"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Monday, February 1, 2010

आधी वाचा...मगच चावा...

महाराष्ट्रात केले जाणारे 'मराठी'चे राजकारण मराठी जनतेला नवे नाही. मराठी जनता साधी आहे, भोळी आहे. जास्ती तर्काचा विचार करायला कोण जातो. आपला पक्ष स्थापित करण्यासाठी आंदोलन छेडून मराठी माणसाला भयगंडाच्या छायेत वावरायला लावायचे आणि त्याच्यावर आपले, आपल्या पक्षाच्या 'इंजिनाचे' इंधन भरून घ्यायचे हेही नवे नाही. नवी विटी, नवे राज इतकंच! तरीही आज या विषयाचा इथे उहापोह करण्याचे खास कारण आहे. गेले काही दिवस या मुद्द्यावर बरीच चर्चा चालू आहे. पुढेही ती राहणार आहे. पण त्यात आपण काही गोष्टी तपासून पहाव्यात आणि विचार करावा हाच उद्देश आहे.


भाषावार प्रांतरचना - भाषावार प्रांतरचना अस्तित्वात येण्याआधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय श्रीगुरुजी यांनी त्यातील धोके स्पष्टपणे सांगितले होते. दूरदृष्टीच्या या राष्ट्र्नेत्याने दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि आत्ताची अवस्था आपण पाहतो आहोत. भाषावार प्रांतरचना ही भाषिक भेदांसाठी वापरली जाऊन अस्मितेला साद घालण्याचे राष्ट्रविघातक प्रयत्न होत राहिले आहेत. एकसंध राष्ट्राच्या आड येणारे हे सर्व प्रयत्न वेळीच हाणून पाडायला हवेत. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक यामध्ये तर ते होतंच होते, पण पुरोगामी म्हणविणारा आपला महाराष्ट्रही त्यात मागे नाही! भारताची बहुभाषिकता हे वैशिष्ट्य न ठरता अडथळा ठरते आहे.

मूळ रहिवासी - ह्या संकल्पनेचा उपयोग इंग्रज राज्यकर्त्यांनी 'फोडा आणि राज्य करा' या नीतीचा अवलंब करताना केला होता. दुर्दैवाने आज भारतीयच भारतीयांविरुद्ध या नीतीचा वापर करताहेत. 'आर्य बाहेरून आले' आणि 'येथे असलेल्या मूळ जमातींवर त्यांनी अत्याचार केले हा विभ्रम किती शतके चालला?' आता बी.बी.सी. ने मान्य केल्यावर (http://www.bbc.co.uk/religion/religions/hinduism/history/history_4.shtml) आपले अभ्यासू (?) विचारवंत मान्य करू लागले आहेत. अजूनही काही खट आहेतच! मुद्दा हा आहे की अशा परप्रत्ययनेय बुद्धीने आपणही चालणार आहोत का? मुंबई कोणाची? मूळ रहिवासी शोधू म्हटले तर कोळी जमात येथील मूळ रहिवासी. बाकी सर्वच 'उपरे'! कोणी कोणाला म्हणायचं उपरे? जो पहिल्यांदा म्हणेल तो! हा खेळ आहे का? मुंबईवर लोकसंख्येचा भार हा सुखकारक, समाधानकारक जीवन जगण्याला बाधा आणणारा आहे . येणारे लोंढे थोपवले पाहिजेत. याबद्दल दुमत नाही. पण मुंबई 'मराठी' माणसाची अशी निरर्थक हाळी दिल्याने महाराष्ट्राचे होणारे आर्थिक, सांस्कृतिक नुकसान आपल्याला समजत नाही काय? आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशातला प्रकार आहे हा. मराठीची व्याख्या करताना काही स्वयंघोषित कैवारी म्हणतात, 'शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी'. आता आसेतुहिमाचल पसरलेल्या संघाच्या शाखांमधील सर्वजण केवळ 'शिवाजी महाराज की' च नव्हे तर 'राणा प्रताप की जय' , 'गुरु गोविंदसिंह की जय' असं प्रतिदिन उच्चरवाने म्हणतात. पण म्हणून आम्ही राजस्थानी, पंजाबी होत नाही वा ते मराठी होत नाहीत! त्यामुळे अशी व्याख्या करणे म्हणजे भारतीयत्वाची भावना परिपुष्ट करण्याचे सोडून संकुचिततेला साद घालण्याचा प्रकार आहे हा.

खरे घुसखोर/उपरे कोण - गरज आहे खरा शत्रू ओळखण्याची. मुंबईत प्रचंड प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर येत आहेत. 'गुवाहाटी एक्स्प्रेस'ने दररोज किमान ५०० बांगलादेशी घुसखोर येतात मुंबईत. पण त्यांच्या विरुद्ध कोणी ब्र ही उच्चारत नाही. का? ते उत्तर भारतीयांपेक्षा जवळचे वाटतात? कायदा-सुव्यवस्थेला धोका झालेले आहेत हे. नकली नोटा, दुधाची भेसळ, शस्त्रांची तस्करी आणि जिहादींना सुरक्षित जागा असे असामान्य कर्तृत्व असलेले बांगलादेशी हाकलून काढण्याची गरज आहे. तेव्हा बांबू, दांडा, उखडू, फोडू, गाडू, छाटू, कापू अशी भाषा बोलण्याची सवय जडलेल्यांनी या शत्रूवर लक्ष केंद्रित करावे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आसाम मध्ये या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोठे आंदोलन जिवावर उदार होऊन केले, पण असे मुंबईत या 'शूर' राजनेत्यांच्या मदतीने केले पाहिजे.

रोजगाराच्या संधी - बाहेरून आलेल्या 'अन्यप्रांतीय' (परप्रांतीय नव्हे!) लोकांमुळे म्हणजे 'भैय्यांमुळे' येथील मराठी युवकाच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्या जातात हे म्हणणे कितपत खरे आहे? हे 'अन्यप्रांतीय' लोक कोणत्या प्रकारची कामे करतात? भेळपुरीवाला, भाजीवाला, वडापाव, चहाची टपरी, चणे-शेंगदाणे विक्रेता, टॅक्सीचालक, वॉचमन, सामान पोहोचवणारे, इमारत बांधणीसाठीचे मजूर यात प्रामुख्याने ते आहेत. ही कामे त्यांनी करू नयेत आणि या 'संधी' मराठी तरुणाला मिळाव्यात ही आपली 'महत्वाकांक्षा' आहे का? हा कष्टकरी, कामकरी वर्ग 'लक्ष्य' बनवायला सोपा आहे..मारहाण करायला सोपा आहे म्हणून त्याची निवड झाली. या वर्गाला मुंबईत का यावे लागते? आणि इथल्या मराठी माणसाची पिळवणूक खरी कोणी केली आहे?

खरी संपत्ती कोणाकडे - ज्याप्रमाणे गरीबीला धर्म नसतो, त्याचप्रमाणे श्रीमंतीलाही जात नसते. परंतु मुंबईची वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती पाहता असं लक्षात येतं की येथील संपत्तीचं केंद्रीकरण काही विशिष्ट भाषिक लोकांकडे झालेलं आहे. शेअर बाजार कोणाकडे? रत्नांचा व्यापार कोणाच्या हातात? 'पंचरत्न' च्या गल्लीत सकाळी मारा फेरफटका. हॉटेल व्यावसायिक कोण? बघा डोळे उघडून. गुजराथी आणि मारवाडी अशा काही विशिष्ट समाजांकडे हे संपत्तीचे केंद्रीकरण झाले आहे. परंतु यांचा उल्लेख अथवा विरोध कोणी करत नाही. अहो कारण सोप्पं आहे, पक्षाला पैसा कोण देणार? तेव्हा 'भैया' ला फोडून आपल्या 'अस्मितेचं' रक्षण करणं सोपं. या आर्थिक पार्श्वभूमीचा बारकाईने विचार व्हायला हवा.

विकासाचा प्रादेशिक असमतोल - भारताची भौगोलिक, नैसर्गिक, विविधता ही विकासामधेही काही प्रमाणात योगदान बजावत असते. सर्वच प्रदेशांना, राज्यांना समान संसाधने उपलब्ध असतील असे नाही. परंतु तेथील कुशल राज्यकर्त्यांनी आपल्या प्रदेशाची शक्तीस्थळे ओळखून विकास साधायला हवा. उत्तर भारतातून आपले गाव, आई-वडील, कुटुंब, घरदार सोडून सुदूर अन्य प्रांतात जाण्याची कोणाला हौस नसते. परंतु उत्तर प्रदेश आणि बिहार मधील नाकर्ते आणि कृतीशून्य राज्यकर्ते यांमुळे हे स्थलांतर होते. यासाठी त्या राज्यांचा विकास आवश्यक आहे. परंतु स्वतःच्या 'अमर' कहाण्या लिहिण्यात आणि स्वतःचे पुतळे उभे करण्याची मोह'माया' असलेल्यांना 'जया'-पराजयाचे काय! यासाठी संसदेतील मराठी खासदारांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी आवाज उठवणे गरजेचे आहे. 'विलासात' रममाण असलेले आणि उसाच्या मळ्यात साखरेत खेळण्यात रमलेले, पक्षीय राजकारणाच्या आणि धुंदीच्या बाहेर येतील असे तूर्तास तरी दिसत नाही. मग काय उपाय असावा यावर?

राजनेत्यांकडून शून्य अपेक्षा - आणखी एका बाबतीत आपण चुकतो ते म्हणजे राजनेत्यांकडून आपण अपेक्षा करतो की ते विकास करतील,अस्मिता जपतील. ही अपेक्षा फोल ठरली की आपला भ्रमनिरास होतो. म्हणून अपेक्षाभंगाचे दुःख पदरी न येण्यासाठी अपेक्षा ठेऊ नका. त्यांनी केले तर उत्तम, नाही केले तर आपण आपले काम करतोच आहोत हे समाधान तरी असते. मराठीच बोलू कवतिके, निवडणुकीत जागा जिंके! जे इमारती बांधू शकतात ते शाळा नाही बांधू शकत? जे सत्तेत आहेत तेच एफ.एस.आय. वाढवून देतात ना? मराठी माणसाला न परवडणारे टॉवर्स कोणी बांधले? आणि तेथील वस्त्या/वाड्या उठवून हे बांधायला परवानगी कोणी दिली? काय झालं मराठी बांधवांचं? 'सीमाभागातील' मराठींची यांना काळजी; पण मुंबईतील मराठी यांच्या असीम कर्तृत्वाने मुंबईच्या 'सीमारेषेवर' जाऊन पोहोचला आणि दूर जातो आहे त्याचं काय? राज्यसभेवर अमराठी खासदार कोणी पाठवले? ४० वर्षांपूर्वी जे आंदोलन छेडलं गेलं त्याचं काय झालं? पक्ष प्रस्थापित झाल्यावर ते मागे पडलं. तसंच आज दुसरं 'सॉफ्ट टार्गेट' पाहून राजकीय घोडदौड सुरु आहे.

तुज आहे तुजपाशी - या सर्व समस्येवर सांगोपांग विचार करता असं लक्षात येत की यावरची उपाय योजना मराठी माणूसच करू शकेल. त्याला कोणाही 'भाग्यविधात्याची' गरज नाही. आणि हे गीतेतच सांगितल आहे की, "उद्धरेदात्मनात्मानम". तेव्हा आपण काही गोष्टी अंगिकारण्याची गरज आहे. जर आपल्याला वाटतं की, 'भैय्याचे' अतिक्रमण झाले आहे. तर त्याच्याकडून भाजी घेऊ नका. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तो गावाकडे परतेल. पण आपण असं करत नाही. दिवसभर मराठी अस्मिता जागवतो आणि संध्याकाळी बाहेर पडून भैय्या स्वस्त देतो म्हणून किंवा उर्मट बोलत नाही म्हणून मराठी विक्रेत्या ऐवजी त्याच्याकडून वस्तू घेतो. हा काय प्रकार आहे? टॅक्सीत बसल्यावर सहज छेडून पहा..बहुतेक वेळा टॅक्सी असते मराठी माणसाची आणि चालवायला दिलेली असते 'भैय्याला'! उद्योग नको करायला आपल्याला बाकी 'उद्योग' हवेत! मराठी शाळेत मुलांना घालतो आपण? जिथे मराठीचा उदो उदो करणारे बुलंद, आक्रमक, धडाकेबाज इ.इ. नेतेच 'काँऩ्व्हेंट' शाळेत घालतात आणि परत तिचे नाव मराठीतून लिहावे म्हणून काळे फासतात तिथे सामान्यांची काय दशा? महेश केळूसकरांनी म्हटलंच आहे, "मराठी-मराठी असा घोष कंठी, तयांची मुले मात्र काँन्व्हेंटी"!

असो. कोणाला दुखवायची इच्छा नाही. पण मराठी माणसाने जागं झालं पाहिजे हीच प्रांजळ इच्छा आहे. तेव्हा स्वतःच्या समस्यांवर स्वतः उपाय शोधूया. आणि भाषिक भेदांनी देश न तोडता, राजकारण्यांचं फावू न देता मराठी संस्कृती जपूया. पुन्हा एकदा वर्तमान सरसंघचालकांनी भविष्यातील संकटाचा धोका अधोरेखित केला आहे. त्यापासून योग्य तो बोध घेणेच उचित. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!

39 comments:

  1. Very nice, controlled yet thought provoking article. But I think it needs to displayed in public. It is step further.

    ReplyDelete
  2. Very good article about politics. You should also mention what MNS did to Sivsena when Rahul came to Mumbai which clearly shows that MNS is interested in politics and not in Marathi manus.

    ReplyDelete
  3. nice one vikram
    no one is doing anything for creating more jobs & options, just takeing advantages of this by makeing there vote bank bigger
    no one is intersted in Marathi manus.
    as if u ask what r u doing for it ? they don't have answers on it

    ReplyDelete
  4. very thought provoking article!!

    I am also interested in knowing your take on pro-hindi and anti-marathi linguistic culture -that's long been establishing here... Why is it that ppl in mumbai(now pune as well), are more accomodating for hindi, and easily laugh off/ignore a request made in marathi? Also why is it that taxi-drivers who have been here in mumbai for more than 20 years still cannot manage to speak marathi, understand it very little, yet have managed to secure licenses which is again against the law. Don't you get annoyed when these guys refuse to take us to nearby destination??? bhataalaa dili osari... Throwing them out is no solution, infact is disastrous as far as our growth is concerned. But can we not expect them to learn the local language/and perhaps a little of a culture where they have long been staying???

    ReplyDelete
  5. In fact, I would say learning a language alone is enough, respect/nurturing a culture will come by automatically.

    As its been said: "Through language, each culture expresses a unique worldview."

    ReplyDelete
  6. but you are right, when we look at the bigger picture, real issue is not cultural dominance/preservation!! What is even more important is infrastructural development, rather establishment in the first place. But hey, things are getting better -don't you think? Reason why betterments are not able to sustain us people lies in our own civic "sense"(?). Challenge is to literally hammer even the most basic civic values into f***ing thickheads!

    ReplyDelete
  7. Why do people throw off the food wrappers off the train/the bus? Why is it still so easy to laugh off a genuine concern about the sanity,cleanliness of public property, and why is it still not a shameful??? Why do I care, even though my own countrymen still prefer to live in a deep shit???

    ReplyDelete
  8. Perhaps I am asking only the questions, but I guess I am talking about a little solution here too!

    Educated... rather "learned" people like us should make people around realize their mistake, undeterred by the response they get from them as a feedback. Ridicule, appreciation, anger whatever! I have been doing this for more than 4 yrs, and it works-at least this is what I would like to believe!! People sometimes feel so ashamed, this immediately shows on their face, they will surely think thrice before they commit same mistake again, exception is traffic violators, I am not sure what to do with them. Recently in my trip to India I came across a drill organized by a school at every next signal in Pune, that was getting worked out pretty well. (yes -to the traffic in Pune, to my surprise!!!)

    ReplyDelete
  9. sorry vikram, faar comments taaklyaat, pan as i said it was thought provoking, ani I feel, more and more people should engage in little things like this. People visiting your blog may find my comments here to be ridiculous/over-demanding/clamorous, but point here is to spread the message and make the difference as much as we can! As usual, they may choose to laugh it off, or to do what's necessary!

    ReplyDelete
  10. खुपच प्रभावी आणि सत्यवादी लिखाण आहे....आवडला

    ReplyDelete
  11. wah........chhan....!!! bhashecha rajkaran karnaryanna changlich chaprak aahe ha lekh...!!!

    ReplyDelete
  12. फ़ारच छान लेख ! आपल्याच माणसाला त्याची चूक समजावतानाचा ह्ळुवारपणा व मिष्किलपणा यांचा संयोग ह्यात चांगलाच जुळला आहे.
    अप्रतिम !

    ReplyDelete
  13. Dear Vikram,

    Very interesting and thought provoking article.Just wanted to draw your attention to some more facets of the issue.

    A]
    The issue of "Sons of Soil" is not specific to India. If we carefully observe, this issue is bothering all the countries including developed world.
    c/f Obama's stand on outsourcing, Recent attcaks on Indians in Australia (where only racism is not the issue as is often portrayed), Morrocans against the Dutch etc.

    In any region/country, migrants are ready to offer their services at a cost-effective and efficient manner (time-wise, I am not talking about the labour issues involved) becasue they have to survive and sustain; hence the uncercutting of prices.

    Unfortunately planners and government doesn't take this economic logic into consideration. They are trying to settle their own scores and gain mileage out of this.

    B]
    Situation in Mumbai is peculiar as compared with rest of the Maharashtra. Here, somehow the migrants have shown reluctance to assimilate with the local culture (which obviously includes Language). The reasons are many but the important ones are:
    a) They can go/do business easily without assimilating/imbibing local culture. (This is not the case with rest of Maharashtra. Marwaris/Gujrathis have aligned themselves with local populance. Jalgaon, Sangli are case in point.)
    b) Politicians have supported them for dirty vote-bank politics, where the real issue of their welfare is kept aside and rather politicians find it convenient to keep the issue simmering.

    Slightly longish comment. Anyways but really nice work. Keep it going.

    ReplyDelete
  14. Hi Vikram, You need to send this particular article to big newspapers like Loksatta, Maharashtra times, Sakal AND EVEN TRY TO SEND IT TO SAMNA. Of course the last will not publish it, but they will at least read it!!

    ReplyDelete
  15. Hi Vikram,
    very nice article....! keep it UP

    ReplyDelete
  16. Aaplya “aadhi vacha mag chaava” naamak blog sandarbhaat…

    Bhashavar prant rachana hi honarach hoti
    marathi lokanni mumbai,belgav,karwar,dharwad,bidar,bhalki,nipani magitla ki he sangh bandhu aamhala rastriyatvache dose pajnar !!!
    marathi bhashkanche maharashtra rajya asave hi sankalpana sarvapratham swatantryaveer savarkaranni mandali...belgav sahitya sammelanachya adhyakshapadavrun boltana....pradeshik asmita rashtriya asmitepekasha marathi mansane kadhich mothi manli nahi aani mannar pan nahi

    madhyantari tya ram madhavi ni biharinna sanrakshan denyachi “garjana” keli…aamchahi asha prakare biharinna marhan karayla virodh aahe,pan aamhi ram madhav aani sangh yansarkhe dutapi nahi
    sangh walyanni marathi mansala sanrakshan dyava,belgav madhe....tithe gajvavi mardmuki…ram madhav kaanadi barra !!!

    kiti hindu mulanna yanni rojgar lavle ???
    raste changle asave mhanun sarkar viruddha kiti aandolana keli ???
    panyasathi,vijesathi ???
    barr,yancha saglach "rashtriya" !!! mag swatantra vidarbhala yancha pathimba kasa ???
    saglyanna murkha samju naka....sanghachya kathyancha upyog aata fakt dhuna vaalata ghalayla !!!!

    ReplyDelete
  17. Thought is good read. But practically, my view is clear - "Aadhi Maharashtra, nantar rashtra".
    Jo paryant aamhala kahi traas honyachi shakyata disat nahi toparyant 'par prantamadhle' lok jagle ki mele yachi amhala fikir nahi. Bhayye tar mele pahijet. mhanje ikde yenar nahit. ti ghaan maharashtra madhe nakoch.

    ReplyDelete
  18. I have always heard about Hon. Guruji's opposition to the formation of states based on the language criterion. But then I ask, if not based on language then how should the states be formed?

    ReplyDelete
  19. @ VIKRAM - TU MARATHI KON HYACHI EKACH VYAKHYA SAANGITLIS TI APURNA AHE... COMPLETE KAR PAHILI.
    JE U.P. BIHAR CHE LONDHE YETAT , TECH PRAMUKHYANE ILLEGALLY RAHTAT. AANI TE IKADCHI SANSKRUTI PAALAT NAHI eg. MAHARASHTRA DIN CELEBRATE KARNAR NAHI , PAN U.P. DIVAS , JO U.P. MADHEHI HOT NAHI TOH ITHE SAAJRA KARNAR. CHATH PUJA HI NADI KATHI KARAYCHI ASTE , TE TUMHI SUMADRAT KARTA.... KELI TAR KELI ... PAN YA U.P. BIHAR NETYANNA YAAYCHI KAY GARAJ ? DURGA POOJA HOTE PAN BENGAL CHE NETE KON YET NAHI TE? U.P. CHI BHASHA HINDI , MHANUN TE HINDIT BOLTAT. JAR TU KERALA , T.N. , HYDERABAD , KARNATAK MADHYE JAA.... KITI ABHIMAAN ASTO TYANNA AAP-AAPLYA BHASHYECHA ??? TE NEHMI CHALU TARI TYANCHYA MATRUBHASHETUNACH ( PRADESH BHASHA) KARTAT AANI HINDI BOLAYLA TALTAT. AAPAN CHALUCH KARTO HINDITUN BOLAYLA. MAG KAY CHUKLA RAJSAHEB THACKREY CHA KI MARATHITUN BOLLA PAHIJE. JAR AMITABHLA GARVA ASU SHAKEL U.P. CHA TAR KA NAHI AMHALA MAHARASHTRA AANI MARATHI MAANSACHA ASHNAAR? DAKSHIN BHARAT MADHYE JYASTA KARUN TYANCHE MOVIES LAGTAT , TAR AAPLYA ITHE KA LAGU NAYE MARATHI MOVIES? AANI TYA SATHI ANDOLAN KELA TAR KAY CHUKLA?

    ReplyDelete
  20. @ Sampanna- Lekh self explanatory aahe. Tu vicharlelya sarva prashnanchi tyat uttara aahet. Either tu lekh neet vachla nahis or tula to samajla nahi. kadachit marathit aslyamule asel. Tuze shikshan Marathi madhyamat zale nahi yache mala vaait vatate. Tu swataha English medium madhe shikun tula marathi medium shalanchi kalji vatate he hasyaspadach aahe. Aso.

    ReplyDelete
  21. @ vikram - mala kalla tujha lekh. pan mala to chukicha vaatla. Mhanun spashtikaran dile. Mi tar english medium madhye jaun pan Marathi medium sathi ladhto. Tu tar tyach medium madhye jaun pan tyanchyasathi kahi karat nahi . konache hasyaspad ahe?????????? Mi English medium madhye jaun pan Marathi bana sodla nahi. Tumhi ??????????? Malach tu counter karu shakla, baakichyanna nahi. Ani Hindutva asava jevha deshacha prashna yeto pan jevha Maharashtracha prashna yeto tevha Marathi asayla garjecha ahe.

    ReplyDelete
  22. Hehe.. tu English medium madhe gelyane ata tula ladhava lagtay..tyat motha kahi nahi!!!
    Sou choohe khake....

    ReplyDelete
  23. atleast amhi ladhtoy tari marathi hakka sathi......... tumhi??????????

    "KUNACHA KARUK GELA BARA , TO MHANTO MAJHACH KHARAA"

    ReplyDelete
  24. hehe. There is nothing like "Marathi Hakk", "Kannad Hakk", "Assamese Hakk"...if such is the case, there will be more than 25 hakk! also I have told u why u need to do something for marathi.
    You do it on your own. You need not hold somebody's tail and follow him. Thats the point.

    ReplyDelete
  25. @ vikram - we marathis are locals of maharashtra. and if others are getting preference in all the fields , then it is our HAKKA to acquire that preference.
    agreed 1 has to do it on his own. pan jar kon vaat dakhavat asel , tar ti vaat nakkich baghitli pahije. jar koni marathi hakka sathi ladhat asel tar tyala nakkich saath dili pahije. jai hindurashtra garjecha ahesach pan jai maharashtra hi garjecha ahe.mhanun fakta maharashtra cha gaana ' jai jai maharashtra maza' aani itar kutchya pradeshacha gaana banla nahi.

    ReplyDelete
  26. @ Sampanna - Totally agreed with you on the point of preference to locals. Also we cannot turn a blind eye that Marathi Manoos is secondary in his own state. But only point is the youth is rendered directionless, rather in the wrong direction by some political parties whom i hav referred in this article. They are giving stones in their hands instead of training, employment etc. I like programme of Shiv Sena where they give training of banking exam etc. Beating youth from other state wont serve the purpose. These politicians do not want to solve the problem but keep it alive, using youth who have lost the power to think rationally and on their own.

    ReplyDelete
  27. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  28. @ vikram - It is a rule that all govt. exams notice shud cum in regional newspapers. then why railway exams notice is not cumin in marathi newspapers in the state of maharashtra. jar thoda aggressiveness dakhavla nahi tar he govt. asach karat rahnar karan 'laathon ke bhut baaton se nahin maante .'
    It was because of Raj Thackrey dat the ration card was to be used only for ration . earlier the law was existing but was it implemented? raj came and it was implemented.
    high court has declared that no 1 will address mumbai as bombay . but still they were doing it. raj came and it was due to fright of his tactics that they started calling as MUMBAI. he may be doing it 4 his own benefit but the main point is that the existing law is implemented only because of him.
    jar laws agodar implement jhale aste tar tyachi garaj kay hoti. u may say dat wats gr8 in calling Mumbai.... but i feel dat it shud be called mumbai coz it has a meaning to it. so wen it got implemented due to raj dat was 1 of the reason i follow him.....

    and thnk u u atleast took side of marathi manoos and did not deny dat the marathi manoos is getting sidelined

    ReplyDelete
  29. aaj punha vachla.. apratim lekh.. asach karya suru asudya.

    ReplyDelete
  30. राष्ट्रीय एकात्मता म्हणत, भाषावर प्रांतरचेनेवर आगपाखड करत शेवटी मराठीवरच येऊन थांबला. म्हणजे भाषावार प्रांतरचनेवर कितीही खडे फोडले तरी त्याशिवाय कोठलाही पर्याय नाही हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. आता मुंबईत बाहेरून आलेल्या भय्याला स्वीकारा बांगलादेशीयाला नको. अगदी बरोबर. परंतु त्यामध्ये थोडा बदल करावा. मुंबईत मुंगीलाही जागा नाही. "मुंबईत कोणीच येऊ नये. अगदीच दुसरा पर्याय नसेल तर मराठी माणसाला स्वीकारा त्यानंतर भय्याला परंतु बांगलादेशीयाला नको." असे म्हणावे. आता मराठी कोण तर जो मराठी भाषा व्यवहारात वापरतो तो. मग तो कोठूनही आला असला तरी. परंतु, जर कोणी म्हणेल की मी माझी भाषा सोडणार नाही व घटनेने मला कोठेही जाण्याची मुभा दिल्यामुळे मी मुंबईत येईन व तेथील लोकात न मिसळता माझ्या प्रदेशातील संस्कृतीप्रमाणेच राहीन तर अशा माणसाचा तो केवळ भैय्या आहे म्हणून पुळका येऊ नये. अशा माणसाचा पार्श्वभाग व आपली लाथ हेच समीकरण योग्य. या वादात बांगलादेशीयाला न आणता त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करावी.
    Will you read http://janahitwadi.blogspot.com and post your comment? This is invitation for all of you

    ReplyDelete
  31. मला ईमेलने खालील प्रतिक्रिया मिळाली
    "मुंबई बाबत अशी भूमिका म्हणजे कश्मीर ची संस्कृति जपायला ३७० कलम योग्य आहे असे म्हानाने होय"
    मी खलीलप्रमाणे उत्तर दिले
    घटनेतील कलम 370 ची तुलना मुंबईच्या परिस्थितीशी होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी किती लोक सामाऊन घेता येतील हे त्या जागेच्या क्षेत्रफळावर अवलंबून आहे. मुंबईमध्ये जागा नाही हे सर्वच जण मान्य करतात. म्हणूनच तर खारफूटीच्या जागेवर, घरे बांधली जात आहेत. मुंबईमध्ये कोणालाच येऊ देऊ नये.

    आपण 370 कलमाचा मुद्दा आणलाच आहे तर माझा अनुभव सांगतो. मी 1980 ते 1986 या काळात जम्मूकाश्मीरमध्ये वास्तव्य करत होतो. कितीतरी काश्मीरी लोकांशी बोलण्याची व वास्तव जाणून घेण्याची संधी मला मिळाली. तेथे श्री डोग्रा नांवाच्या गृहस्थांचे मत मला प्रातिनिधिक वाटते. हा गृहस्थ पक्का हिंदू. मुसमानांचा राग काय त्यांचा द्वेष करणारा. अशा गृहस्थानेही 370 कलमाचे स्वागतच केले. हे कलम नसते तर आम्ही सर्व आमच्याच प्रदेशात नोकर म्हणून ओळखले गेलो असतो असे त्याचे मत होते. मुंबईची परिस्थिती पाहिली तर त्यात सत्य जाणवते. मुंबईत मराठी माणसाची ओळख काय तर "रामागडी". सरकारने चूक केली नाही असे नाही. परंतु, ती कोणालाच उमगली नाही. काश्मीरमध्ये महाविद्यालये उघडण्याऐवजी त्याना मोफत शिक्षण भारतभर निरनिराळ्या राज्यांत दिले असते तर त्यांची वृत्ती वेगळी झाली असती. हे काम अजूनही करण्यास हरकत नाही. हेच तत्व ईशान्येकडील राज्यांबद्दलही वापरावे. हा विचार जो मांडेल त्याला माझा पाठिंबा राहील.

    ReplyDelete
  32. @Jana- . हा गृहस्थ पक्का हिंदू. मुसमानांचा राग काय त्यांचा द्वेष करणारा ==> हिंदूची ही व्याख्या ? मुस्लिमांना किव्वा बाकीच्या धर्मातील लोकांना विरोध करणारे म्हणजे हिंदू ....वा ..वा...
    Hats off....
    मुंबईत मराठी माणसाची ओळख काय तर "रामागडी" ==> कोणी थांबवलंय मराठी लोकांना कामं करण्यापासून आणि मोठ्ठ होण्यापासून.
    आपल्यासोबत आपल्या बंधावाचीही प्रगती करण्यापासून...इतिहास साक्षी आहे आधीपण आपण एकमेकांचे पाय खेचले आता पण तेच करत आहोत.
    अजून एक कोणत्याही व्यक्तीची इच्छा आपले गाव सोडून दुसरीकडे जायची नसते. रोजगार ,कमाईचे साधन नसल्यामुळे पोटासाठी लोक स्थलांतर करतात.
    बाकीच्या शहरात हे सगळं मिळत नाही आणि मुंबईत मिळत म्हणून लोक येतात.
    आपल्या ही लोकांनी कष्ट करावे...कुठल्याही कामात नीचपण न मानता अर्थार्जन करावे आणि स्वतः सोबत बाकी आपल्या बांधवांचीही प्रगती करावी

    ReplyDelete
  33. ò Krantichandra

    ही हिंदूची व्याख्या असे आपण स्वतःच ठरवत आहात. त्या बद्दल विस्ताराने लिहा. आपण हिंदी कथा वाचत असाल, सिनेमे पाहत असाल, टीव्ही पाहात असाल तेंव्हा 9 वारीतील बायका मोलकरीणी असतात व कोकणी पोषाखातील पुरुष नोकर असतात हे माहित असेलच. कोणाला मोठे व्हावयाचे असते तो काय करतो त्याला कोण मदत करतो, ते माहित असेलच. पाय ओढण्याचे काम एकाच क्षेत्रात असणारे लोक करतात व ते सर्व ठिकाणी चालते मग ती व्यक्ती कोठल्याही प्रदेशातील असो. थो काही फक्त मराठी सोकांचा गुण नाही. परंतु लांड्या लबाड्या करणे, चोऱ्या करणे या सारख्या गोष्टी फारच थोड्या लोकांना जमतात. मराठी लोक त्या बाबतीत मागासलेलेच. कोठल्याही पोलिसस्टेशनमध्ये जाल तर तेथील मोठे गुन्हे करणाऱ्यांच्या यादीत मराठी लोकांना स्थान मिळत नाही. त्याना या गोष्टी जमतच नाहीत. आणि एवढा आपल्याला इतर प्रेशातील लोकांचा पुळका आहे तर एक प्रश्न स्वतःला विचारा. 50 रुपयापेक्षा कमी मेहताना मिळूनही हे लोक कुटुंब कसे चालवतात, 2000-3000 किलोमिटर लांब येऊन काम का शोधतात, ते जर कष्टाळू मेहनती असतील तर त्यांना त्यांच्या घराजवळच काम का मिळत नाही, व असेच अनेक प्रश्न जर स्वतःला विचारले तर दुसऱ्याला विचारण्याची आवश्यकताच नाही. मुंबईकरिता पाणी कोठून येते, वीज कोठून येते, पर्यावरणाची हानी कोण सहन करतो, मराठी भाषा बोलणाराना हीन कोण समजतो हेही प्रश्न स्वतःला विचारुन पहावेत. उत्तर सापडत नसेल तर बाळासाहेबांकडून शिक्षण घ्यावे. उगीच राषट्रीयतेची चुकीची व्याख्या बनवून मराछी लोकांचे पाय ओढू नयेत.

    ReplyDelete
  34. hmm.. Mr. Jana yanche vichar kahi pramanat patatat. "Gurubhai"nchya moviemadhe mumbaitlya paraprantiyanchya yashasvitemagche "kashta" disun yetat. ani marathi sodun baki lokanni kadhlelya ya cinemat ya "kashtancha" atonat kautuk zalela ahe. Mumbaise hain aur gujrati nahi aati?? asa prashna mala anekda vicharnyat alela ahe. malabar hillche sagle bangle kashtatun bandhlele astat ki "kashtatun" te sarvanna thauk ahe. hirebajar konachya hatat ahe? to kay keval kashtachya balavar ahe? marathi lokanchi labadi hi police houn thodefar khanyapurtach maryadit ahe. IPC exam deun bharpur khanyaparyant nahi (yala arthatach iman karnibhut nahi.. abhyas karayla nako.. mothi risk nako.. hech ahe.)

    ReplyDelete
  35. yachbarobar lekhatla vicharahi patato. ki rajkaran matra garib bhayya lokanvar rag kadhunach hota. dhanadandgyanchya viruddha kontehi 'saheb' bolayla tayar nastat.. mag tyanna kitihi marathi mansacha pulka aso.

    ReplyDelete
  36. Ayn Randcha ek wakya athavla..
    The smallest minority on earth is the individual. Those who deny individual rights cannot claim to be defenders of minorities.

    असो. श्री राज ठाकरे यांचे मराठी माणसावर, मातीवर अनंत उपकार आहेत. बाकी आपल्याकडे अजून दहशतवाद्यांना सुद्धा शिक्षा नाही होत, झालीच तर त्याची अंमलबजावणी नाही होत, आणि तीही झाली तर राष्ट्रपतींची सुविधा असतेच. त्यामानाने संविधानास फाट्यावर मारणे हा काही फार मोठा गुन्हा नाही. आणि मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी, काळजीपोटी,स्वाभिमानापोटी जर संविधानास फाट्यावर मारलं तर यात बिघडलं कुठे?

    ReplyDelete
  37. राज ठाकरे काय करतात किंवा शिवसेना काय करते...हे दाखवण्याचा हा दुर्बल प्रयत्न आहे... असो... लेख म्हणुन चांगला... परंतु तुम्हि हे दाखवून लोकांना काय संदेश देत आहात ? की हा माणूस फक्त राजकारण करतोय... मराठी अस्मिता व महाराष्ट्र ह्यांचे भांडवल करुन स्वतः ला मोठ करतोय ॰ बरोबर ??
    थोडक्यात ह्याचा अर्थ काय तर ह्यांच्या मागे जाऊ नका..... पण मग कोणा मागे जावे ? कोणाला फॉलो करावे ? हे ही सांगावे !!!
    महाराष्ट्र सोडा... संपुर्ण भारतात कोणता नेता व कोणता पक्ष आहे... जो स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठबळाशिवाय अधिक स्पष्ट म्हणजे त्यांच्या प्रश्नांच्या भांडवला शिवाय मोठा झालाय ??
    त्यासाठी कोणाला सॉफ्ट टार्गेट करायचे आणि कोणाला हार्ड टार्गेट हा प्रश्न फक्त त्या त्या वेळेचा असतो...
    साम ताम दंड भेद वापरला जातो तेच राजकारण...

    लोकशाहीत राजकारण नसाव हे आदर्श पण काल्पनिक आहे...
    आणि राजकारण साध सरळ मार्गी असाव हे अनाकलनिय आहे !!

    ReplyDelete