'अखेर कमाई'
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
---कुसुमाग्रज.
पुतळ्यांचे राजकारण हा विषय जुनाच आहे. परंतु उत्तर प्रदेशात मायावतींनी पुतळे उभारणीचा जो सपाटा लावला आहे त्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने लगावलेल्या चपराकीनंतरसुद्धा त्यांनी काम सुरूच ठेवले. महाराष्ट्रात पुतळ्यांचे राजकारण काही कमी नाही. उत्तर प्रदेश, बिहार च्या नावाने बोटे मोडणार्याँनी आपल्या राज्यातील शिवरायांच्या पुतळ्यावरून जे राजकारण सुरु आहे ते पहावे. खरंतर शिवरायांचा पुतळा समुद्रात उभारणे आणि तोही सरकार म्हणत असलेल्या उंचीचा हे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक तर आहेच, परंतु अव्यवहार्य आणि शिवरायांच्या तत्त्वाला विरोधी असेच आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे आहे ते शिवरायांचा खरा इतिहास लहानपणापासून शिकवणे, वाचू देणे, अभ्यासाला लावणे. तिथे मात्र अफझलखानास वाईट दाखवण्यापासून कचरायचे, कारण काहीजणांच्या म्हणे भावना दुखावल्या जातात! ज्याने तुळजाभवानी फोडली आणि शेकडो हिंदू मंदिरांचा विध्वंस केला त्याला धर्मांध म्हणायला कचरायचे!! हा खरा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. असो.
गेलेल्या गणमान्य व्यक्तीचे स्मरण राहावे म्हणून पुतळे उभे करणे समजू शकतो. परंतु हयात असलेल्या मुख्यमंत्र्याने करदात्यांच्या पैशातून आपलेच पुतळे उभे करायचे? उत्तर प्रदेश च्या "पुतळाबाईसाहेब" स्वतःचे पुतळे बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम यांच्याबरोबरीने उभे करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने चाप लावायचा प्रयत्न केला आहे आणि न्यायालयाशी राजकारण करू नका असेही सुनावले आहे. पण न्यायालयाला जुमानतील तर ते राजकारणी कसले, ते तर कसलेले राजकारणी!
एकाच ठिकाणी ४ पुतळे?!?
very nice. keep it up. but i think what mayawati is doing is sort of reaction to what earlier rulers did vulgarly by creating N number of statues of Gandhis and Nehrus.
ReplyDeletei sincerely feel that all the statues of 'mahapurushs' should be shifted in the sea. to acheve 2 beifits.
1.many law and order issues will be solved.
2. crows wont reach mid-sea to use them as 'sulabh shauchalay'
-sharadmani
-sharadmani
very good.....
ReplyDeletestatues should be there in public places because they always remind us about their sacrifice for nation but those statues should be made by other people not by the person whose statue is going to stand....