद करतो.
१८ पैकी ३ अहवाल काही तपशील पुरवतात.
एक अहवाल ‘स्मार्ट फ्रंट’ या संघटनेच्या २ महाविद्यालयातील कार्याबाबत सांगतो.
दुसरा अहवाल विशेष शाखेने केलेल्या तपासातून निष्पन्न झालेला निष्कर्ष देतो –  त्यात नमूद केलेल्या शहरात “ कॉलेजेस मध्ये NDF, PFI आणि कॅम्पस फ्रंट या मूलतत्त्ववादी संघटनांची मुळे आहेत. कॅम्पस फ्रंट बद्दल अहवालात नमूद केले आहे की, “उपलब्ध माहितीनुसार या संघटनेचा प्लान असा – संपन्न कुटुंबातील, हुशार, उच्चवर्णीय हिंदू मुली आणि ख्रिश्चन मुली यांना जाळ्यात ओढायचे, विशेषतः प्रोफेशनल कोर्सेस व आय.टी.सेक्टर मधे नोकरी करणाऱ्या.” 

या तथाकथित ‘लव्ह जिहाद’ चळवळीमागे ‘मुस्लिम यूथ फोरम’ यासारख्या मुस्लिम संघटना आणि मुस्लिम महिला संघटना ‘थसरीन मिल्लत’, ‘शाहीन फोर्स’, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट’ आणि तिची विद्यार्थी संघटना ‘कॅम्पस फ्रंट’ अशा संघटना ‘लव्ह जिहाद’ चळवळीमागे आहेत.

आर्थिक पाठबळ दर्शविणारा सबळ पुरावा नाही;  पण हे माहिती आहे की त्यांना पाठिंबा आणि आर्थिक पाठबळ हे ‘नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ कडून मिळते. काही अन्य मुस्लीम मूलतत्त्ववादी संघटना आखातातील देशांमधून पैशाची व्यवस्था करत आहेत. या माहितीची सत्यता पडताळून पहायला हवी.

वर उल्लेखलेल्या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून मदत घेऊन तिरुअनंतपुरम्‌ जिल्ह्यात धर्मपरावर्तनाची १०० हून अधिक उदाहरणे घडली आहेत असे वरील अहवाल सांगतो. अशा ३१ मुलामुलींची पत्त्यासकट माहिती अहवालात दिली आहे. हा अहवाल पुढे म्हणतो – संपूर्ण भारतात लव्ह जिहाद संघटनांची कारवाई चालू असल्याचा पुरावा अजून नसला तरी ही चळवळ मुस्लीम संघटनांच्या मदतीने १९९६ साली सुरु झाल्याचे बोलले जाते.

सौदी अरेबियातील काही संघटना अशा प्रकारच्या कृत्यांसाठी तरुणांना आर्थिक पाठबळ “शिष्यवृत्ती” या नावाखाली पुरवत आहे.

एका सांख्यिकीनुसार गेल्या ४ वर्षांत प्रेमप्रकरणानंतर ३००० ते ४००० धर्मबदलाची उदाहरणे आहेत. अन्य एका सांख्यिकीनुसार अशाप्रकारे २८०० मुली अन्य धर्मात धर्मांतरित झाल्या आहेत. कासारगोड, कन्नूर, कोझिकोडे आणि मलप्पुरम् जिल्ह्यात अशाप्रकारचे १६०० धर्मांतरण प्रकार घडले आहेत. अशाचप्रकारे हिंदू मुलींना इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याच्या कारवाया उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील पुणे, कर्नाटकात बंगलोर या ठिकाणी चालू असल्याचे अहवाल सांगतो. अहवाल असे स्पष्ट निरीक्षण नोंदवतो की ‘गुप्तचर खात्याच्या’ (Intelligence Wing) मते अशा प्रकारच्या प्रेमविवाहांमुळे समाजात तेढ आणि संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

केंद्र सरकारला (केंद्रीय गृहखात्याला) आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. बराच वेळ काढल्यानंतर (मुदतवाढ मागून घेत घेत) त्यांनी स्पष्ट केले की घटनेच्या २५ व्या कलमानुसार ‘सेक्युलॅरिझम’ हे मूलभूत तत्व आहे वगैरे. आणि त्यानंतर राज्य सरकार वर जबाबदारी ढकलून ते मोकळे होतात. ते म्हणतात “ राज्य सरकार या बाबतीत जबरदस्तीने, आमिषाने, फसवणुकीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी कायदा बनवू शकतं. अरुणाचल प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओरिसा राज्यांनी अशाप्रकारे धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा पास केला आहे. परंतु केंद्र सरकार या बाबतीत केंद्रीय कायदा करण्याच्या दिशेने कोणतेही पाउल उचलण्याच्या विचारात नाही. ” असे का? हे आपण स्वतःलाच विचारले पाहिजे. प्रत्येक राज्याने असा कायदा करावा असे एकीकडे म्हणायचे आणि स्वतः मात्र या विषयावर पाउल उचलायला कचरायचे असे का होते आहे? या हिंदूद्वेषामागे नक्की कोण आहेत?

पुढे प्रस्तुत निकालपत्रात मा. न्यायाधीश दुसऱ्या एका याचिकेचा उल्लेख करतात जी प्रस्तुत दाव्यातील आरोपींच्या वकिलाने मधल्या वेळात दाखल केली आहे. त्यात तो वकील म्हणतो की, ‘न्यायाधीशांनी मुस्लीम युवक, हिंदू मुलगी, ख्रिश्चन मुलगी असे उल्लेख करायला नको याने सांप्रदायिक तेढ वाढेल’. हे म्हणजे ‘सौ चूहे खाके बिल्ली चली हाज’ सारखे झाले! शिवाय या याचिकेत जमीन अर्ज मागे घेत असल्याचे सांगून कुराणातील कवन उद्धरित करून शेवट केलाय. ते म्हणतात, “आम्ही जमीन अर्ज मागे घेत आहोत. आम्हाला आमच्या दैवाच्या भरवशावर सोडावे आणि कायद्याला स्वतःचा मार्ग घेऊ द्या. कारण आरोपी जाणतात - “जर अल्लाने तुम्हाला त्रास द्यायचा ठरवला तर केवळ अल्लाच त्यातून वाचवू शकतो: आणि जर त्याने तुम्हाला चांगल्या नशिबाचा आशिर्वाद दिला तर कोणीच ते थांबवू शकत नाही. जाणून घ्या, की सर्व बाबींवर ‘त्या’चे नियंत्रण आहे.”(कुराण. सुरा-६, आयत १७).  परंतु मा. न्यायाधीश ठामपणे आपले मत योग्यच आहे हे सांगून ‘विसरा आणि क्षमा करा’ (forget and forgive) यावर आपला अधिक विश्वास असल्याचे म्हणतात. ते कणखरपणे अर्ज मागे घेण्याच्या डावाला नकार देतात. ‘असोसिएशन फॉर ह्युमन राईट्स’ नामे एका संस्थेने ‘लव्ह जिहाद’ हे शब्द वापरू नयेत म्हणून केलेल्या अर्जालाही ते प्रस्तुत दाव्याशी संबंध नसल्याचे सांगून नकार देतात व अन्यत्र प्रयत्न करण्यास सांगतात.

निकालपत्राच्या शेवटच्या काही परिच्छेदात मा. न्यायाधीश संविधानाच्या दृष्टिकोनातून (२५ वे कलम) धर्म, धर्मासंबंधीचे स्वातंत्र्य, प्रेम विवाह, जबरदस्तीने होणारे, आमिष दाखवून होणारे धर्मांतरण, शासनाची जबाबदारी ए.बद्दल विस्तृत चर्चा करतात. ते म्हणतात, “डीजीपींना दिलेल्या अहवालात पोलीस अधिकारी अशाप्रकारे ठराविक धर्माच्या मुलींना अन्य धर्मात धर्मांतरित करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न सुरु असल्याचे मान्य करतात. हेही स्पष्ट होते की असे प्रयत्न अहवालात नमूद केलेल्या काही संघटना करत आहेत. याची दाखल लोकांनी आणि विशेषतः सरकारने घ्यायला हवी. लोकांचे मूलभूत आणि नागरी हक्क संरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. भारतीय संविधानाचे २५ वे कलम कोणालाही जबरदस्तीचे धर्मांतरण करण्याच्या कारवाईत गुंतण्याची मुभा देत नाही. एकाला दिलेले स्वातंत्र्य त्याने दुसऱ्याचे हिरावून घेण्यासाठी वापरता काम नये.”

“पालकांना आपल्या मुलांना हवे तसे वाढवण्याचा अधिकार सुद्धा नजरेआड करता येणार नाही. केवळ मुलगा अथवा मुलगी वयात आली याचा अर्थ त्याच्या/तिच्या पालकांना त्यांच्या भविष्याबाबत आणि करिअरबाबत काही बोलता येणार नाही असा होत नाही. पालक आपल्या मुलांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहेत. पालकांना आपल्या मुलांना मार्गदर्शन करण्याचा आणि त्यांचे करियर घडवण्याचा अधिकार आहे. कलम २५ खालील अधिकार कोण अनोळख्या, अनाहूत व्यक्तिला एखाद्या मुलीच्या पालकांचे अधिकार हिरावून घेण्याची संमती देत नाहीत. २५ वे कलम व्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करते. त्याचा उद्देश कुटुंबव्यवस्था आणि संस्कृती नष्ट करणे नाही. आपल्या देशातील कायदे हे नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि संस्कृती व परंपरा यांना जपणे यासाठी आहेत.”

“शैक्षणिक संस्था, प्रोफेशनल कॉलेजेस आणि अन्य संस्था अशा ठिकाणी तरुण हे शिकण्याच्या ध्यासामागे आणि ज्ञान मिळवण्याच्यामागे असतात. ही स्थाने धर्मांतराची कुरणे बनता नयेत. घटनाकारांना शैक्षणिक संस्था धर्मांतराची स्थाने झाल्याची कल्पनाही सहन झाली नसती. कोणाला धर्मशास्त्रातील विद्वान व्हायचे असेल तर त्याने अवश्य व्हावे पण इतरांना धोक्यात घालून नव्हे.”

“सदर प्रकरणातील घटना, प्रसंग लक्षात घेता आणि त्यांचा प्रकार व गंभीरता पाहता मी ‘सिव्हिल प्रोसिजर कोड’ च्या धारा ४३८ खाली दिलेला ‘डिस्क्रेशनरी रिलीफ’ देऊ शकत नाही. म्हणून सदर दिलासा मागणारा अर्ज मी फेटाळत आहे.”

कायदेशीर सहाय्य – हा लेख वाचून बऱ्याच जणांना आपल्या आसपासच्या, ओळखीतल्या, नात्यातल्या घटना आठवतील. असे प्रकार घडले, माहित असले तरी त्यावर कोर्टात आपली बाजू घेऊन कोण लढेल असे वाटल्याने बरेचजण पुढे जात नाहीत, परंतु केरळ मधल्या त्या मुलींच्या घरच्यांनी असे धारिष्ट्य दाखवले, त्या मुलीही लढायला तयार झाल्या. अशाप्रकारे मुंबई उच्च न्यायालयातील काही वकिलांनी एकत्र येऊन एक गट स्थापन केला आहे जो अशाप्रकारच्या अन्यसुद्धा हिंदुत्वाला घातक असणाऱ्या विषयांमध्ये कायदेशीर लढाई लढत राहील. तेव्हा अशा घटना मोकळेपणाने तुम्ही या गटाला कळवू शकता. या लेखाखाली प्रतिसाद दिल्यास आपण पुढील माहिती मिळवू शकतो.

हा सर्वच प्रकार धक्कादायक आणि चिंताजनक आहे. ह्या षडयंत्राचा परिचय अधिकाधिक जणांना करून द्यायला हवा. विशेषतः महाविद्यालयीन वर्गाला याची जाणीव व्हायला हवी. या लेखाची लिंक मुक्तपणे फॉरवर्ड करून आपण त्यावर अन्य लोकांना विचारप्रवृत्त करुया. हा अजून तरी अप्रकाशित लेख आहे. कोणाला प्रकाशित करायचा असेल तर मला लेखाखाली प्रतिसाद द्यावा अथवा इमेल करावा.       


 1. ·         http://actforamerica.wordpress.com/2010/07/25/indian-official-urges-investigation-of-love-jihad-plan-to-recruit-girls-for-jihad-activities/
 2. ·         http://en.wikipedia.org/wiki/Love_Jihad
 3. ·         http://indianrealist.wordpress.com/2009/03/01/hindu-girls-beware-of-love-jihad/
 4. ·         http://articles.timesofindia.indiatimes.com/2010-07-26/india/28290879_1_pfi-muslim-women-love-and-money
 5. ·         http://www.mid-day.com/news/2009/oct/301009-Islamic-body-Love-Jihad-Hindu-Christian.htm
 6. ·         http://www.mid-day.com/news/2009/oct/301009-Islamic-body-Love-Jihad-Hindu-Christian.htm
 7. ·         साप्ताहिक विवेक
 8. ·         दैनिक तरुण भारत, नागपूर.
 9. ·         मुंबई तरुण भारत
 10. ·         सनातन प्रभात
 11. ·         हिंदू जनजागृती समिती
 12. ·         http://www.indianexpress.com/news/kerala-hc-wants-probe-into-love-jihad/523630/
 13.   ·        विशेष धन्यवाद श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, वकील आणि श्रीमती सुवर्णाताई रावळ.

१.