"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Friday, January 29, 2010

हे महान भरत देश

हे महान भरत देश तुजसि कोटी वंदना ॥ध्रु॥

तूच देव मंदिरात भाव तूच या मनी
शक्ति या करात तुच स्वप्न तूच लोचनी
अंतरात तूच प्राण हृदयि तूच प्रेरणा ॥१॥

ही कृतार्थ वैखरी तुझेच गीत गाउनी
लोचनास धन्यता तुझेच रूप पाहुनी
भक्तिचा असे तुझ्याच गंध देह चंदना ॥२॥

स्तोत्र भारता तुझे अम्हास वेदमंत्र तो
श्वासधूप प्राणदीप आरतीस तेवतो
आयु सर्व वाहिले पदी तुझ्याच पावना ॥३॥

हे गीत ऐकण्यासाठी --> http://www.geetganga.org/हे-महान-भरत-देश-he-mahāna-bharata


No comments:

Post a Comment