"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, December 16, 2012

Is Gujarat Govt. anti-Muslim?


To this modern day, in our ugly socio-politics, it has become necessary to criticize Narendra Modi and attack Gujarat Govt. to show how secular we are! That has become a fashion for self-claimed secularists who are in reality pseudo-secularists.

The Congress Govt. speaks much about religious minorities and makes a show to woo them. It has started building new(or continued with building of) Haj Houses despite Supreme Court Judgment (by Shri. Aftab Alam and Smt. Ranjana Desai JJ) to stop the Haj subsidies in phasewise manner. UPA Govt’s ‘spineless head(!)’ Mr. ‘Moun’mohan Singh depicts the famous character of ‘Dhrutarashtra’ under whose nose all sins are being committed. He went ahead in saying that Muslims of this country have first right over the resources.

Also, it has been an old and overused trick to appoint Committees and get favourable reports. It is necessary to remember few like Rajinder Sachar Committee, Rangnath Mishra Committee and U. C. Bannerjee Committee among others. Govt. acts upon such reports immediately and comes out with welfare schemes, scholarships, policies, freeships based on religion! Andhra Pradesh High Court struck down such a policy of AP State Government. For Maharashtra a similar policy was challenged in the Bombay HC; but Bombay HC failed to contemplate the dangers of the policy and could not envisage the divisive politics behind it. Now both the matters are sub-judice in the Supreme Court by way of Special Leave Petitions for ultimate decision.

But when we come to the Sachar Committee Report and Gujarat State, a very interesting piece of information I found, which is worth sharing with my readers.

Sachar Committee and its suggestion: Sachar Committee was established on March 9, 2005 under the chairmanship of Justice Rajinder Sachar to prepare a comprehensive report on the social, economic, and educational status of Muslims in Bharat. The Committee submitted its findings in November 2006.

It has suggested various measures to be taken by the Governments at Central as well as State level to elevate Muslims to a better position. The recommendation relevant here was that ‘posting a minimum of one Muslim inspector or sub-inspector in police stations which catered to a sizeable number of the minority community. This, the Sachar Committee said should be done to “not eliminate discrimination but as an initiative to build confidence”.

Thus State Governments were supposed to endeavor for this goal and implement other ideas or suggestions of the Sachar Committee.

Reality check by TOI under RTI: When Times Of India (TOI) filed and RTI query before the Home Ministry to know ‘what is the percentage of Muslims in states’ police forces’, some interesting and astonishing information has been revealed.

The highest number of Muslim police personnel is in the state of Gujarat! Then follows Assam, Kerala, W.Bengal, Tamil Nadu and Rajasthan. The picture will be clear by a look at following image. The main thing is that, states like Assam, Kerala etc. having more Muslim percentage in population than Gujarat have less percentage of policemen as compared to Gujarat. Fortunately Kerala, Assam have no BJP rule in it.

Gujarat has 5,021 Muslim police personnel in its 501 police stations compared to 2,210 Muslim cops in 451 police stations in Kerala.

State
No. of police stations
No. of police personnel
Gujarat
501
5,021
Kerala
451
2,210
West Bengal
525
2,048
Rajasthan
773
930
Jharkhand
417
616

The point which is being made here does not wish to justify the view that Sachar Committee report should be implemented. Infact on scores of issues mentioned in the Report, this author finds himself in disagreement. Many suggestions are vulnerable to criticism and rejection. The point here is to give due credit to a person who was severely blamed for spreading communal hatred. Without advertising for secularism, nearly 10 years of continuous rule in Gujarat has proved what can be a role model for other states to follow. 

Wednesday, November 28, 2012

तुमच्या माझ्यातले - मोरेश्वर आणि मोरू

मोरेश्वर उठले. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ म्हणून त्यांनी बिछाना सोडला. अलीकडे टूथपेस्ट महाग झाल्याने त्यांनी सोसायटीतल्या कडुनिंबाच्या झाडाच्या काड्या आणायला सुरुवात केली होती. त्यातलीच एक काडी चघळत त्यांनी बायकोला चहा टाकायला सांगितला. हल्ली ते कोराच चहा पीत असत कारण वाढत्या वयातल्या मुलांना महाग झालेले दूध मिळाले पाहिजे. मग ‘गंगे च यमुने चैव’ करत थंडगार पाण्याची बादली अंगावर ओतून घेऊन ते अंग पुशीत बाहेर आले. गरम पाण्याच्या आंघोळीची एवढ्या वर्षांची सवय त्यांनी हल्ली ‘वर्षाला सहाच सिलिंडर’ म्हटल्यावर सोडून दिली होती. गीझर लावला होता पण कोळशा घोटाळ्याने वीज उत्पादन कमी झाले आणि प्रति युनिट दर मात्र वाढले. तेव्हा गीझर जळल्यापासून दुरुस्तीच्या भानगडीत ते पडलेच नाहीत. ‘प्रकृतीला बरा’ अशी स्वतःच्या मनाची समजूत घालत कोऱ्या चहाचे कडू घोट रिचवीत ते पेपरवर नजर टाकत होते... मनाला निराश करणाऱ्या १४ बातम्या वाचल्यावर शेवटी ‘सचिनला फेरारी भेट मिळाली’ आणि ‘वर्ल्ड कपची भारत-पाक  सेमिफायनल फिक्स्ड होती’ या बातम्या वाचून निःश्वास टाकत ते उठले.

बायकोने दिलेला डबा आणि नेहमीची ब्याग सांभाळत ते कचेरीला निघाले. जिना उतरत असतानाच त्यांना महापालिकेत अभियंता असलेल्या xxx चे घर दिसले. डोळे दिपतील असे दार आणि दिवाणखान्यात भिंतीवर चिकटलेला मोठ्ठा सपाट टी.व्ही. पाहतानाच त्यांना डोकं आपटू पाहात असलेला भिंतीतून बाहेर आलेला ए.सी. चुकवावा लागला. दुसऱ्याच्या घरात पाहू नये ही बालपणीची शिकवण आठवत मोरेश्वर निघाले..

उशीर झालेला असल्याने ते टॅक्सीला हात करणार तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की ह्या टॅक्सीवाल्यांची भाडे आकारण्याची पद्धत सदोष आहे असे आपण सकाळीच वाचले आहे. नक्की कोणते दरपत्रक वापरायचे यात वाद आहे आणि फसवणूक होत आहे. मोरेश्वर ना वाटले की आपली नक्कीच फसवणूक होणार.. त्यातून पुढे हिंदीत भांडायचे म्हणजे ‘थांब तुमको दिखाता है, आणि शेवटी चल पुलिस के पास...’ हे सारं कठीण होऊन बसायचं. त्यापेक्षा बसने गेलेलं बरं. मग ते बस स्टॉपवर गेले तेवढ्यात त्यांना आज वाचलेली बातमी आठवली ‘बेस्ट ची भाडेवाढ – प्रवाशांत असंतोष’. त्यांनी विचार केला एक स्टॉप चालत गेलं तर जुनंच भाडं होईल ऑफिसपर्यंत..मग स्वारी चालत निघाली. मनात हाच विचार की ‘दिवसाला थोडं तरी चालावं...प्रकृतीसाठी बरं असतं ते’. स्वतःच्या मनाचं समाधान करत असताना त्यांना वरच्या xxxचा मुलगा दिसला मोटारसायकलवरून.मात्र त्याच्या कॉलेजच्या विरुद्ध दिशेने निघाला होता तो. मोरेश्वरनी विचार करणं सोडून दिलं कारण आधीच उशीर झाला होता...

चालता चालता स्टॉपवर आले तोच बस येत होती, पण ती पूर्ण खचाखच भरली होती आणि त्यामुळे कंडक्टरने न थांबवताच ती पुढे घेतली. झालं. मोरूमधला स्वाभिमान जागा झाला पण वेळ नव्हता. तेव्हा चरफडत मोरूने टॅक्सीला हात दाखवला. ‘वो अपना XX है उधर जायेंगा क्या?’ ‘नाही साहब अब टॅक्सी छोडनी है’ म्हणत टॅक्सीवाला पसार झाला. ‘फिर रुकाईच क्यूं साला’ असं मनातल्या मनात मोठ्यांदा म्हणून मोरेश्वर घड्याळाकडे पाहात पुढच्या स्टॉपकडे निघाले. पुढच्या स्टॉपवर महेश भट्ट नामक विकृताने काढलेल्या अर्धनग्न स्त्रीच्या नव्या चित्रपटाची जाहिरात झळकली होती. मोरेश्वर मनातल्या मनात लाजले आणि ‘शिंच्याला कामधंदे नाहीत’ म्हणत पुढे निघाले. चित्रपटाच्या विचाराने पावलांनी गती घेतली होती. आपल्या काळातली गार्बो आणि मन्रो आठवत मोरेश्वर पुरते लालबुंद झाले होते. कालच कथासरित्सागर आणून दिलेल्या आपल्या मुलांचे कसे होणार ह्या चिंतेने ग्रस्त होत मोरेश्वर चौथ्या स्टॉपपर्यंत पोहोचले देखील. आता एकच स्टॉप राहिला होता. झपाझप पावले टाकत त्यांनी ऑफिसला जवळ केले. सगळे आपल्या घर्मचिंब अवताराकडे पाहात असल्याची सूक्ष्म जाणीव मनात घेऊन ते स्थानापन्न झाले. टेबलावर ठेवलेल्या फाईल्सची चळत त्यांनी जवळ खेचली...

संध्याकाळी मोरेश्वर घरी निघाले. त्यांना आठवलं घरी भाजी न्यायची आहे. अर्धाच किलो कोबी हवा होता, पण हो नाही करता करता भाजीवाल्याने अख्खा आहे म्हणून पाऊणशे किलोचा गड्डा टाकलाच पिशवीत. ३ रुपयाचा मसाला दे म्हणताच ‘साहब अभी ५ रुपयेका आता है मसाला’ म्हणत त्याने पिशवीत थोडी मिरची कोथिंबीर कोंबली. ‘तुम कम देओना लेकिन ३ रुपयेकाईच देओ’ असं बाणेदारपणे आपण म्हटल्याचं समाधान वाटत असतानाच मोरूच्या कानावर शब्द आदळले, ‘अब कहां रोते हो साहब दो रुपयेके लिये’..आजूबाजूची माणसं आपल्याकडे रोखून पाहतायत आणि गालातल्या गालात हसतायत असंही मोरेश्वरला वाटलं. पुन्हा आपला मोरू झालेला त्यांनी निमूटपणे मान्य केला आणि घरचा रस्ता धरला...

बायकोकडे भाजीची पिशवी देऊन जरा कुठे ते खुर्चीत बसत होते तर बायको करवादली ‘पुन्हा जून कोबी गळ्यात मारलान् मेल्याने, आणि मिरच्या केवढ्या कमी दिल्यात..फुकट दिल्या वाटतं!” समोरच्या घरातल्या टीव्हीवर छोट्या जेरीला पिटणारा टॉम पाहून त्यांना अचानक त्यांच्या स्वयंपाकखोलीत साडी नेसलेला आणि हातात कोबी नाचवणारा टॉम दिसू लागला. मोरेश्वर स्वतःशीच हसत बसले. टी.व्ही. लावला तर कोणत्याश्या नव्या घोटाळ्याचा खुलासा चालू होता. त्यातल्या रकमेची शून्य मोजत असतानाच त्यांना आपल्याला एक डास कडकडून चावत असल्याचे लक्षात आले. गेली कित्येक वर्षे हा डास – म्हणजे ह्याचेच सातभाई – आपले रक्त शोषत असतात आणि आपण मात्र काहीच करत नाही ह्याचे आश्चर्य वाटले मोरेश्वरना. महापालिकेचे धूर फवारणी वाले येऊन गेले की ५ दिवस बघायला नको. मग पुन्हा आहेच ये रे माझ्या मागल्या. जोपर्यंत गल्लीतला कचरा साफ होत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे. पण मग निवडणुकांची बातमी टी.व्ही. वर पाहताच त्यांना वाटले की भारतालाही काही ‘डास’ चिकटून आहेत दशकांपासून...! त्यांनी असहाय्यपणे दुसरा चॅनेल लावला तर त्यावर सांगत होते ‘अब आयेगा प्रलय और होगा सृष्टी का विनाश’. मोरेश्वर बेहद्द खुश झाले...

Sunday, October 7, 2012

समाज भीषणतेचे वास्तव दर्शन : भाग - २


लहानपणी कधीतरी सर्कशीत मृत्युगोलातील चित्तथरारक कसरत पाहिल्याचे आठवते. २ मोटारसायकलस्वार त्या मृत्युगोलात अधिकच्या आकारात गोल गोल चक्र घेत असतात. अन् प्रेक्षक भयचकित होऊन तो खेळ पाहत राहतात.

मुंबईतल्या रस्त्यांवर असे मृत्युगोलातील जीवघेणे खेळ आज कित्येक जणांचे बळी घेऊन राहिले आहेत. परंतु अजूनही गांभीर्याने याचा विचार होताना दिसत नाही. हेल्मेट सक्तीचा जेवढा आग्रह पोलीस करताना दिसतात तेवढा मोटारसायकलस्वाराचं वय, लायसन्स, वेग, आवाज याबाबतीत करताना दिसत तरी नाहीत.

चारचाकी गाडी आणि दुचाकी यात सर्वात मुख्य फरक आहे तो म्हणजे ‘तोल’ सांभाळण्याचा. दुचाकी पडण्याला जास्त वाव असतो. शिवाय हेल्मेट नसेल तर डोक्याला मार लागतो अन् हेल्मेट असेल तर मान मोडण्याचा, मुरगळण्याचा संभाव असतो. तरुणाईने खरंच आपल्याला बाईक चा उपयोग किती, आवश्यकता किती अन् शौक किती याचा विचार करायला हवा.

१२ वी मध्ये शिकणारा एक स्वयंसेवक. डिझेलची ‘एन्फिल्ड’ घेऊन जेजे च्या फ्लायओव्हर वरून धडधडत चालला होता.. उतारावर तोल गेला अन् घसटत फरफटत गेला..डोक्याला जबरी मार लागून मृत झाला. त्याच्या आई वडिलांना हा खूप मोठा धक्काच होता. पण घडायचे ते घडले होते.
दुसऱ्या एका उदाहरणात २ जण चालले होते मोटारसायकलवरून. चालवणारा १२वीत अन् मागे बसलेला १०वीत. वरळी सीफेस येताच वेग घेतला १००-१२० चा. अन् काळाने झडप घातली. तोल गेला...दोघेही वाईट रीतीने फुटपाथला आपटले..१० वीतल्या मुलाचे डोके (कवटी) फुटली, चेहरा विद्रूप झाला आणि तेव्हा जो बेशुद्ध झाला तो ५ दिवस तसाच होता हॉस्पिटल मधे. आणि त्यातच निवर्तला. आई-वडिलांवर दुःखाची कुऱ्हाड. १२ वीतल्या मुलाचा खांद्यातून हात निखळला आहे, चेहरा प्रचंड सुजलाय पण सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. म्हटलं तर दोघेही अल्पवयीन. दोघांकडेही लायसन्स नाही. आणि झालेल्या गोष्टीचा फारसा अन्वयार्थ लावण्यातही काही अर्थ नाही. या वर्षभरात अशी अजून ३ उदाहरणे ऐकली. ही फार भीषण परिस्थिती आहे. पालकांनीच यावर नियंत्रण ठेवायला हवे.

बँकेतील एक बाई सांगत होत्या की त्यांच्याकडे एक माणूस आला अचानक ३५-४० हजार रुपये काढायला; जेव्हा त्याच्या खात्यात बॅलन्स फक्त लाखभर रुपयेच होता. आता बँकेतील कर्मचारी ओळखत असतात आपल्या नियमित खातेधारकांना. त्यांचे एक नातेसंबंध तयार झालेले असतात म्हणून त्या बाईंनी विचारले की काही अडचण आहे का? त्या व्यक्तीच्या कॉलेजवयीन मुलाने बाईक विकत घेण्यासाठी हट्ट धरला होता. कारण अगदी साधे सोप्पे होते..त्या मुलाच्या ‘ग्रुप’मधील सर्वांकडे मोटारसायकली होत्या! आणि हेच सार्वत्रिक चित्र आहे. कीर्ती कॉलेज, रुईया कॉलेज आणि तत्सम अन्य कॉलेजबाहेर बघा. बाईक्स ची भलीमोठी रांग असते. पूर्वी नंबरप्लेटवर ‘आई’ ‘दादा’ वगैरे लिहिलेलं असे. क्वचित ‘मी मराठा’ वगैरे. आता राजकीय पक्षाचे चट्टेरीपट्टेरी रंग दिसतात! एकमेकाची बाईक घेऊन फिरायला अन् फिरवायला नेणारी मुले दिसतील. जवळपास राहणारीच असतात..वरळी पोलीस कँप, माहीम पोलीस कॉलनी, मच्छिमार कॉलनी, दादर, बीडीडी चाळी, लालबाग-परळ इ. पण तरीही ‘गाडी’ हवीच असते. शिवाय इंधन दरवाढीचा काही फरक पडताना दिसून येत नाही. आज शिवाजी पार्कला भरधाव वेगात ‘फटफटी’ हे नाव सार्थ करत ४-४ चकरा मारणारे घनचक्कर दिसून येतात. गाडी पार्क करतानाही इंजिन चालूच. अजून एक स्टाईल म्हणजे बाईक दुकानासमोर उभी करायची चालू अवस्थेत, न्यूट्रल मधे आणि उतरून सिगारेट घेऊन पेटवून यायचं.. तोपर्यंत इंधन जळतच असतं. मग पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मोर्चात सामील व्हायला परत मोकळे!

दुचाकीला विरोध नाही. गरजेला प्रत्येकाला चालवता आलीच पाहिजे. गावाला तर ती आवश्यकता आहे. पण जीव धोक्यात घालून, प्राणांची पर्वा न करता करायला ते काही देशरक्षण नव्हे. कॉलेजात गेलेला आपला मुलगा काय करतो आहे हे कदाचित आई-वडिलांना माहितही नसेल आणि तसे लक्ष ठेवणे शक्यही नसते, परंतु आपल्या मुलाला कितीही हट्ट केला तरी बाईक घेऊ न देणे हे तर पालकांनी निष्ठुरपणाने करायला हवे अन्यथा त्याच्या भीषण परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवायला हवी.

या लेखामुळे एखाददुसऱ्या पालकाने जरी आपला निर्णय बदलला आणि मुलाच्या हितासाठी बाईक न घेऊन देण्याच्या निर्णयावर ठाम राहिला तरी लेखनसार्थक झाल्यासारखे वाटेल.

या शृंखलेतील आधीचा लेख वाचण्यासाठी - http://vikramwalawalkar.blogspot.in/2012/10/blog-post.html

क्रमशः ...

Tuesday, October 2, 2012

समाज भीषणतेचे वास्तव दर्शन : भाग - १


गेल्या काही दिवसातील अनुभव हे समाज स्थितीचे दुःखद पण वास्तविक दर्शन घडवणारे होते. मन विषण्ण आणि सुन्न करणारे होते आणि म्हणूनच ते सर्वांसमोर मांडावे असे वाटले.

त्याचे शाखेत येणे बंद झाल्याने एका नववीतल्या स्वयंसेवकाच्या घरी गेलो होतो. शाखेत बोलवायला आणि हिवाळी शिबीराला येणार का ते विचारायला. तसा सुट्टीचाच कालावधी होता, घरचेही कुठे बाहेर जाणार नव्हते; पण तरी आई त्याला सोडला तयार नव्हती. खूप विचारले असता म्हणाली हा मित्रांबरोबर सिगरेट ओढतो आणि त्यामुळे त्याला हल्ली आम्ही कुठेच सोडत नाही. मलाही तो धक्काच होता. एका मोठ्या देवळात पुजारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचा हा प्रतिनिधी. सकाळ संध्याकाळ पूजा-अर्चा, पुरुषसूक्त, नियमित संध्या, सोवळे नेसून भस्म विलेपन करणारा हा असंही काही करत असेल यावर विश्वासच बसेना. मी त्याला घेऊन बाहेर गेलो. गुरुद्वाराच्या पायरीवर बसून खूप गप्पा मारल्या. त्याने खुलासा केला तो असा : “आमच्या जवळ राहणारी २ तिसरीत शिकणारी मुले आहेत. ज्यांना त्यांचे आजोबा पैसे देऊन स्वतःसाठी सिगारेट्स आणायला दुकानात पाठवतात. एक दिवस आजोबांनी सांगितलेलं नसतानाही ती मुले पैसे घेऊन स्वतःसाठी (!) सिगारेट घेऊन आली. मग एका गुप्त ठिकाणी जाऊन आम्ही ‘पहिला’ अनुभव घेतला! एक झापाचे पडीक बांधकाम होते, जे आमचा अड्डाच बनले. मग झाडाची पाने आणून त्यात भुसा भरून धुमसणाऱ्या भुशाचा ‘कश’ इ. गोष्टी सुरु झाल्या. आणि एकदा कोणीतरी बघितल्यावर घरी समजले.” तो पुढे डोळ्यांत पाणी आणत म्हणाला, “आई-बाबांना आणि आजोबांना कळले तेव्हा मला खूप वाईट वाटले. मी ती गोष्ट करत असताना वाटायचे आपण खूप काहीतरी सॉलिड करत आहोत. वर्गातली इतर सगळी मुलं तुच्छ आहेत आणि आपण हिरो आहोत असं वाटायचं. पण मी तुम्हाला वचन देतो, यापुढे कधीच आयुष्यात असं करणार नाही.” माझा कार्यभाग झाला होता. मी त्याला घरी घेऊन गेलो. घरचेही शिबिराला सोडायला तयार झाले. पण त्या तिसरीतल्या मुलांचं काय? त्यांच्या आजोबांची योग्यता काय? केवळ वयामुळे आजोबा?

पुढची २ उदाहरणे तशी समांतरच. तपशीलांचा थोडाफार फरक परंतु प्रातिनिधिक उदाहरणे. महानगरपालिकेच्या चतुर्थ वर्ग श्रेणीच्या कामगारांच्या वस्तीत एका स्वयंसेवकाचे– ‘क्ष’ चे घर. वस्ती बव्हंशी नवबौद्ध. आई ५ घरची धुणीभांडी करणारी. लहानपणापासून ‘क्ष’ स्वयंसेवक. सध्या १३ वीत. एक दिवस अचानक आईचा फोन येतो –“जरा येऊन जाल का? काम आहे”. मला २ दिवस जमत नाही.. तिसऱ्या दिवशी गेलो तर समजते, ‘क्ष’ परवाच घर सोडून गेला आहे तो अजून काही परतलेला नाही. ‘क्ष’ चा फोन लावून पाहतो तर बंद. अजून थोडी फोनाफोनी केली, त्याच्या मित्र म्हणवणाऱ्या वस्तीतील काही मित्रांना ‘प्रेमळ’ डोस दिले. पाचव्या मिन्टाला मला फोन. म्हटले तुला भेटायचे आहे. त्याचे उत्तर: आज शक्य नाही, मी लांब आहे. उद्या संध्याकाळी भेटू. मी म्हटले हरकत नाही. मी वाट पाहेन. मग एक इमोशनल मेसेज केला. त्याच्या मोबाईलवर मेसेज पाहताच मला पीसीओवरून फोन..”कुठे आहात, आत्ताच भेटायचे आहे”. भेट होते. मी गप्पा मारायला सुरुवात करतो. पाच मिनिटात तो म्हणतो, “चला घरी जाऊया”.. मी मुद्दाम थोडे खेचतो, म्हणतो “कशाला, राहा की जरा बाहेर”. त्याला राहवत नाही. मी घरी घेऊन जातो. आईवडील आश्चर्यचकित. आईच्या डोळ्याला थार नाही. ३ दिवस गायब असलेला मुलगा अर्ध्या तासात घरी. यश माझे नाही, त्या अजब बंधनाचे यश. मुख्य मुद्दा हा की, आईवडील संध्याकाळी बाहेर सोडत नाहीत. संगत वाईट असा त्यांचा संशय. दारू पिऊन येईल अशी भीती. त्याचे म्हणणे माझे मित्र चांगले. तिढा कसा सुटावा. दोन्ही पारडी तोलताना माझा जीव मेटाकुटीला. मधेमधे त्याच्या नावाने बोटं मोडणारी आजी. मामी दाताने दुधाच्या पिशवीचा कोपरा फाडून चहा टाकते. छोट्याशा खोलीत मी ठराविक दिशेने चर्चा नेण्याच्या प्रयत्नात. शेवटी ठरते काहीबाही. चहा झाल्यावर  “उद्या नक्की या” या आग्रहात मी घर सोडतो. पण सर्व घटनाक्रम माझी पाठ सोडत नाही...

कारण असाच एक दुसरा मुलगा ‘य’ संपूर्णपणे दुसऱ्या वस्तीतला. उच्चशिक्षित आईवडिलांचा. उत्तम सांपत्तिक स्थितीतला. ‘य’ १४ वीत. आई-वडील चिंतेत कारण वर्षभरापासून ‘य’ वाईट संगतीत. रात्री उशिरा घरी येणे, कधीकधी दारू पिऊन येणे. मध्यंतरी २ दिवस गायब होता. तिसऱ्या दिवशी आला. विचारल्यावर म्हणतो रत्नागिरीला होतो! मोबाईल तर विकलाच होता. पण शिवाय वडिलांकडे अजून पैशाची मागणी. त्या २ दिवसांतली मित्रांची उधारी फेडायला. विचारल्यावर उलट म्हणतो, “मला पोट नाही का? भुकेसाठी घेतले पैसे”. आई वडील चिंतादग्ध होऊन एका प्रख्यात गुप्तहेर बाईंकडे. जाणून घ्यायला की ‘य’ नक्की कोणाच्या संगतीत असतो. पैसे गेले पण संगत समजली नाही. मुलाचा फोन आल्यावर/लागल्यावर आईवडील त्या बाईंना सांगत की ‘य’ इथे असावा..त्या म्हणत माझे एजंट्स पाठवते. शोध शून्य! मग एका प्रख्यात स्तंभलेखक डॉ.मानसोपचारतज्ञाकडे. तिथेही भरमसाठ पैसा मोजून हाती काहीच नाही.

या प्रातिनिधिक उदाहरणांची खोली खूप गहन आहे. संध्याकाळी मैदानात, चौपाटीवर, बागेत तरुणांचे अनेक गट दिसतात मद्यप्राशन करताना. घरी काय होत असेल त्यांच्या? प्रकृतीचं काय? लग्नाआधी मुलीला अन् तिच्या घरच्यांना कल्पना देत असतील का? हा सगळा पैसा कुठून येतो? काहीही असलं तरी संध्याकाळी अतूट श्रद्धेने देवघरात निरांजन लावणाऱ्या त्या माउलीच्या डोळ्यातील समई कायम तेवत असते मुलाची वाट बघत...

Sunday, August 12, 2012

इस्लामी दहशतवादाचा भेसूर चेहरा.


आसाममध्ये चाललेला हिंसाचार हा जरी भारतीय विरुद्ध बांगलादेशी असा असला तरी तो आसामी हिंदू विरुद्ध बांगलादेशी मुसलमान असा आहे हे आता लपून राहिलेले नाही. मुसलमान केवळ इस्लाम च्या नावावर एक होतो हे जागतिक सत्य पुन्हा एकदा अनुभवायला मिळालेलं आहे.

मुंबईत काढलेल्या गेलेल्या मोर्चाला ‘हिंसक वळण लागले’ वगैरे गोंडस शब्द वापरून डोक्यावरून चादर ओढून घेण्याचे काम वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या आणि त्यांच्यावर देवापेक्षा अधिक विश्वास असलेला सामान्य हिंदू करणार आहे. पण ही रात्र वैऱ्याची आहे.

‘काश्मीर ला स्वतंत्र करणार’, दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर झालेल्या स्फोटाला कारणीभूत असणारे अतिरेकी काश्मीरमध्ये मारले गेल्यावर ‘त्यांना वीरमरण आले, असे अनेक वीर तयार होतील’, ‘एक दिवस दिल्लीला काश्मीरमधून माघार घ्यावी लागेल’ ही सर्व वक्तव्ये आहेत सय्यद गिलानीची. आणि त्याने ती श्रीनगर हून केली आहेत. त्याच अतिरेक्यांच्या दफनविधी वेळी. त्याच्याविरुद्ध भारत सरकारने काहीही केले नाही.

दुसऱ्या घटनेमध्ये एका दिल्लीस्थित उच्चपदस्थ आय.ए.एस. अधिकाऱ्याच्या मुंबईत राहणाऱ्या पल्लवी पुरकायस्थ या २५ वर्षीय वकील तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाला आणि तिने विरोध केल्याने तिला मारून टाकण्यात आले. तो होता सज्जाद अहमद मुघल. काश्मीरहून आलेला मुसलमान. त्याने सुरक्षा एजन्सी कडे आपला पत्ता ‘लाल चौक, श्रीनगर’ एवढाच दिला होता. आणि तो इमारतीवर सुरक्षा रक्षक होता. असे अनेक मुघल बांगलादेश, पाकिस्तान इथून येऊन भारतात राहत आहेत. तुमच्या आमच्या इमारतीवर सुरक्षा रक्षक आहेत, बांधकामावर आहेत, दुधात भेसळ करत आहेत, बनावट चलन आणत आहेत. आणि मुख्य म्हणजे एका मोठ्या कटाचा भाग आहेत, ज्याचे नाव मुघलीस्तान अथवा दार-उल्-इस्लाम.

तिसरी आणि महत्वाची घटना म्हणजे आझाद मैदानातील देशद्रोही जमावाने केलेली दंगल. बांगलादेशातून आसाममध्ये घुसखोरी केलेल्या मुसलमानांना बोडो हिंदूंनी जीवावर उदार होऊन चोप दिल्याने तिथली परिस्थिती काहीशी बिकट झाली. अनेक वर्षे संयमितपणे वाट पाहूनही काहीच होत नाही हे पाहून बोडोंनी दोन घेतले दोन दिले या भूमिकेतून स्वतःच लढायला सुरुवात केली, जी प्रतिक्रिया बांगलादेशी मुस्लिमांना अनपेक्षित होती.

देशभर याची प्रतिक्रिया उमटली. प्रसारमाध्यमांनी गुजरात दंग्यांच्या वेळी जेवढे रान उठवले होते त्या तुलनेत आसामचे वृत्त फारच तुरळक प्रमाणात आले. बोडोंना विश्व हिंदू परिषद, सेवाभारती यांनी मदत पोहोचवायला सुरुवात केली. आजही कित्येक बोडो घरेदारे जळल्यामुळे, लेकी-बाळी नासवल्या गेल्यामुळे निर्वासित छावण्यांमध्ये राहात आहेत. आणि अजूनही मुसलमानांचे सेनादलाच्या जवानांवर, पोलिसांवर हल्ले चालूच आहेत.

मुंबईत ‘रझा अकॅडमी’ आणि अन्य कट्टरपंथीय मुस्लीम संघटनांनी एका दंगलीचे आयोजन आझाद मैदानात केले होते. अण्णा हजारेंना काहीच दिवसांपूर्वी आझाद मैदानात उपोषणाची परवानगी नाकारली गेली होती. पण मुंबई पोलिसांनी अर्थातच राजकीय दबावाखाली उपरोल्लेखित संस्थांना ती परवानगी दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते सरळच या दंगलीला कारणीभूत असल्याचे दिसते आहे. त्यांच्याच सांगण्यावरून पोलिसांनी परवानगी दिली. जेव्हा इराकवर अमेरिकेने हल्ला केला तेव्हाही याच देशद्रोही मुस्लीम संघटनांनी असाच हिंसक प्रकार केला होता ज्यात महापालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानक, अशा ठिकाणांवर दगडफेक केली होती. पण तरी त्या संस्थेवर ना बंदी आली, ना त्यांच्याकडून नुकसानभरपाई घेण्यात आली. आणि काल ११ ऑगस्टला इस्लामचा खरा चेहरा पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

मोर्चात प्रक्षोभक भाषणे चालू होती, सतत आसाममधल्या घुसखोर बांगलादेशी मुस्लिमांची बाजू घेण्यात येत होती, त्यांच्यावर अत्याचार चालू असल्याचे चित्र भासविण्यात येत होते. आणि जमावाला गरम करण्यात येत होते. गर्दी वाढत होती. सर्वांना एकाच माहिती होते – ‘इस्लाम खतरे में है |’ आणि त्यामुळे दंगा करायला जमाव उत्सुक आणि उतावीळ झाला होता. काही ठिकाणी तर असे वृत्त आहे की कालच्या प्रकारासाठी गेले काही दिवस मशिदीतून ‘प्रबोधन’ करण्यात येत होते. आणि दीन दीन म्हणत जसे यवन तुटून पडत असत तसाच प्रकार काल अनुभवायला मिळाला. अत्रेंच्या कवितेतल्याप्रमाणे ‘हैदोस दुलाबे धुल्ला’ सुरु झाला. लोकांनी केवळ डोक्यात भरूनच नव्हे तर हातातूनही दगड आणले होते. काठ्या होत्या. जाळपोळ आणि तोडफोड सुरु झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ५२ पोलीस जखमी झाले. कित्येक रक्तबंबाळ झाले. ३ पोलिसांच्या मोठ्या गाड्या चक्क जाळून टाकण्यात आल्या. पाच खासगी गाड्या-दुचाक्यांसह ११ गाड्या जाळल्या आणि ४९ बेस्ट बसेस ची तोडफोड करण्यात आली. ३ ओबी व्हॅन्स जाळण्यात आल्या. त्यातल्या एकात अमित खांबे आणि त्याचे २ सहकारी होते. जमाव बाहेरून ओरडत होता ‘मारो- जला दो’.. कसेबसे सगळे बाहेर पडले आणि जमावाने ती गाडी पेटवून दिली.

ह्या सर्व घटना वेगवेगळ्या नाहीत. त्या एका मोठ्या कटाचा भाग आहेत. जो काही गुप्त कट नाही. जे चीनच्या झिन्झियांग प्रांतात चालू आहे, जे इराक-इराण मध्ये चालू आहे, जे लंडन मध्ये, बेल्जिअममध्ये आणि पॅरिसमध्ये चालू आहे त्याच डिझाईनचा हा एक छोटा भाग आहे हे सर्वजणांनी समजून घेण्याची गरज आहे. बरबटलेले राजकीय पक्ष आणि नेते याविरुद्ध तर काही करणार नाहीतच किंबहुना तेच याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहाय्यक आहेत.

जे पोलीस जखमी झाले त्यांचे काय? त्यांच्या कुटुंबाचे काय? ज्या घरच्या लहान मुलाने त्याचे रक्तबंबाळ झालेले पोलीस वडील पहिले असतील त्याचे काय? ४९ बेस्ट बसेस जाळल्या. त्याचा खर्च हा उद्या तुमच्या आमच्या खिशातून जाणार आहे. तो रझा अकादमी आणि अन्य मुस्लीम संस्थांकडून वसूल करण्यात येणार का? एरवी साप-साप म्हणून भुई थोपटणारे मानवाधिकार वाले पुढे येणार का? कोर्ट याच्यावर स्वतःहून कृती करणार का? आझाद मैदानाजवळ ही दंगल सुरु केल्यावर एक आजोबा आणि त्यांचे २ लहान नातू जखमी झाले आणि घाबरेघुबरे होऊन धावतपळत दुकानाच्या आश्रयाला गेले. स्वतंत्र भारतात अशा भारतीयांना शांतपणे आणि आनंदाने जगण्याचा अधिकार नाही काय? उद्या आपल्या गल्लीत स्फोट घडणार आहेत. तुमची बहीण, प्रेयसी अत्याचारांना बळी पडणार आहे. तुमचा भाऊ, पती कामावरून घरी पोहोचेलच असे नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी दगडफेक, जाळपोळ वाटेल तेव्हा घडणार आहे. पोलीस आणि अन्य सुरक्षादले तुमच्या मदतीला धावून येईपर्यंत तुमचे शवसुद्धा सुरक्षित राहील की नाही अशी शंका आहे! मुसलमानांना जर शांततेने राहता येणार नसेल तर त्यांच्या या चिथावणीखोर नेत्यांना कोणी उद्या टिपून काढले तर आश्चर्य वाटायला नको. ही प्रक्रिया जगभर सुरु होणार आहे. आपली कबर वेगाने खणायला घेतलेल्या ह्यांचा अंत आधीच लिहून ठेवलेला आहे. जन्नत मिळवण्यासाठी सुंदर जगाचा नरक करणारे हे राक्षस निर्दाळून टाकावेच लागतील.


किंबहुना शिशुपाल स्वतःहूनच घडे भरणार असेल तर उद्या त्याच्या वधाचे नाट्य रंगल्यास अचंबा वाटायला नको. रात्र वैऱ्याची आहे...
 


Saturday, August 4, 2012

वाघ्या...




रायगडावर शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या इमानी कुत्र्याची समाधी/स्मारक आहे. हा वाघ्या शिवरायांचा इमानी कुत्रा तर होताच परंतु शिवराय गेल्यानंतर या वाघ्याने त्यांच्या चितेत उडी घेऊन आत्मसमर्पण केले असे म्हणतात. ते शिवरायांच्या समाधीसमोर चे स्मारक काही समाजकंटकांनी उखडून टाकल्याचे वाचनात आले. हे समाजकंटक ‘संभाजी ब्रिगेड’ (संब्रि) या समाजविघातक संघटनेशी सबंधित असल्याचेही वृत्त आहे. लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळाही यांनीच कापून काढला  होता. तेव्हा सध्या या संब्रि लोकांना फारच सराव झालेला आहे. तुमच्याही येथील काही जुनेपुराणे नासधूस टाकायचे असेल तर यांना अवश्य बोलवा.

गंमत ही आहे की, अशाप्रकारे राष्ट्रीयतेचे परिचायक असणारे पुतळे अथवा स्मारके काढून टाकून इतिहास बदलता आला असता तर बघायलाच नको होते. गुलामगिरीचे आणि अन्यायाचे चिन्ह मिटवायलाच हवे याबद्दल दुमत नाही पण आपली शक्ती अशाप्रकारे जर प्रेरणादायी इतिहास बदलायला कोणी लावणार असेल तर खचितच ते निंदनीय आहे.


मजेचा भाग असा की, एका निर्जीव कुत्र्याचे ब्रॉन्झ मधील शिल्प उखडायला कितीजण लागावेत? वृत्तानुसार पोलिसांनी आत्तापर्यंत संब्रि च्या ७३ जणांना पकडले आहे ज्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आणि अजून २०० जण फरार/बेपत्ता आहेत. म्हणजे जवळपास २७५ जण लागले एका निर्जीव कुत्र्याची समाधी उखडायला? चांगलाच घामटा काढलास की रे वाघ्या! वाचूनच दया येते, की बिचारे २७५ भ्रमित तरुण आपला वेळ आणि आपली शक्ती आपल्याच इतिहासाची मानचिन्हे मिटवायला लावतात.

अरे तुम्हाला कार्यक्रम हवाच होता ना काही, तर अशा कित्येक गोष्टी आणि स्मारके आजही आपल्या उरावर बसून आहेत जी जेवढ्या लवकर नष्ट होतील तेवढे बरे, त्यासाठी वेळ घालायला हवा होता. मजहबाच्या नावावर राष्ट्रविघातक शिक्षण मिळणाऱ्या काही शिक्षणसंस्था(?) सरकारी अनुदान घेऊनच चालत आहेत. त्याला विरोध करा. तिथे जाऊन विरोध प्रदर्शन करा. आहे खरी खुमखुमी, तर आसामला जा आणि तुमच्या हिंदू बांधवांचे रक्षण करा. जम्मू-काश्मीरमध्ये जा आणि श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा. एवढे लांब कशाला महाराष्ट्रातल्या खेडोपाडी हिंदू समाजातल्याच ठराविक वर्गाला हिणवले जाते आणि सार्वजनिक ठिकाणी पाणीही दिले जात नाही, तिथे तुमची शक्ती दाखवा. ‘लव्ह जिहाद’ च्या अंतर्गत तुमच्या आमच्या बहिणींना आज भयानक रीतीने जाळ्यात ओढून, बाटवून, नासवून टाकण्याचे मोठे कारस्थान पुणे, नागपूर, जालना अशा ठिकाणांहून चालू आहे. तिथे वापरा शक्ती. नुसते शिवरायांच्या नावाचे तुणतुणे वाजवून काहीच व्हायचे नाही.

Sunday, July 15, 2012

संत तुकाराम

संत तुकाराम हा विषय खरा लेखाचा नाहीच. तो अनुभूतीचा विषय आहे. पण नुकताच नवा ‘संत तुकाराम’ चित्रपट पाहणे झाले आणि त्या विषयावर विचारप्रकटन करावेसे वाटले.
अणुरणीया थोकडा...तुका आकाशाएवढा..


‘श्वास’ पासून बरेच दर्जेदार चित्रपट येऊ लागले. कारणे काहीही असोत – शासनाकडून मिळणारी ‘टॅक्स फ्री’ ची सूट असेल किंवा अनुदानाचे आमिष असेल, अथवा चित्रपटगृहांना मराठी सिनेमे लावण्याची सक्ती असेल परंतु मराठी चित्रपट भरपूर येऊ लागले. अगदी टुकार चित्रपटही पासरीला पन्नास आहेत. विनोदाच्या नावाखाली बाष्कळपणा करणारे अभिनेते, अंगप्रदर्शन करणाऱ्या नट्यांचे नृत्याविष्कार (?) आणि अमराठी निर्मात्यांची गुंतवणूक यांचा समावेश असलेले सिनेमे उदंड जाहले. कोणी एक अभिनेता-निर्माता मराठी अस्मिता जागवणारे सिनेमे काढत सुटलाय.शिवरायांच्या हुकमी नाण्याला बाजारात विकायचे. असो. तरीही हे मान्य करावेच लागेल की मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत.
काल्पनिक कथानाकांपेक्षा वास्तवात घडून गेलेल्या व्यक्तिरेखांच्यावरील दर्जेदार चित्रपट आले आहेत. उदा. बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, अजिंठा, वासुदेव बळवंत फडके आणि याच यादीतला अगदी अलीकडचा ‘संत तुकाराम’.
संत तुकारामांच्या जीवनचरित्रातील अनेक ज्ञात-अज्ञात पैलू चित्रपटात येऊन गेले आहेत. तुकारामांच्या बालपणापासून सुरुवात झालेला हा सिनेमा प्रेक्षकाला मध्यंतरापर्यंत चांगलेच खिळवून ठेवतो. आणि मध्यांतरानंतरही ही पकड ढिली होत नाही. कर्णमधुर संगीताने सजलेली गाणी आणि सुंदर छायाचित्रण यांचा मनोहारी मिलाफ आहे. बोलबच्चन च्या या बाष्कळ युगात हा चित्रपट काढल्याबद्दल लेखक – दिग्दर्शक – निर्माते यांना मला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात.    
 
लहानपणीचे तुकाराम, त्यांचे सवंगड्यांबरोबरचे खेळ, मस्ती, नदीत डुंबणं वडिलांना प्रश्न विचारणं हे बालपण दाखवून त्यानंतर हळूहळू कारुण्यपातळी वाढवत नेली आहे. कधीकधी तर डोळ्यात पाणी येतं, अंगावर शहारे उठतात. दुष्काळाचे भीषण चित्रणही यात आले आहे. गुरे, माणसे पटापट मरतात..शुष्क माळराने, सुक्या विहिरी, सांगाडे आणि तुकोबांच्या घरातील मृत्यू असे हृदयद्रावक प्रसंगही आले आहेत. दुष्काळात तुकोबा आपल्या घरातील साठवलेले धान्य लोकांना मुक्तहस्ते वाटून टाकतात. लोकांची झुंबड उडते आणि शेवटी तर लोक हमरीतुमरीवर आल्यासारखे भांडतात. तुटून पडतात धान्यावर. तुकोबांना हा एक धक्का असतो..की लोकांना आपले भलेही कळत नाही. असाच एक दाहक अनुभव त्यांना येतो. घरात आईचा मृत्यू झाल्यावर ते तेराव्याचे गावजेवण घालतात. त्यात लाडू वाटतात. नंतर सर्व पंगत उठल्यावर एक स्त्री (तुकोबांच्या आईची मैत्रीण) निरोप घ्यायला आणि सांत्वन करायला म्हणून येते. तुकारामांच्या घरातले सर्वजण भावूक होतात. तुकोबा पाया पडायला म्हणून वाकतात, ती स्त्रीही पटकन खाली वाकते अन् त्या धांदलीत तिच्या ओच्यात घेतलेले लाडू पटापट खाली पडतात. ती ओशाळं हसते आणि म्हणते “घरात जरा ह्यांना...”. तुकोबा काही बोलत नाहीत. नंतर तुकारामांची पहिली पत्नी आजारी असते तर गावातले लोक मधेमधे येऊन चौकशी करतात. त्यामागचा खरा हेतू असतो तिचा मृत्यू झाला तर आपल्याला गावजेवण मिळेल आणि एकवेळचे तरी चांगले खायला मिळेल. तुकारामांच्या दुसऱ्या बायकोच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर ती सर्वांना कठोर बोलून हाकलून लावते. किंबहुना म्हणूनच तुकोबा आपले समाजप्रबोधनाचे काम जोराने सुरु ठेवतात. 
शिवरायांची भेट हा एक हृद्य प्रसंग आहे. हिंदुत्व रक्षण करणाऱ्या शिवरायांना संतांचे मोलाचे सहकार्य लाभले. किंबहुना आपल्या हिंदूराष्ट्राची ही परंपराच आहे – की केवळ बळ असून चालत नाही तर मानवकल्याणासाठी बळाच्या बरोबरीनेच विवेकबुद्धीही असावी लागते. हिंदू समाज म्हणून नेहेमीच ‘शापादपि शरादपि’ या भूमिकेत राहिला आहे. शास्त्रांच्या रक्षणासाठी शस्त्रांची आवश्यकता असते. हिंदू देवदेवता शस्त्रसज्ज आणि सद्रक्षणासाठी नित्यसिद्ध आहेत. हेच काम राजे आणि संतांनी वेळोवेळी केले. राजांनी सज्जनांना बलशाली बनवण्याचे प्रयत्न केले तर संतांनी बलवंतांना सज्जन बनवण्याचे काम केले. आणि म्हणूनच शक्ती आणि भक्ती या दोहोंचीही समाजाला गरज असते. केवळ एकाने चालत नाही. शिवरायांच्या बाबतीत संत तुकाराम किंवा संत रामदास यांनी हेच काम केले. चित्रपटात त्यांच्या भेटीत तुकोबांनी हा स्पष्ट उल्लेख केला आहे. की तुम्ही हे शक्तिजागरणाचे काम करायचे आणि आम्ही त्यात युवकांना आणि जनतेला जोडण्याचे, सहाय्यभूत करण्याचे कार्य करायचे. उदाहरणादाखल एक प्रसंग दाखवला आहे. दोन लांडग्यांशी एकट्याने झुंज घेणाऱ्या एका शूर तरुणाला तुकोबा शिवरायांच्या सेनेत भरती होण्याचे सुचवतात आणि पुढे लढाईत तो मावळा कामी येऊन शिवराय स्वतः त्याची रक्षा घेऊन त्या वीराच्या वडिलांना भेटायला येतात. तिथेच तुकोबांची पहिली भेट होते आणि तुकोबा राजांना घेऊन त्या घरी जातात. त्या वीरपित्याचे सांत्वन करतात, आणि स्वराज्याच्या कामी आल्याचा गौरवदेखील करतात. 

तत्कालीन सामाजिक परिस्थितीचेही चित्रण यात आले आहे. विशेषतः जन्माधारित वर्णव्यवस्था कशाप्रकारे मूळ पकडून होती आणि भेदाभेदाचे जळजळीत वास्तव कसे सहन करावे लागत असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. आजही या परिस्थितीत विशेष फरक पडला असेल असे नाही. तुकोबांना स्वतःला अनेक ठिकाणी ‘वाणी’ म्हणून उपरोधिक उल्लेखाला सामोरे जावे लागलेले आहे. गीतेवर, वेदावर बोलतो म्हणून अपमान सहन करावा लागलेला आहे. मंबाजी आणि अन्य स्वयंघोषित ब्राह्मणांनी कशाप्रकारे तुकोबांसारख्या संतांना अपमानित केलं, समाजासमोर हिणवलं, आणि धर्मपीठासमोर उभं केलं याचं वास्तववादी चित्रण झालं आहे. धर्मपीठासमोर तुकोबांवर आरोप ठेवला जातो की त्यांना वेदावर बोलण्याचा अधिकार नाही, गीतेचे निरुपण करण्याचा अधिकार नाही कारण त्यांचा जन्म उच्च जातीत झालेला नाही. तुकोबाही आपली बाजू मांडतात. परंतु तत्कालीन कर्मठ आणि मूर्ख पंडित त्यांना दोषी ठरवून शिक्षा फर्मावतात. 
अशासारख्या तथाकथित ब्राह्मण लोकांनी हिंदू समाजाची आणि धर्माची अपरिमित हानी केली आहे.  तुकारामांना त्यांच्या कथित गुन्ह्याची शिक्षा हीच की त्यांनी आपल्या अभंगरचनांचे कागद स्वहस्ते इंद्रायणीत बुडवायचे. तुकोबा जातात काठावर आणि आपल्या रचनांना प्रवाह देतात. या भागाचेही चित्रण खूप छान झाले आहे. जनसमुदाय जमा होतो. तुकाराम अन्नत्याग करतात. लोक जमून राहतात आणि मग एकजण त्यांचा एक अभंग म्हणतो, दुसरा माणूस दुसरा अभंग म्हणतो..अशाप्रकारे हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की स्मृतीरुपाने ते अभंग चिरजीवी झाले. पुन्हा ते पाण्यातून वर आले हे दाखवण्याचं खुबीने टाळलं आहे असं मला वाटतं.
तुकारामांचे महत्व आहे कारण स्वतः प्रपंचात राहून भगवद्भक्ती, ईश्वरस्मरण, नामसंकीर्तन याची आवश्यकता त्यांनी पटवून दिली.  नेहेमीच्या जीवनात, सांसारिक, प्रापंचिक समस्यांमध्ये मार्गदर्शक ठरतील अशा रचना केल्या. त्या केवळ उपदेशात्मक नाहीत तर व्यावहारिक जीवनाचा परिपाठ घालून देणाऱ्या मौलिक सूचना आहेत. मनुष्यस्वभावाची ओळख, पारख, व्यवहारचातुर्य असे अनेक पैलू त्यांच्या रचनांमधून आढळतात. विठ्ठलावरची अभंग – अखंड श्रद्धा आणि जनहिताचे ध्येय हाच त्यांच्या जीवनाचा पाया होता.

सिनेमाला खूप गर्दी होती. थिएटरवर तर बाहेर काही लोक जवळ येऊन बोलत होते, “घ्या तुकाराम घ्या ६० रुपये..बाल्कनी घ्या”! तुकाराम एवढे ‘डिमांड’ मधे आल्याचा आनंदच झाला! परिवारासकट लोक आले होते. जेव्हा एका बहिणाबाई नावाच्या तत्कालीन संत महिलेचा उल्लेख आला तेव्हा आमच्या मागच्या रांगेत बसलेला एक पालक आपल्या मुलीला सांगत होता की “तुला शाळेत ज्यांची ‘पोएम्’ आहे ना, त्याच ह्या!” मला गंमत वाटली पण खूप बरं वाटलं की, लोक आवर्जून आपल्या मुलांना घेऊन आले होते. उत्तरोत्तर असेच मराठी चित्रपट निघावेत.

या चित्रपटातील गाणी तुम्ही ऐकू शकाल - http://www.dhingana.com/marathi/tukaram-songs-jitendra-joshi-radhika-apte-22607d1

Sunday, July 8, 2012

A bigger explosion?


Some interesting revelations may raise a curtain over great dramatic happenings. And this may be important in various ways as its connected to national security, religious harmony, social justice, political gameplan and human rights.



Bomb blast in Malegaon (Dist: Nashik, Maharashtra) took place in the year 2008. This happened near a masjid. Everybody thought that some extremist Hindu elements are responsible for it. Police and Anti Terrorism Squad (ATS), then headed by shri. Hemant Karkare, started their probe in this direction and arrested Sadhvi Pradnya Singh, Lt. Col. Shri. Prasad Shrikant Purohit and several others as ‘suspects’. From then onwards, all are languishing in jail. No charges have been confirmed. Sadhvi’s health is deteriorated to a great extent. She seems to have faced a great torture for interrogation or may I say, to get ‘desired’ answers from her. Meanwhile, Swami Aseemanand, who is also behind bars for the Samjhauta Express blast, told in Court that he was forced by NIA (National Intelligence Agency) to tell the Court that Hindu elements were involved in the design.

We have maintained since beginning that violence or explosions, bomb blasts on our own soil cannot be a way to protect dharma or rashtra. It undoubtedly destroys humanity in addition to other things like loss of wealth, faith and harmony. Such untoward incidents cannot be defended on grounds of religion or its protection. And we sincerely believe that whoever is found guilty after trying him/her (by fair trial!), should be punished as per the law of the land. They should not be spared on whatsoever ground. But at the same time we unequivocally believe that no innocent person should be made to suffer the miseries for indefinite period only on ground of suspicion. But the people mentioned above are languishing in jail for this reason.

Now some facts have surfaced which may change the direction of theories relating to Malegaon bomb blast.

Lt. Col. Purohit was serving in Military Intelligence. In 2005, Purohit in fact was invited to deliver a lecture on intelligence-gathering at the Mumbai headquarters of the Anti-Terror Squad. He claims to have informed his superiors about the inputs he received while working with Abhinav Bharat activists. His superiors knew what he was doing at the relevant time. This he has stated with proofs before the Court of Inquiry (CoI) in the ongoing trial. Mr Purohit told the Court of Inquiry: "I must make a mention here that out of the vast int (intelligence) network development by me with great efforts I came to know about the likely involvement of some right-wing leaders in anti-national activities. The inputs received on 12 October 2008 were immediately forwarded to then CO (Commanding Officer) SCLU (Southern Command Liaison Unit) Col Pancpore, OC A Team, Det SCLU, Maj P. Khanzode and to Maj. B. Dey of 1/6 team CCLU (Central Command Liaison Unit) on 12/13 October 2008 itself and a written report in this regard was fwd to Maj Dey on 15 Oct 2008. Was he on the official job then? 59 officials (witnesses) from the Army have confirmed this before the CoI. It might be the case that Purohit was given the ‘official’ job to get in touch with elements of extreme ideology opposing Islamic extremism, and then to communicate with them as their sympathizer. After this, to penetrate deep into the organization and know about their network of supporters/active participants as well as future plans and designs. This he did well.

Some reactions on his work : Col. Hasmuk Patel, then Commanding Officer of Southern Command Liaison Unit wrote in Purohit's ACR in 2007: The Officer has infiltrated the SIMI and other underground outfits in the region through his capabilities and go getter attitude.

Col. YK Singh in 2008, noted: "He (Purohit) provided valuable int on Tabliq-e-jamal and MFO (Muslim Fundamentalist activities which were appreciated by environment. He developed on effective informant network in AOR which led to acquisition of Naxal propoganda and terrorist activities."



Now second thing is, this ‘big game’ of the Military Intelligence can be to counter  the rise of Islamic terrorism in Bharat. To fan so-called aggressive Hindu elements by showing them sympathy and build an ad-hoc structure which will fight pseudo-war with IM/SIMI and alike. In this operation Purohit was to act as a catalytic agent. If this theory is true, is it not hazardous? Is it desirable? Can official agency of Govt do this? One has to search for these answers on his own. Opinion on this may differ from person to person.

Third and most dramatic thing possible in this episode is – though Lt. Col. Purohit was on official duty, and though he informed his superiors about his activities, he turned to be a ‘double agent’! This means while working with the Abhinav Bharat and other organizations’ people, he really developed sympathy for them. He subscribed to their ideology. He could not keep himself aloof from the activities of these organizations and contributed towards them. Here the bosses in MI remained in dark about the changed circumstances. They came to know it afterwards, when it was too late to pull Purohit back. He had left in that train.

These are all possibilities. Some possibilities may be the truth. Nobody knows the complete story. It is interesting how the Department of Purohit defends itself, what proofs he actually has to show that he was on the official duty, when did he go far ahead and sympathized with Abhinav Bharat from his heart, and if he still maintains that he sympathized/supported these people out of sheer compulsion of his duty, how this claim is countered by the Department. Once a person supports a thing, an ideology, a movement, how can any other person argue that whether it is really from that man’s heart or that he is pretending.

Therefore, in coming days, it will be very interesting to see the changed course of events and resultant upheavals in this tragic episode. 

Sunday, June 10, 2012

हिंदू नेतृत्वावर योजनाबद्ध आक्रमण?

भारतीय प्रसारमाध्यमांच्या बाबतीत अनेकदा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. ‘पेड न्यूज’ असेल अथवा ‘स्टिंग ऑपरेशन’ ‘मीडियाचे काही खरे नाही’ असा सूर उमटत असतो. शिवाय मध्यंतरी एक इमेल मोठ्या प्रमाणावर फिरत होता, ज्यात न्यूज चॅनेल्सची मालकी खरी कोणाची आहे आणि त्यानुसार कोणत्या बातम्या किती प्रमाणात द्यायच्या हे ठरत असते असा विषय होता. आणि त्यामुळे आपल्याला चॅनेल्सवर दिसणारे चेहरे आणि बसवलेले विचारवंत हे ‘बोलके बाहुले’ आहेत. त्यांच्या हातात काहीच नसते (कागद सोडले तर!).

पण गेल्या काही वर्षांत सरकार कडून या विकाऊ प्रसारमाध्यमांच्या मदतीने एक षडयंत्र चालू असावे असा संशय येतो. समाजातील विकृती चव्हाट्यावर आणून समाजमनाला प्रबोधित करायलाच हवे. अंधश्रद्धा, घातक रुढी, भ्रष्टाचार याबाबत संप्रदाय, जाती असा भेदभाव न करता प्रसारमाध्यमांनी ते मांडायलाच हवे.

हिंदू धर्माचा कोणी एकच शीर्षस्थ नेता नाही. एक धर्मग्रंथ नाही. एकच पूजापाठ नाही. देव तर किमान तेहतीस कोटी! आणि ही अशी विविधता, मतांचे वेगळेपण हे तर हिंदुत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तेव्हा हिंदू समाजाला एकत्र करणे महाकर्मकठीण! पण तरीही असे प्रयत्न वेळोवेळी या भरतभूमीत होत राहिले आणि हिंदू, हिंदू म्हणून टिकून राहिले. या हिंदूराष्ट्राची ओळख पुसण्याचे किती प्रयत्न झाले..पण ज्याप्रमाणे ओहोटीनंतर सागराचे बलिष्ठ गर्जन पुन्हा उचंबळून येऊन किनारा भरून टाकते, त्याप्रमाणे हिंदू समाज असंख्य पीडा, अत्याचार यांना तोंड देऊन झळाळून उठला आहे.
वर्तमान समाजात काही प्रवचनकार, महाराज, बाबा, स्वामी, बापू, अम्मा, आई, देवी असे दिसतात ज्यांच्या मागे हिंदू समाजाचा फार मोठा वर्ग आहे. प्रत्येकामागे स्वतःचे असे जनसंग्रह आहेत. या सर्वांनाच वाईट म्हणण्याची आवश्यकता नाही. आणि त्यात जे वाईट आहेत त्यांना उघड केलेच पाहिजे. पण हे करत असताना केवळ हिंदू धर्म आणि हिंदू समाज यालाच लक्ष्य करण्याची आवश्यकता नाही.

आसाराम बापू – यांच्या मागे गुजरात, महाराष्ट्र या राज्यातील खूप मोठा जनसमुदाय आहे. रंगपंचमीला तर अहमदाबादच्या आश्रमात आलेले उधाण पाहण्यासारखे असते. स्वतः बापू हातात एक भलामोठा पाईप घेऊन जमलेल्या असंख्य लोकांवर पाणी उडवत असतात. ‘ऋषिप्रसाद’ या नावाने यांचे मासिक निघते. बऱ्यापैकी वाचनीय असते. ऋतूमानानुसार पौष्टिक, चविष्ट ठरतील अशा पाककृती दिलेल्या असतात. मुलांसाठी कथा, श्लोक असतात.
यांच्यावर/आश्रमावर आरोप झाले की त्यांच्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्याला त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अजून पुढे काही झाले नाही. आरोप खरे-खोटे, कोणाला काही ठाऊक नाही. मात्र प्रतिमा मलिन झाली हे नक्की.

रामदेव बाबा  
यांच्याबद्दल सध्या भारतीय जनतेला फारच माहिती झालेली आहे. योग प्रचाराचे कार्य नेटाने केले अनेक वर्ष करून ‘पतंजली योग विद्यापीठ’ ची स्थापना केली. त्याद्वारे आयुर्वेद, वनौषधी यांना पुन्हा एकदा जनमानसात रुजवण्याचे काम केले. शेकडो ठिकाणी औषधी उत्पादने विकणारे दुकाने काढली जिथे मोफत वैद्यकीय सल्ला दिला जातो. ‘आस्था’ वाहिनीवरून दररोज सकाळी प्राणायामाचे प्रसारण. देशभर प्रवास करून हजारोंच्या संख्येची शिबिरे घेतात, ज्याला लोक भल्या पहाटे घरून सतरंज्या आणून हजेरी लावतात. आणि केवळ योग-प्राणायाम नव्हे तर त्याबरोबर राष्ट्रवादी विचारांचे प्रकटीकरण करतात. प्राणायामाचा एवढा प्रसार केला की लोक ट्रेनमधून प्रवास करताना बसून, बागेत बसून, मैदानात बसून, कट्ट्यावर बसून, डोळे मिटून पोटं हलवताना दिसतात. सामान्य स्तरावर प्राणायामाचा एवढा प्रचार होईल असे भाकितसुद्धा कुणी करू शकले नसते. हल्ली ते भ्रष्टाचारावर आणि काळ्या पैशावर घसरले आहेत. विदेशी बँकात जमा असणारे काळे धन परत आणावे म्हणून त्यांची लढाई चालू आहे. दिल्लीतल्या त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर सरकारने मध्यरात्री केलेली कारवाई कुविख्यात आहे. म्हातारे-कोतारे, महिला न बघता सरळ त्या निद्रिस्त जमावावर लाठीहल्ला चढवणाऱ्या पोलिसांना कोणाचे तसे आदेश होते हे लपून राहिलेले नाही. हा षडयंत्राचा भाग नव्हे तर काय?

कम्युनिस्ट पार्टीच्या वृंदा करात यांनी रामदेव बाबांच्या आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांना हाताशी धरून संप घडवून आणला. बाहेर बातम्या आणवल्या की आयुर्वेदिक औषधात प्राणांच्या हाडाची पूड असते म्हणे. पुढे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (forensic lab) ते आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाले. पण नाव खराब झालेच. विक्रीवर/उत्पादनावर परिणाम झालाच. आणि त्यावेळी करात प्रभृतींची ‘कम्युनिस्ट पार्टी’ ही काँग्रेसप्रणित आघाडी सरकारचा एक महत्वाचा साथीदार होती. त्यामुळे रामदेव बाबांवर आरोप करणे हा षडयंत्राचा भाग नव्हे तर काय?

नरेंद्र महाराज – नरेंद्र महाराज महाराष्ट्रातील नाणीज येथे मूळ आश्रम असलेले एक पंथनेते. ह्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आज महाराष्ट्रात आहे. नरेंद्र महाराजांच्या कृपाप्रसादाने कामे होतात, आजार बरे होतात, प्रापंचिक सुख लाभते असे मानणारा मोठा भक्तगण आहे. प्रचंड गर्दी यांच्या सभांना होते. बरं ‘दारू सोडा, त्याचे वाईट परिणाम होतात’, ‘हिंदुत्वावर, आपल्या देवांवर श्रद्धा ठेवा’, ‘गायींचे रक्षण करा’, ‘धर्मांतरणाने काय दूरगामी परिणाम होणार आहेत’, ‘धर्मांतरणाचे षडयंत्र/कावा काय आहे’ हा आणि अशा प्रकारचा उपदेश ते जनसभांतून करत असतात. हे आवश्यकच कार्य आहे. ह. मो. मराठे लिखित ‘एक माणूस एक दिवस’ या पुस्तक मालिकेत एक प्रकरण नरेंद्र महाराजांवर आहे. त्यातून महाराजांची कार्यपद्धती स्पष्ट होते. ते वाचकांनी वाचणे सयुक्तिक राहील पण त्यांच्या कामाचा एक मुख्य पैलू, जो त्या ‘दिवसाच्या’ कार्यभागात ठळकपणे आलेला नाही तो म्हणजे त्यांचे परावर्तनाचे काम. परावर्तन म्हणजे जे हिंदू अन्य संप्रदायात गेले आहेत उदा. मुस्लिम अथवा ख्रिश्चन झाले आहेत त्यांना पुन्हा हिंदू करून घेणे. शिवरायांनी नेताजी पालकरच्या बाबतीत केले तसे. कारण एखादी व्यक्ती/कुटुंब जेव्हा अहिंदू होते तेव्हा त्याचे त्या कुटुंबावर, समाजावर, देशावर होणारे परिणाम गांधीजींनी आपल्या लिखाणातून स्पष्ट केले आहेत. तेव्हा हे निकडीचे काम नरेंद्र महाराज करीत असतात. आजवर हजारो हिंदूंचे अशा प्रकारे हिंदू धर्मात पुनरागमन झाले आहे. हे काम करायलाही हिंमत लागते. असे काम करणाऱ्या मसुराश्रमाच्या स्वामी श्रद्धानंदांचा एका मुस्लिम माथेफिरू युवकाने चाकू भोसकून खून केला होता हे विसरता येत नाही.

शिवाय महाराज जमलेल्या निधीतून अपंगांना चल-खुर्च्यांचे (wheel chairs) वाटप, महिलांना शिवणयंत्रे, गावांना अॅम्ब्युलन्स चे लोकार्पण अशी कामे संस्थान तर्फे करत असतात. त्यांच्या ‘धर्मक्षेत्र’ या मासिकातून त्याची सचित्र माहिती दरवेळी येत असते. शिवाय श्रीरामसेतू वाचवण्याच्या आंदोलनात ते खूप सक्रिय राहिलेले आहेत. नुकताच पुन्हा त्या विषयावर त्यांनी आपल्या मासिकात लेख लिहिला आहे. अशा कामांमुळे हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस ची त्यांच्यावर वक्रदृष्टी वळती ना तरच नवल!
आता याला विरोध कसा करायचा? मग अंधश्रद्धेचं लचांड मागे लावून दिलं. अं.नि.स. तयार आहेच. सरकारी तालावर नाचून काम करणाऱ्या गैर-सरकारी संस्थांची आपल्या राज्यात-देशात काही कमी नाही. चांगल्या कामाबाबत शाबासकी देऊन मग त्यातील अनिष्ट प्रथा संपविण्याबाबत बोलणार असाल तर तुमचा हेतू शुद्ध असल्याचे स्पष्ट होईल, अथवा तुमच्यावरचे प्रश्नचिन्ह कायम राहील. नरेंद्र महाराजांना शंकराचार्य म्हणणे आम्हाला स्वतःला व्यक्तिशः पटत नाही. पण कोणी कोणाला काय म्हणावे आणि कोणात काय पहावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि वैय्यक्तिक मतांचा प्रश्न आहे, ज्याचा आम्हाला पूर्ण आदर आहे.

तेव्हा नरेंद्र महाराजांचे काम हे वाखाणण्यासारखे आहे एवढे निश्चित. त्याला विरोध करणे आणि सांप्रदायिक म्हणणे हा षडयंत्राचा भाग नव्हे तर काय?

अनिरुद्ध बापू – महाराष्ट्रात विशेषतः शहरी भागात बापूंचा मोठा भक्तगण आढळतो. टीका करणारेही अनेकजण आढळतात. बापूंच्या कार्यक्रमांना गर्दी तर असतेच पण त्यांच्या चांगल्या विधायक कामांनाही गर्दी असते.

बापू रामरक्षेचे पठण करायला सांगतात. आज हिंदू घरांमधून रामरक्षा हद्दपार होत असताना त्याचे पठण होणे ही आनंदाची बाब आहे. ज्या ‘विष्णुसहस्त्रनामातून’ आपल्या हिंदूंची नावे ठेवली जातात त्या विष्णुसहस्त्रनामातील एकेक नाम घेऊन त्यावर प्रवचन करतात मराठीत आणि मग साईसच्चरितावर हिंदी मध्ये प्रवचन करतात. खूप गर्दी असते. शिवाय त्यांचे २ भक्त मी जवळून पाहतो आहे. आपले काम व्यवस्थित करून फावल्या वेळात ते नामजप करत असतात. रिकाम्या वेळात सूत वळण्यासारख्या यंत्रावर काही करत असतात. हे विशेष आहे. 


बापूंच्या प्रेरणेतून ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ आणि ‘अनिरुद्धाज अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अशा दोन संस्था कार्यरत आहे. पुराच्या वेळेला, सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या वेळी, गणेशोत्सवात-दहीहंडीच्या वेळेला, अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाला अशा गरजेच्या वेळी हे कार्यकर्ते दिसून येतात. हे चांगले काम नाही काय? एवढे लोक आपले घर सोडून प्रशिक्षण घेऊन जर गर्दीच्या वेळी उभे राहत असतील तर बापूंनी घातलेल्या सादेला माणुसकीने ओ दिली असेच म्हणावे लागेल. परंतु हे काम पुढेच येत नाही. पुढे येतात ते आरोप-प्रत्यारोप. 

सत्यसाईबाबा – आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी गाव. सत्यसाईबाबा. चमत्कार. भक्तगण. याहीपलीकडे  त्यांच्या प्रेरणेतून चालवण्यात येणारी कित्येक कामे आहेत जी खरेतर सरकारने करायला हवी होती, पण सरकार नाकाम ठरल्याने ह्यांनी उभारली आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवस्था, रुग्णवाहिका, शाळा, कॉलेजेस, पेयजल सुविधा इ.
त्यांच्या चमत्कारांना विरोध असावा. पण त्यामुळे त्यांनी केलेले काम नजरेआड करता येत नाही. केवळ एक चमत्कारी बाबा म्हणून त्यांचे व्यक्तिचित्रण करणे अयोग्य आहे. प्रसारमाध्यमं सुद्धा चांगली बाजू सोडून जे नको तेच दाखवत बसतात. प्रसारमाध्यमांना चांगले दाखविण्यास कोणी बंदी केली आहे का? कोणी बंदी केली आहे? हा षडयंत्राचा भाग नव्हे तर काय?

श्री श्री रविशंकर – ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या नावाने आपले काम उभे करणाऱ्या श्री श्री रविशंकरांना आता सर्वजण ओळखतात. सौम्य, सोज्ज्वळ प्रतिमा असलेले हे ‘गुरुजी’, ‘आचार्य’ या नामाभिधानांनी आपल्या भक्त परिवारात प्रसिद्ध आहेत. भारतातल्या उच्चभ्रू समाजात हिंदुत्वाचे जागरण अवघड पण निकडीचे झाले होते, आजही आहे. उत्तम शिक्षण, त्यामुळे उत्तम नोकरी आणि त्यामुळे लट्ठ पगार, त्यामुळे क्लब-गाड्या-छंद असे काहीसे सुखासीन जीवन असणाऱ्या आणि पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव व स्वीकार असलेल्या घरांमध्ये आज श्री श्री पोहोचले आहेत. त्या समाजात ‘गुरुजींची’ भक्ती केली जाते.

श्री श्रीं चे काम हेसुद्धा विविध पैलूंचे आहे. भगवद्भक्ती करण्यासाठी उत्तम संगीतयोजना वापरून भजनांची/स्तोत्रांची निर्मिती यांनी केलेली आहे. शास्त्रीय संगीताला उजाळा देण्यासाठी ‘ब्रह्मनाद’ नावाने काही कार्यक्रम देशभर झाले, ज्यात लोकांनी आपापल्या ठिकाणी ठराविक रागाचा ठराविक पद्धतीने अभ्यास केला-समान पद्धतीने सराव केला आणि ज्याचे शेवटी नियत दिवशी हजारो जणांनी एकत्रित वादन केले. आमच्या आवडत्या हंसध्वनी रागातील हे सादरीकरण –



कोणी म्हणेल की ह्या अशा ‘ब्रह्मनाद’ प्रकारच्या कार्यक्रमांनी काय होणार आहे? त्यापेक्षा स्वच्छता, वृक्षारोपण, मुलांना शिकवणे, आरोग्यसेवा ही समाजसेवा उपयुक्त ठरेल. पण ह्याची दुसरी बाजू अशी आहे की, एवढे लोक नियमित सरावासाठी जमत होते आपापल्या ठिकाणी, आणि मग एकत्रित वादनासाठी जमले. हा सर्व काल हे सर्वजण वाईट विचार, मत्सर, क्रोध, असत्यवचन, मदिरापान अशा आणि इतर अनिष्ट गोष्टींपासून दूर राहिले. हे चांगले कर्म नव्हे तर काय! आणि त्याचे कर्मफल मिळाल्याशिवाय राहील का? तेवढी पापाची/वाईटाची राशी कमी झाली. असेच त्यांचे नियमित ‘सत्संग’ चालतात. तरुण, कॉलेजविद्यार्थी यांच्यासाठी ‘YES plus’ नावाचा कार्यक्रम चालतो. ज्यात तरुणांना व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास यासबंधाने प्रशिक्षण दिले जाते. 
योगासने आणि सूर्यनमस्कार यांवर भर दिलेला आहे. नुकतीच त्यांनी एक मोठी ‘इव्हेंट’ केली. http://yogathon.in/  त्याचे थीम साँग (साईटवर जाताच खाली वाजू लागते) हे ज्या वर्गात त्यांचे काम अभिप्रेत आहे त्याला अगदी साजेसे असे आणि अपीलिंग होते! स्वतः श्री श्री देशभर फिरून कार्यक्रम घेत असतात.
येणाऱ्या काळात श्री श्रीं वर आरोप होण्याची शक्यता आहे. त्यात त्यांची कसोटी तर लागणारच आहे, पण त्यांच्यावर विश्वास असणाऱ्या वर्गाची/भक्तगणाचीही त्यानिमित्ताने परीक्षाच जणू होणार आहे. येणारा काळच चित्र स्पष्ट करेल..

माता अमृतानंदमयी तथा अम्मा – तामिळनाडू मध्ये अम्मांचा भक्तगण आढळतो. मुंबईसारख्या शहरातही अम्मांचा कार्यक्रम अलोट गर्दीमध्ये पार पडतो. दाक्षिणात्य जनतेमध्ये अम्मांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. त्यांनी सुद्धा शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ स्थापन केले आहे. पण कितीजणांना ते ठाऊक असेल कल्पना नाही. पण यांच्याविरुद्धही एका ब्लॉगवर लेखन आढळले मध्यंतरी. अजून त्यामानाने तशी टीका नाही होत अम्मांवर.
असे अजून कित्येक आहेत पूज्य मोरारी बापू, श्री. रमेशभाई ओझा, स्वामी महामंडलेश्वर इ. वरील सर्वांवर आरोप होतात असं नाही. पण कित्येकांवर झाले आहेत आणि काहीजणांवर निकटच्या भविष्यात अपेक्षित आहेत. म्हणून वानगीदाखल काहीजणांचा उल्लेख या लेखात केला आहे.


अहिंदू समाजातील आवश्यक बदल – 
मुस्लिम – अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीती हिंदू समाज सोडल्यास अन्य संप्रदायात नाहीत काय? ३ वेळा ‘तलाक’ उच्चारण करताच घटस्फोट मिळतो, आधुनिक विज्ञान-गणित यापासून वेगळे केवळ एकांगी असे मदरसा शिक्षण द्यायचे, आपल्या खाजगी तीर्थयात्रेसाठी सरकारकडून निधी घ्यायचा, येथील हिंदू समाजाला प्रिय असणाऱ्या गोवंशावर सुरा फिरवायचा, समान नागरी कायद्याला विरोध करायचा, वंदे मातरम म्हणायचे नाही या गोष्टी बदलायला नकोत का? (http://vikramwalawalkar.blogspot.in/2011/06/blog-post.html) नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने १० वर्षांत क्रमबद्ध रीतीने हज अनुदान संपुष्टात आण असे निकालपत्र दिले आहे. पण तरीही नवीन हज हाऊस चे बांधकाम, निधी वितरण जोरात सुरु आहे. शासन का गुढगे टेकते आहे? मुंबई ला एक हज हाऊस आहेच खूप वर्षांपासून. नुकतेच नागपूर ला एक बांधून झाले. आता संभाजीनगर (औरंगाबाद) ला नव्या हज हाऊस चे बांधकाम सुरु आहे. एरवी तुमच्याकडे निधी नाही शिक्षणासाठी, ग्रामविकासासाठी, एस.टी. साठी, सिंचनासाठी, विद्युतनिर्मितीसाठी. मग इथे का उडवता पैसा?

ख्रिश्चन – वनवासींना आमिषे दाखवून ख्रिश्चन बनवायचे, कॉन्व्हेंट शाळांमधून टिकली-बांगड्या यांसारख्या हिंदू चिन्हांवर बंदी घालायची, पूर्वांचलातल्या ख्रिस्ती समाजात अराष्ट्रीय विचारांचे रोपण करून त्याला चालना द्यायची, आजारी लोकांना येशू हाच तारणकर्ता असल्याचे भासवून भोंगळ उपचार/पाणी/ताईत यांच्या नावाखाली ख्रिश्चन बनवायचे, अपंग पाणी शिंपडताच चालू लागले, मुके बोलू लागले, बहिरे ऐकू लागले अशा जाहिराती करून ख्रिस्ती प्रसार करायचा या गोष्टी थांबायला नकोत का? http://christianaggression.org/

ही अंधश्रद्धा नाही का? त्याचे ‘निर्मूलन’ करावे असे कोणत्या समितीला वाटत नाही का? एरवी कोणी चर्चमध्ये जायला, बायबल वाचायला, त्याचे गुणगान गायला आमचा विरोध नाही. किंबहुना आम्हीच ‘सर्मन ऑन द माउंट’ श्रद्धेने वाचतो. त्यात आम्हाला आमचे हिंदुत्व आड येत नाही. परंतु तुम्ही जर धर्माची विक्री करत असाल तर आमचा विरोध हा राहणारच.

तेव्हा या अशा सर्व गोष्टींकडे काणाडोळा करून जर हिंदू धर्माच्या नेतृत्वाला लक्ष्य केले जात असेल तर तो षडयंत्राचा भाग नव्हे काय? आता स्वामी नित्यानंद आणि तत्सम लोकांना उघडे केल्याबद्दल धन्यवादच द्यायला हवेत. पण अन्य बाबतीत आम्हाला एका मोठ्या कारस्थानाचा भाग वाटतो आणि म्हणून तो लिखाणातून प्रकट करावा असं वाटलं..