"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, October 4, 2009

'सेवाभारती'चे अभिनंदन!


जायचे दिवस आले असताना पावसाने पुरती भंबेरी उडवून दिली आहे. तीही काही जिल्ह्यांमध्ये नव्हे; तर चक्क ३ राज्यांच्या चांगल्याच प्रशस्त भागावर संकट ओढवले आहे. आपल्या राज्याचा विचार करता कोंकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सांगली, सोलापूर इत्यादी पूरपरिस्थितीत सापडला आहे.

तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे याही भागात पक्षांच्या आणि त्यांच्या मान्यवर नेत्यांच्या सभा ठरल्या होत्या. परंतु त्या सर्व त्या सर्वांनी रद्द केल्या आहेत. हे योग्यच झाले. आधीच पिचलेल्या जनतेला अजून का पिडायचे! परंतु चिंतनीय बाब ही आहे की, एकाही नेत्याला या भागाला भेट द्यावी आणि तेथे काही आपात्कालीन सेवा-व्यवस्था सुरु करावी असे अजून तरी वाटलेले नाही. महाराष्ट्राची, मराठीची चिंता वाटणारे, केंद्रात मंत्रिपदे भूषविणारे, खासदार असलेले, उभे असलेले, बसून असलेले अशा कोणाच नेत्याला चिंता वाटू नये?

गडगंज संपत्ती सांभाळणारे हे सर्व वेगळाच 'पूर' वाहवण्याच्या चिंतेत आहेत. ते असो. चालायचेच. पण मुंबईत २६ जुलै ला झालेल्या अतिवृष्टीमध्ये आम्ही केलेले काम आठवले. प्रत्यक्ष मदत व नंतर निधी संकलन हे सर्व रा.स्व.संघाच्या प्रेरणेतून केले होते त्याची संस्मरणीय आठवण झाली. आताही अपवाद म्हणून की काय किंवा स्वाभाविक म्हणून की काय, 'सेवाभारती' ही संघ प्रेरणेतून चालणारी संस्था कामाला लागली सुद्धा आहे। नि:स्वार्थ भावनेने आणि राजकीय फायदा नसताना निरलसपणे काम करत राहणाऱ्या अशा संस्था जेवढ्या अधिक बलिष्ठ होतील तेवढेच अधिक समाजकार्य होईल!

3 comments:

 1. निरलस पणे काम करणे केव्हाही स्तुत्यच !पण सर्व समाजाने झोपा काढायच्या, असली सुलतानी आणि अस्मानी संकटे आली कि सरकार, राजकारणी काही करत नाहित असे गळे काढायचे आणि ह्या अशा मंडळींनी निरलस सेवा करणे म्हणजे ऎदी कष्ट करण्याची तयारी नसणार्‍या भिकार्‍याला भीक देण्यासारखे आहे असे नाही का वाटत?
  असो ! सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !! मला माहित आहे त्यांना कोणी अभिनंदन करावे अशी ही ईच्छा नाही.

  ReplyDelete
 2. हो. आपला दृष्टीकोन अगदी योग्यच आहे. परंतु समाजातील अशी सज्जनशक्ती वाढवणे हेच तर आपले काम आहे. परिवर्तन हळूहळू होतेच आहे...होईलच.

  ReplyDelete
 3. seva bharati is not only giving selfless service in Maharashtra but is doing its yomen service in the remotest area of North East India where tourists are also dare not to visit. Every Indian should salute the unsung heros of this NGO when get time from critisizing the RSS and its outfits

  ReplyDelete