"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, November 25, 2010

फतवा क्या था ?


इस्लाम में फ़तवा जारी करने की पद्धती है | यह फ़तवा कभी निर्देश के स्वरूप में तो कभी आदेश के स्वरूप में होता है | अलग-अलग देशों में फ़तवा जारी करनेवाली संस्थाने होती है | हिन्दुस्थान में भी ऐसे कई फतवे जारी किये जाते हैं | सामान्यतः हिंदुस्तानी मुस्लिम इन फतवों को जानता है उर्दू वार्तापत्रोंसे | और गैर-मुस्लिम जनता को अन्य वार्तापत्रोंसे इन फतवों से अवगत किया जाता है | अभी सामान्य मुस्लिम इन फतवों के प्रति कितनी श्रद्धा रखता है, और किस सीमा तक उसका पालन करने का प्रयास करता है यह विवाद का विषय हो सकता है | परन्तु फ़तवा अपने आप में चर्चा का निमंत्रण देता है, विवादों में लिपटा जाता है और संदेहों के घेरों में आता है |

दारुल उलूम देवबंद ने हाल ही में एक फतवा जारी किया है | यह फतवे के बारे में मुझ जैसे हिंदू को वर्तमानपत्रोंसे पता चला | मैं किसी वार्तापत्रोंको नाम लेकर इस में घसीटना नहीं चाहता, किन्तु उनकी गलती का दर्शन कराना अवश्य चाहूँगा | उन्होंने जाँच-परख कर के ही वृत्त प्रसृत करने चाहिये | अन्यथा गलत संदेश सामान्य जनता में जाता है | पत्रकार इस दायित्व को प्रमाणिकता से कब निभाएंगे?

वास्तव में यह लेख मैंने फतवे का विरोध करने हेतू लिखना तय किया था | लेख के लिए जैसेही मैं फतवे को मूल रूप में पढ़ने लगा, मैं समझ गया की मेरी धारणाएँ गलत थी | अपितु मैंने बदले हुए विचार को भी लेख के रूप में लिखना उचित समझा | सत्य की खोज में एक कदम बढ़ गया | आखिर विचारप्रवाह अपनी अनवरत यात्रा में कई मोड लेता है !

छपे हुए वृत्तों के अनुसार ‘रक्तदान करना इस्लाम के विरोध में है, तथा शरीर के किसी भी भाग को दान देना इस्लाम के तत्वों के विरोधी है’ | कुछ ने छपा – “Donating blood, organs un-Islamic : Darul fatwa”. ऐसे में किसी के भी मन में आता है की यह फ़तवा गलत संदेश प्रेषित करता है | इसके विरोध में तुरंत प्रतिक्रियाएं भी आयी | परन्तु सत्य क्या है?

फ़तवा कहता है की अपना शरीर अल्लाह का है, अपना हक उसपर नहीं है और इसीलिये किसी भी हिस्से की विक्री करना इस्लाम के विरोध में है | यह तर्क ठीक है | जिस तरह से किडनी और अन्य भागोंकी चोरी, तस्करी और विक्री चलती है, गैर मुसलमानों ने भी यह फतवे को गौर से देखा तो कुछ बुरा नहीं | ‘अपना शरीर ईश्वर की देन है’ यह विचार हिंदू तत्वों में अनुस्यूत है | इसलिए फतवे के इस निर्देश में मुझे कुछ गलत नहीं दिख रहा | विक्री के साथ-साथ भेंट देना भी अनुचित करार दिया है (selling and gifting)| भेंट भी हम उसी को देते है जिसका कुछ उपकार है या फिर अपनी कुछ अपेक्षा है, यह अपेक्षा प्रेम, आशिर्वाद, मेहेरबानी ऐसे रूप में भी हो सकती है | परन्तु ‘दान’ की भावना अनोखी है | वह विक्री और भेंट के दायरे के बाहर है | किसी अपेक्षा के बिना देना ‘दान’ का अविष्कार है | अपने पुराणों में कर्ण, शिबी राजा, भामाशाह, श्रीराम जी आदि महापुरुषों ने अपने उदात्त जीवन से इस दान की भावना को प्रस्तुत किया है | ऐसे दान का उल्लेख (विरोध) इस फतवे में नहीं है | दान की भावना हिंदुस्तानी संस्कृती की अनमोल धरोहर है |

आगे रक्तदान के बारे में फ़तवा कहता है की केवल आपातकाल (emergency) और जोर-जबरदस्ती (compulsion) के समय रक्तदान किया जा सकता है | रक्तदान की आवश्यकता वर्तमान के आतंकवाद से पीड़ित विश्व में आपातकाल जैसी ही है, इस तथ्य को मुसलमान भलीभाँति समझते है  |

| दहशतगर्दों से लढना सभी का कर्तव्य है | और इसीलिये ऐसे ‘वैश्विक आपातकाल’ में रक्तदान करना होगा, यह कुछ मुस्लिम विचारवंतों के लेखन/वक्तव्य से भी ध्वनित होता है (मौलाना वाहीदुद्दीन खान) | 

सामान्यतः गर्भपात करना भी इस फतवे में गलत माना गया है | परन्तु गर्भवती स्त्री यदि   असह्य वेदनाओंका सामना करने के लिए शारीरिक दृष्टी से बहोत कमजोर है, असमर्थ है  या वह अपने जान को घबराती है (जीवन-मृत्यू की चिंता करती है) तो वह गर्भपात करा सकती है | अभी ऐसे चीजों में उपासना पद्धती को लाना, ऐसे निर्देश रिलीजियस संस्थानों ने देना उचित या अनुचित इसपर विवाद हो सकता है | हाल ही में पोप ने दिए हुए बयान पर मैंने मेरे विचार प्रकट किये हैं (http://vikramwalawalkar.blogspot.com/2010/11/condoms-conundrum.html) |
वैसे इस फतवे में इतना बवाल मचाने जैसा कुछ है नहीं, जितना मिडिया ने प्रस्तुत किया है | केवल कुछ कदम सत्य की और बढ़ने के प्रयास |

संदर्भ :-

Tuesday, November 23, 2010

Condom’s Conundrum:

The Pope has come out with a new idea about ‘condoms’. Earlier the Church opposed use of contraception for reasons best known to them. The recent decision has been taken in the light of spread of STDs (Sexually Transmitted Diseases) like HIV. It is surely a departure from orthodox view garnered over these years. This was much awaited announcement from the Pope.

Bharateey population has a considerable share of people belonging to Christian religion. Most of these are of Hindu origin. They are converts. Conversions took place owing to various reasons like fear, fraud, allurement etc. Religion has stooped to low level of a bread, 1kg rice, saree, water pump etc. Can we equate a worship mode to materialistic things? Some influential people in this country have a designated role to play in spreading Christianity in Bharat. These are ranging from political party chiefs to company owners and social workers. To believe views of people like former Honorable RSS Chief K S Sudarshan, these people, holding key-posts, have links with Rome and working like agents. Indian Christians look towards Rome for guidance and directions. At least the Cardinals, Archbishops are bound to follow the diktat from Rome. And from them it permeates to Christian masses. Therefore we cannot turn a blind eye to such pronouncements.

What prevented Pope from making such a statement over these years? Will religion control such things? Should people listen to such things blindly as they follow a certain religion?

Bharateey population is seamlessly increasing. The horrendous pressure over resources of our country makes living tougher for everybody. Population should be controlled and there can’t be two opinions about it. But the celebrated ‘hum do humarey do’ should be followed by all communities without hesitation. Law cannot be optional. Some ‘fatwa’ or some ‘diktat’ speaking prohibition of contraceptives should not come in a way of national policy of population control. Succumbing to such unwarranted sermons, the religious demography is rapidly changing. 


from hinduism.about.com
Demographic trends should be examined to decide a policy of population control. Thus some years ago, Hindu organizations came out with a statement that, “hindus alone should not follow hum do humara ek policy”.   This was heavily criticized at that time. Such statement was a reaction to double standards applied by policy makers. Government seen surrendering to certain sections, ensued such a response from majority community.

Though the Pope has lately come up with a wise message, it will surely help in bettering the world now on. It was much awaited and so we welcome it as a Good News!   


References:-

Saturday, November 20, 2010

‘शिवतांडवस्तोत्र’

रावण खरंच वाटतो तेवढा वाईट होता का? आपण त्याला एका वाईटपणाच्या प्रचंड उंचीवर नेऊन ठेवलं आहे. सीतेच्या बाबतीत त्याने जे केलं, त्याला सर्वात महत्वाचं कारण मला वाटतं सीतेनेच त्याला पुरवलं. जनक राजाने लावलेल्या पणाला रावण आला. आणि त्याला शिवधनुष्य पेलता आलं नाही. ते अर्थातच पूर्वनिहित असेल. परंतु तेव्हा सीता हसली. एक स्त्री आपल्याला हसली आणि तेही भरसभेत, जिथे देशोदेशींचे राजे-महाराजे आलेत याचा अपमान वाटणं अस्वाभाविक नाही. त्या अपमानापोटी पुढचे अविचाराचे कृत्य घडले असावे. 

प्रस्तुत लेखनाचा विषय हा नाही. रावण शिवभक्त होता हा काही विवादास्पद विषय नाही.  ही गोष्ट बहुश्रुत आहे. परंतु रावणाने शिवभक्ती करताना एक ‘शिवतांडवस्तोत्र’ रचले आहे. ही माहिती मला नेटवर मुशाफिरी करताना समजली. मग मी ते ऐकलं. श्री. रमेशभाई ओझा यांनी म्हटलेलं स्तोत्र मला सर्वात जास्त आवडलं. स्पष्ट उच्चार, चांगली चाल इ. ह्या स्तोत्रातील शब्दांमध्ये ऊर्जा असल्याचं जाणवतं. केवळ अनुप्रास, संस्कृत शब्द चमत्कृती याही पलीकडे एक शक्ती ह्या स्तोत्रात जाणवते.


मग कोर्टात एका वकिलांनी सांगितलं की ‘गीताप्रेस’, गोरखपूर ने ‘स्त्रोत्ररत्नावली’ नावाचं एक पुस्तक काढलं आहे. ह्यात विविध स्तोत्रांचा संग्रह आहे. त्यात हे रावणकृत ‘शिवतांडवस्तोत्र’ मिळालं.


तुम्ही ऐकून पहा. आणि याची ऑडीओ प्रत हवी असेल तर ईमेल द्या. मी मेल करीन. 

शिवाय अजून एक फ्युजनचालीचे सुद्धा आहे. 


 



ॐ नमः शिवाय | शिव शंभू सर्वांचे कल्याण करो.

Thursday, November 18, 2010

ठसे - क्रमशः ३



५. गोष्ट आहे २६ जुलै च्या अतिवृष्टीनंतरची. सगळीकडेच मुसळधार पाऊस झाला होता. मुंबईसह महाड, पोलादपूर इथे धुवांधार पावसाने अतोनात नुकसान केले होते. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’ कामाला लागली होती. आमच्याकडे निधी संकलनाचे काम आले. मी आणि माझा कल्याणातील किरण म्हणून स्वयंसेवक बंधू- आम्ही दादरमधील काही इमारतींमध्ये जायचे निश्चित केले. बरोबर माहिती पत्रक व पावती पुस्तक होते. एरवी निधी संकलनाला काही न्यूनतम मर्यादा नसते. स्वेच्छेने एक रुपयापासून ते कितीही. पण तत्कालीन निकड पाहता किमान ५० रुपयाच्यावर निधी घेऊन पावती द्यावी असे ठरले. अंदाज घेऊन १० रुपयांच्यावर रकमेला पावती दिली तरी चालेल असे आम्ही ठरवले.

संघ कार्यालयाजवळीलच एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर गेलो. बेल वाजवूनही वाजवीपेक्षा जास्त वेळ गेला तरी आतून कोणी येईना म्हणून आम्ही पत्रक सरकवले व वर गेलो. वरून इतर घरे पूर्ण करून खाली जिना उतरत असताना त्याच दरवाज्यातून आम्हाला शुकशुक् करून बोलावले गेले. आतून काम करणाऱ्या एक मोलकरीण बाई बाहेर आल्या. आम्हाला म्हणाल्या, “अहो घरी कोणीच नाही म्हणून मगाशी दार उघडले नाही. पण पत्रक वाचलं. मी काही मदत करू शकते का?” झालं, आता आमचं धोरण ठरलं होतं किमान निधीचं. पण परिस्थिती अशी, की कसली न्यूनतम रक्कम आणि काय. आम्ही दोघंही जवळपास एकदमच म्हणालो, “अहो जेवढं शक्य असेल तेवढं द्या”. आम्ही विवंचनेत ‘आता पावतीचं कसं करायचं’.. त्या आत गेल्या आणि शंभराची एक नोट त्यांनी आम्हाला दिली. आश्चर्यचकित आम्ही, त्यांचे नाव विचारले पावतीवर टाकण्यासाठी, तर आम्हाला अजून धक्का देत त्या म्हणाल्या, “पावती नको. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाव आहे ना!”. आम्ही कसली पावती देतो, आम्हालाच पावती मिळाली होती! पक्क्या झालेल्या त्या ठशाकडे आम्ही अवाक् होऊन पाहत होतो!


६. नागपूर ला दरवर्षी तृतीय संघ शिक्षा वर्ग होतो. २०१० सालच्या तृतीय वर्षाच्या वर्गात शिक्षार्थी म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले होते. त्याबद्दल विस्ताराने मी लिहिलेच आहे. त्यातलीच एक साठवण.

आमच्या गणात २२ जण होते. त्यातल्या आसामहून आलेल्या कुमुद हलोई चे आणि माझे छानच जुळले. त्याला कारणही तसंच होतं. एकदा हा पिवळे द्रावण असलेली बाटली घेऊन चालला होता. मधेच पीत होता. मी विचारलं काय आहे? म्हणाला, “दवाई है |” मी रोखून पाहिलं आणि म्हटलं, “मैं समझ गया तेरी दवाई..छास में तुम बचाया हुआ गुड मिलाकर घुम रहे हो |” जेवणाच्या वेळी मिळणारे ताक बाटलीत भरून त्यात कधीतरी मिळणारे साठवलेले गूळ घालून एक न ओळखता येणाऱ्या रंगाचे द्रावण बनवले होते. कोणी पिऊ नये म्हणून ‘दवाई’ ही बतावणी. सगळेजण “अच्छा, ठीक है |” असं म्हणून पुढे जात असत. पण  मी सांगितलं आणि मला मागूनच घेतलं चव बघायला. मग तिथपासून आमची घट्ट मैत्री सुरु झाली. त्याने आणलेलं एकशिंगी गेंड्याच्या शिंगाच्या आकाराचे वाद्य वाजविणे, एकमेकांची मजा-मस्करी, जेवताना एकत्र, वाढप करताना एकत्र असं चालू होतं.

जायच्या आदल्या दिवशी हा माझ्याजवळ आला आणि एक गडद जांभळ्या रंगाचा रुमाल देत म्हणाला, “ये मेरी याद में | दो ही लाये थे | सबसे अच्छी दोस्ती जिनसे होगी उनके लिये |” आसाम प्रांतातला कुमुद आणि कोंकण प्रांतातला मी..त्या गडद रंगाच्या घट्ट विणलेल्या आसामी रुमालापेक्षा अधिक घट्ट वीण अनुभवत होतो..

समाप्त .

Wednesday, November 17, 2010

भिजते घोंगडे सागरी महामार्गाचे.



कोंकणातले इरसाल नमुने विविध साहित्यकृतींमधून परिचित झाले आहेत. कोंकणी (म्हणजे मालवणी. गोंयकार नव्हे.) माणसाची स्वभाववैशिष्ट्ये आपल्याला ठाऊक आहेत.

कष्टाळू, हुशार, देवभक्ती करणारा, भजनं म्हणणारा, राबणारा, गजाली मारणारा, मनापासून आदरातिथ्य करणारा या भागातला माणूस भांडणसुद्धा रस घेऊन करतो. कोर्ट-कचेरी जणू छंद असल्यासारखा करतो. पावलीसाठी भांडणावर २ रुपये खर्च करायला मागेपुढे पाहत नाही. पिढ्यानपिढ्या एका माडासाठी मुंबई उच्च न्यायालयात खेटे घालणारे लोक मी पाहिले आहेत. “तेका मी धडो शिकवतंय” किंवा “त्यांका मी नमयिलंय” हे सांगण्यात आनंद.

तरी या कोंकण किनारपट्टीचा बऱ्यापैकी विकास झाला आहे, चालू आहे. या किनारपट्टीवरून वेगाने वाहतूक होण्यासाठी सागरी महामार्ग झालाय. त्याचे सांकेतिक नाव आहे MSH-4. म्हणजे ‘Maharashtra Sea Highway – 4). या महामार्गावरून बऱ्यापैकी वाहतूक सुरु असते. महामार्ग म्हटल्यानंतर प्रशस्त मार्ग, वेगाने प्रवास ही लक्षणं अभिप्रेत असतात. अगदी जर्मनीतील ऑटोबाह्न (Autobahn) प्रमाणे नसली तरी ही वैशिष्ट्ये जर महामार्गाला नसतील तर तो महामार्ग कसला.

या सागरी महामार्गाचा २०० मीटरहून कमी भाग हा अत्यंत अरुंद आहे. ही चिंचोळी पट्टी एवढी अरुंद आहे की वाहनचालकाला समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज घेऊनच गाडी आत घालावी लागते नाहीतर मागे घेण्याची नामुष्की. एकाचवेळी २ गाड्या जाऊ शकत नाहीत या महामार्गावरून! समोर गाडी दिसली तर आपण थांबायचे. जरासेच पुढे गेलो असू तर रिव्हर्स घ्यायचा.






वर दिसतो आहे तो सागरी महामार्गाचा मालवण मधे (कुंभारमाठ जवळ) काही भाग आहे. मातीचा तर आहेच पण खूप अरुंद आहे. दगडगोट्यांनी भरलेला, खडबडीत आहे. हा भाग असा राहण्याचे एकमेव कारण म्हणजे येथील व्यवच्छेदक लक्षण जे वर सांगितलेच आहे. जागा विवादात अडकलाय हा ‘महामार्ग’! तेव्हा आता हा महामार्ग निदान एवढ्या भागापुरता महामार्गाला साजेसा केव्हा होतो ह्याची वाट पाहण्याशिवाय आपल्या हातात काही नाही. आणि हा माझ्या पाहण्यात आलेला भाग. कुणी सांगावे, असे अजूनही पट्टे असतील!



दिलखुलास आदरातिथ्य करणारा, आग्रह करणारा, शहाळी फोडून देणारा, कोकम सरबत देणारा कोंकणातला माणूस जेव्हा आपसात भांडण करण्याचे टाळेल तेव्हा इथल्या प्रगतीचा महामार्ग रुंद होईल आणि वेगाने विकास सुरु होईल.

  

Sunday, November 14, 2010

ठसे - क्रमशः २

या आधीचे पोस्ट वाचण्यासाठी


३. चळवळीतील कार्यकर्त्याच्या मनात नेहमीच उत्साह भरलेला वाटत असला आणि त्याला तो तसा दाखवावाही लागत असला तरीसुद्धा नैराश्याचे, उद्विग्नतेचे क्षण त्याचीही सोबत करतच असतात. आणि हे प्रत्येक चळवळीत असतं; मग तो संघाचा स्वयंसेवक असो, साम्यवादी युवक असो अथवा विद्यार्थी संघटना, कामगार संघटना यांमधला कार्यकर्ता असो. हे जणू रहाटगाडगं असतं. उत्साहाने भरून वर येऊन रितं होऊन खाली जायचं असतं...नवा उत्साह भरून घेण्यासाठी.

अशाच काहीशा नैराश्यातून जात असताना निरोप मिळाला की अमुक दिवशी परमपूजनीय सुदर्शन जी सायं शाखेत येणार आहेत. तयारीला लागले सर्वजण. परमपूजनीय सरसंघचालक जी शाखेत येणार म्हणजे अहोभाग्य आणि शिवाय सोहळाच जणू. अशा अनुभवांमुळे “संघ म्हणजे एकाधिकारशाही, हुकूमशाही, फॅसिस्ट...” अशी संघबाह्य मंडळीत जी चर्चा चालते आणि आपल्या अगाध ज्ञानाचा जो प्रकाश ते पडतात त्याने करमणूकच होत असते.

तो दिवस उजाडला, निरोप सुरु होते. संध्याकाळ झाली आणि ठीक ६.२५ ला परमपूजनीय सरसंघचालकांचे आगमन झाले. शाखा लागली. दणदणीत ६५ संख्या होती. वेगवेगळे गण सुरु झाले. आणि पूजनीय सुदर्शन जी प्रत्येक गणात जाऊन थोडा-थोडा वेळ कार्यक्रम घेऊ लागले. काही गणात त्यांनी खेळ घेतले, काही ठिकाणी योग घेतले. उत्साहाचे वायुमंडल तयार झाले. 

प्रार्थना होऊन शाखा सुटली. आता त्यांना गाडीपर्यंत निरोप द्यायला जायचं...तेवढ्यात एक ज्येष्ठ कार्यकर्ते मला घेऊन पुढे झाले आणि पूजनीय सुदर्शनजींना म्हणाले, “आज विक्रम का जनमदिन है |” मी पटकन पाया पडलो. मला उभे करत त्यांनी आशिर्वाद तर दिलेच पण म्हणाले, “सर्वांसाठी काही टॉफी वगैरे आणल्या की नाही?”, मी हसून धाडसाने उत्तरलो, “वाटणार होतो, पण तुम्ही आलात आणि अचानक फारच संख्या वाढली”. ते मनमोकळे हसले आणि म्हणाले, “बालांसाठी तरी आणायच्या”. मग आम्ही गाडीपर्यंत सर्वजण निघालो. 

सर्व कष्टाचं, परिश्रमाचं चीज झालं त्यादिवशी! परमपूजनीय सरसंघचालक वाढदिवसाला पूर्णवेळ आपल्या शाखेत असावेत, त्यांनी प्रत्येक गणात सक्रिय सहभाग घ्यावा आणि आशीर्वाद द्यावेत यापरते अधिक भाग्य ते कोणते!


४. संघाच्या शाखेत कोणालाच प्रतिबंध नाही. उघड्या मैदानावर चालणाऱ्या या शाखा म्हणजे समाजाचे शक्तिकेंद्र. समाज अभिसरणाचा यशस्वी प्रयोग. यात सर्व समाजगटांतले, आर्थिक स्तरातले, जातींमधले स्वयंसेवक येत असतात. राहणीमान, शाळा, भाषा, चालीरीती, वस्ती हे सर्व भिन्न...पण स्वयंसेवकत्वाची भावना आसेतुहिमाचल तीच! ते सूत्र सर्वांना गुंफणारे. आणि एकदा ते सूत्र भिनले की मग हिंदुत्वाचे म्हणजे अखिल मानवजातीला, निसर्गाला आपलेसे मानणारे विश्वबंधुत्वाचे सूत्र आपोआप येते. त्यामुळे नित्य शाखेत जर वेगळा चष्मा लावलात तर दिसेल की काही मराठी, बंगाली, गुजराती, तेलुगू, तमिळ स्वयंसेवक खेळतायत, गीतं म्हणतायत. काही ब्राह्मण, भंडारी, तेली, लोहार, माळी, मराठे, नवबौद्ध, जैन असे स्वयंसेवक उच्चरवाने प्रार्थना म्हणताहेत..पुढे यातील कित्येकजण हा विचार समजून घेऊन प्रचारक म्हणून बाहेर पडलेले आहेत, काहीजण संघाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. हे सर्वजण आपापले प्रांतिक, भाषिक, सांप्रदायिक अभिनिवेश विसरून एकत्र येत असतात.

शाखेत असाच एक (समाज ज्याला नवबौद्ध समजतो असा) स्वयंसेवक आहे. त्याच्या लहानपणची गोष्ट. त्याचे घर एवढे लहान की दुसऱ्या एका स्वयंसेवकाच्या घरचे बाथरूम त्याच्यापेक्षा मोठे आहे! घरी एक बाबासाहेबांचा मोठा फोटो, बुद्धाची छोटी मूर्ती, कपड्यांचे गाठोडे आणि भांडी इतकेच! अर्थात अशी अनेक उदाहरणे आहेत. हे प्रातिनिधिक. तर तो शाखेत यायला लागला. रुळायला लागला. निवासी वर्गांना यायला लागला. प्राथमिक झाले. त्याच्या वस्तीतील लोकांनी त्याला सांगून पहिले, धमकावून पाहिले. तो काही काळासाठी अनियमितसुद्धा झाला. पण आत्मीय संपर्क आणि निरपेक्ष प्रेम याने परत यायला लागला. मग त्याच्या आईकडे त्या लोकांनी मोर्चा वळवला. सांगितले की ‘ते लोकं ह्याला हिंदू करतील’. आई म्हणाली, “ मला जर माझा मुलगा चांगला होताना दिसतो आहे, वाडीतील इतर मुलांपेक्षा त्याची वर्तणूक आणि प्रगती चांगली आहे तर त्याला हिंदू केलं तरी चालेल!” त्याचा अभ्यास, इतर गोष्टी याकडे जसे शाखेने लक्ष द्यायला हवे तसे दिले आणि ते घर संघाचे झाले. आता कॉलेजात शिकतो आहे तो. आजही त्या घरी हक्काने जाणे म्हणजे दोन ‘डॉक्टरांनी’ उमटवलेला ठसा कसा पक्का झालाय हे पाहणेच असते! 


क्रमशः 
पुढील पोस्ट  वाचा - http://vikramwalawalkar.blogspot.com/2010/11/blog-post_17.html

Saturday, November 13, 2010

येस सर येस सर, थ्री बॅग्ज फुल!

कॉमनवेल्थ खेळांनी आपल्या देशात ‘कसलेले’ खेळाडू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. आणि आता ‘आदर्श’ खेळाडू पुढे आले. टी.व्ही.वर एखादी मालिका चालू असते..आणि लेखक प्रेक्षकांना धक्के देण्याचा प्रयत्न करत असतो..भाग तर वाढतच राहतात आणि प्रेक्षक आधीचे संकट विसरून नव्याचा नव्याने विचार करायला लागतात, ते पुढचे संकट येईपर्यंतच! तसेच भारतातील भ्रष्टाचाराच्या मालिकेचे झाले आहे. नवे प्रकरण पुढे येते ते केवळ मागचे पडद्यामागे घालण्यासाठी. राजकारणाची घृणा निर्माण करण्याला राजकारणीच कारणीभूत आहेत.



सेवाग्राम च्या निमित्ताने काँग्रेसने पुन्हा एकदा गांधीजींच्या तत्वांना हरताळ फासल्याचे सिद्ध केले. काय तो तमाशा माणिक ठाकरे आणि अशोक चव्हाणांनी रंगवलेला. शैले शैले न माणिक्यं’ असं म्हणतात. इथे तर जागोजागी अशी माणकं सापडतील. दिल्लीला पैसे पाठवावे लागतात म्हणे. प्रदेशाध्यक्षच असा तर बाकी काय वर्णावे! ‘येस मॅडम येस मॅडम थ्री बॅग्ज फुल’ असे बालगीत आता शाळांमधून शिकवावे लागणार आहे! 

आता आदर्श सोसायटीमध्ये कशाप्रकारे खिरापत वाटली आहे ते पुढे येतंच आहे. यात कित्येक सनदी अधिकारी सुद्धा गुंतलेले आहेत. सर्वांनी फाईल पुढे सरकविण्याचा पुरेपूर मोबदला घेतलेला आहे. वास्तविक युद्धामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना ह्या जागा देण्यात याव्यात असे धोरण ठरवून बांधलेली ही सोसायटी. त्याची कशी वासलात लावली पहा. कोंकणात तर दहशतीच्या जोरावर, विमानतळाच्या नावावर, देवस्थानच्या जागांचे नियम बदलून सर्वच प्रकारांनी जमिनी हडपण्याचे प्रकार सुरु आहेत. महाबळेश्वरची जमीन हे तर याचे प्रातिनिधिक उदाहरण. यात ‘कंट्रीसाईड’ चे नेते सहभागी आहेत. हे सर्व जनतेने विसरावे म्हणून राहुल गांधीने सिमीच्या तुलनेचे प्यादे पुढे केले. काँग्रेसचा मुख्यमंत्री हा स्वकर्तृत्वाने मुख्यमंत्री होण्याऐवजी आधीच्या मुख्यमंत्र्याने केलेल्या ‘घोटाळ्यांमुळे’च त्या पदावर आरूढ होताना दिसतो आहे.

शरद पवार तर राजकारणावर पडलेली कीड आहे. ‘राष्ट्रवादी’ या शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे. काँग्रेसमधून फुटून निघणे आणि परत तिथेच पाट लावणे हा तर छंद. सोनिया इटालियन आणि हे राष्ट्रवादाला मान्य नाही, म्हणून हे निघाले बाहेर. आणि आता काय! पदराखालचे मांजर बनून उपभोग घेतायत. शेतकरी विटून गेला आहे. धान्य सडून जातं आहे. जमिनी नापीक होत आहेत. आणि हे महाशय क्रिकेट बोर्डाच्या लफड्यात रस घेताहेत. यांचे शिलेदार गुंडांच्या मांडीला मांडी लावून उरूस साजरे करतायत. आजवर कशाचेच सोयरसुतक नसलेले हे सगळे जनतेच्या पैशावर माजले आहेत. श्री.बा.रानडेंच्या ‘लेजीम’ कवितेतल्याप्रमाणे “दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले!”

पण भ्रष्टाचार ही एका पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही. सत्ताच फार कमी कालावधीसाठी मिळाल्याने कमी भ्रष्टाचार झाला असे तर नव्हे? ‘साधनशुचिता’ सांगणारेसुद्धा यात मस्त रीतीने लोळत आहेत. आपले अस्तित्व हे ‘चिखल ओला असेपर्यंतच’ हे जणू शब्दशः लक्षात घेऊन चिखल कसा ओला होईल हे पाहण्यात गुंतले आहेत. अशाने कमळात भुंगे अडकत राहतील हे तर खरेच पण ‘कमळ’ सडायला वेळ लागणार नाही. किंबहुना ती प्रक्रिया कधीच सुरु झाली आहे. दिल्लीपासून डोंबिवलीतल्या गल्लीपर्यंत याचा अनुभव येतो आहे.

अन्य प्रादेशिक पक्षांचेसुद्धा यात भरीव योगदान आहे. मुंबईतील आदर्शमधे कोणाचा ‘हात’ असेलही परंतु अन्य कित्येक ठिकाणी मराठी बांधवांना मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरु आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जवळून वेध घेतला असता तिथे प्रचंड प्रमाणात पैशांचे वाटप झाल्याचे समजले. व्यक्तिला पैसे देण्याचे दिवस संपले. या निवडणुकीत तर सरळ सोसायटीला त्यांची संख्या विचारून तितके गुणिले ठरलेले प्रमाण अशी रक्कम वाटपासाठी हातात दिल्याचे ऐकले. हा ट्रेंड नव्यानेच निर्माण झाला आहे. चाळी विकत घेऊन, टॉवर उभे करायचे आणि मग त्यात जागा घेणे मराठी माणसाला परवडते होय? मग मागल्या दराने मुंबईत परप्रांतीय आल्याची ओरड आहेच! हो अर्थात ते परप्रांतीय हे नव्हे हां...गरीब परप्रांतीय.

सगळी गुंडगिरी, धाकदपटशा, मवालीगिरी, मुजोरपणा, दहशत, मस्तवालपणा हे या ‘लोकप्रतिनिधींनी’ आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वदूर पोहोचवले आहे. मी मध्यंतरी ‘राज्य मानवाधिकार आयोगात’ काम करत असताना या सर्व बाबींचा खूप जवळून अभ्यास करायला मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले तक्रारदार, त्यांच्या तक्रारी, अनुभव हे सगळे चित्र भयावह आहे. प्रसारमाध्यमं तरी कुठे नेक राहिलीत? ‘पेड न्यूज’ ची लज्जत बऱ्याचजणांनी चाखली आहे. सापडले किती हा भाग वेगळा.


स्वतःला ‘बादशहा’ म्हणवून घ्यायचे, ‘लोकमान्य लोकशक्ती’ म्हणायचे आणि कारभार मात्र संशयास्पद करायचा. ‘सोनियांच्या कणखर नेतृत्वावर जीव ओवाळून टाकलेले’, व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या ‘इंदिरांच्या सुरम्य आठवणी काढणारे’, काल्पनिक भगवा दहशतवाद निर्माण करून कोणाच्यातरी इशाऱ्यावर ‘भगव्या दहशतवादावर चवीने लिहिणारे’ हे जेव्हा पत्रकारितेचे धडे देतात, भाषणं ठोकतात तेव्हा हसू येतं. माझा महाराष्ट्र इतका रसातळाला गेला असेल याचे बाहेरून दर्शन होत नाही. बडा घर पोकळ वासा अशी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे.

क्रांती वगैरे होणे किमान या दशकात तरी शक्य वाटत नाही. या घाण राजकारणाला कंटाळून चालणार नाही. सज्जनशक्तीचा सहभाग वाढायला हवा. उमेदवार म्हणून उभे राहायलाही हरकत नाही. पक्ष न पाहता योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. अपक्ष असला तरी चालेल. किंबहुना अपक्ष उमेदवार जेवढे अधिक निवडून जातील तेवढे बरे होईल. प्रारंभी घोडेबाजाराला ऊत येईल हे खरेच. पण उमेदवार चांगले असल्याने ती शक्यता कमी आणि जशी त्यांची संख्या वाढेल तसा हा बाजार कमी होईल. स्वप्निल चित्र असले तरी सुरुवात करायला हरकत नाही. ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल...