कोंकणातले इरसाल नमुने विविध साहित्यकृतींमधून परिचित झाले आहेत. कोंकणी (म्हणजे मालवणी. गोंयकार नव्हे.) माणसाची स्वभाववैशिष्ट्ये आपल्याला ठाऊक आहेत.
कष्टाळू, हुशार, देवभक्ती करणारा, भजनं म्हणणारा, राबणारा, गजाली मारणारा, मनापासून आदरातिथ्य करणारा या भागातला माणूस भांडणसुद्धा रस घेऊन करतो. कोर्ट-कचेरी जणू छंद असल्यासारखा करतो. पावलीसाठी भांडणावर २ रुपये खर्च करायला मागेपुढे पाहत नाही. पिढ्यानपिढ्या एका माडासाठी मुंबई उच्च न्यायालयात खेटे घालणारे लोक मी पाहिले आहेत. “तेका मी धडो शिकवतंय” किंवा “त्यांका मी नमयिलंय” हे सांगण्यात आनंद.
तरी या कोंकण किनारपट्टीचा बऱ्यापैकी विकास झाला आहे, चालू आहे. या किनारपट्टीवरून वेगाने वाहतूक होण्यासाठी सागरी महामार्ग झालाय. त्याचे सांकेतिक नाव आहे MSH-4. म्हणजे ‘Maharashtra Sea Highway – 4). या महामार्गावरून बऱ्यापैकी वाहतूक सुरु असते. महामार्ग म्हटल्यानंतर प्रशस्त मार्ग, वेगाने प्रवास ही लक्षणं अभिप्रेत असतात. अगदी जर्मनीतील ऑटोबाह्न (Autobahn) प्रमाणे नसली तरी ही वैशिष्ट्ये जर महामार्गाला नसतील तर तो महामार्ग कसला.
या सागरी महामार्गाचा २०० मीटरहून कमी भाग हा अत्यंत अरुंद आहे. ही चिंचोळी पट्टी एवढी अरुंद आहे की वाहनचालकाला समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज घेऊनच गाडी आत घालावी लागते नाहीतर मागे घेण्याची नामुष्की. एकाचवेळी २ गाड्या जाऊ शकत नाहीत या महामार्गावरून! समोर गाडी दिसली तर आपण थांबायचे. जरासेच पुढे गेलो असू तर रिव्हर्स घ्यायचा.
वर दिसतो आहे तो सागरी महामार्गाचा मालवण मधे (कुंभारमाठ जवळ) काही भाग आहे. मातीचा तर आहेच पण खूप अरुंद आहे. दगडगोट्यांनी भरलेला, खडबडीत आहे. हा भाग असा राहण्याचे एकमेव कारण म्हणजे येथील व्यवच्छेदक लक्षण जे वर सांगितलेच आहे. जागा विवादात अडकलाय हा ‘महामार्ग’! तेव्हा आता हा महामार्ग निदान एवढ्या भागापुरता महामार्गाला साजेसा केव्हा होतो ह्याची वाट पाहण्याशिवाय आपल्या हातात काही नाही. आणि हा माझ्या पाहण्यात आलेला भाग. कुणी सांगावे, असे अजूनही पट्टे असतील!
दिलखुलास आदरातिथ्य करणारा, आग्रह करणारा, शहाळी फोडून देणारा, कोकम सरबत देणारा कोंकणातला माणूस जेव्हा आपसात भांडण करण्याचे टाळेल तेव्हा इथल्या प्रगतीचा महामार्ग रुंद होईल आणि वेगाने विकास सुरु होईल.
ह्यो कोण इलो आमका शिकवूक?
ReplyDelete:-))
ReplyDeleteBravo! Keep it up.
ReplyDelete--- Pulind Samant
ani kuskepana visarlas! marmik tomne chapkhal shabdat marnyat kokni mansachya tondi koni lagu shakel ka?
ReplyDeletevachniya!!! chan.. :)
ReplyDelete