"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Friday, September 2, 2011

राष्ट्रगीताच्या निमित्ताने...

आपले राष्ट्रगीत हे खरंच राष्ट्रपुरुष-अधिनायक असे डोळ्यासमोर ठेऊन लिहिले आहे की अन्य कोणाला अधिनायक असे संबोधून लिहिले आहे हा प्रवाद आहे. ‘भो पंचम जॉर्ज’ अशा मानसिकतेतून हे ‘जन-गण-मन’ लिहिले गेले असे मी बरेचदा पिकल्या पानांकडून ऐकले आहे. तुम्हीही ऐकले असेल. पण मी लेखनसीमेस्तव आणि विषयांतराच्या भीतीने त्यात जाणार नाही. सर ही पदवी इंग्रजांना परत करणाऱ्या रवींद्रनाथांनी असं करण्याची शक्यता असावी का? असो.

आपण शाळेत गातो, एरवी ऐकतो त्या २ कडव्यांचे हे राष्ट्रगीत अपूर्ण आहे. संपूर्ण राष्ट्रगीत ६ कडव्यांचे आहे. गांधीजींच्या आश्रमात ज्या प्रार्थना/स्तोत्र/कवनं/भजनं/श्लोक होत असत त्याचं एक छोटं पुस्तक ‘आश्रम भजनावली’ या नावाने प्रसिद्ध आहे. लहानपणी त्या पुस्तकात हे ६ कडव्यांचे राष्ट्रगीत पाहून मी अचंबित झालो होतो. आणि पहिल्या कडव्यांच्या चालीवर अन्य म्हणण्याचा प्रयत्नही केला होता. पण अन्यत्र कुठे छापील स्वरुपात अजून तरी हे संपूर्ण राष्ट्रगीत पहावयास मिळाले नाही. सध्या मात्र ते चर्चेत आले आहे आणि लोकांना माहिती होत आहे की अख्खे ‘जन-गण-मन’ मोठे आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ ने चांगला पुढाकार घेऊन एक व्हिडियो बनवला आहे ज्यात छान इंग्लिश भाषांतरासहित विविध कलाकारांकडून संपूर्ण ‘जन-गण-मन’ गाऊन-वाजवून घेतले आहे. पण त्यात कलाकार चेहरे असे काही करतात की काही त्रासच होतो आहे! असो. प्रयत्न चांगला आणि स्तुत्य आहे नक्कीच.

जन गण मन
जन गण मन अधिनायक जय हे 
भारत भाग्य विधाता
 
पंजाब सिन्ध गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
 
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा
 
उच्छल जलधि तरंग
 
तव शुभ नामे जागे
 
तव शुभ आशिष मागे
 
गाहे तव जय गाथा
 
जन गण मंगल दायक जय हे
 
भारत भाग्य विधाता
 
जय हे जय हे जय हे
 
जय जय जय जय हे
अहरह तव आह्वान प्रचारित
शुनि तव उदार वाणी
हिन्दु बौद्ध शिख जैन
पारसिक मुसलमान खृष्टानी
पूरब पश्चिम आशे
तव सिंहासन पाशे
प्रेमहार हय गाँथा
जन गण ऐक्य विधायक जय हे
भारत भाग्य विधाता
 
जय हे जय हे जय हे
 
जय जय जय जय हे
पतन-अभ्युदय-बन्धुर-पंथा
युगयुग धावित यात्री
,
हे चिर-सारथी

तव रथचक्रे मुखरित पथ दिन-रात्रि
 
दारुण विप्लव-माझे
 
तव शंखध्वनि बाजे

संकट-दुख-त्राता

जन-गण-पथ-परिचायक जय हे
 
भारत-भाग्य-विधाता

जय हे
, जय हे, जय हे
जय जय जय जय हे
घोर-तिमिर-घन-निविड़-निशीथे 
पीड़ित मुर्च्छित-देशे
 
जाग्रत छिल तव अविचल मंगल
 
नत-नयने अनिमेष
 
दुःस्वप्ने आतंके
 
रक्षा करिले अंके
 
स्नेहमयी तुमि माता

जन-गण-दुखत्रायक जय हे
 
भारत-भाग्य-विधाता

जय हे
, जय हे, जय हे
जय जय जय जय हे
रात्रि प्रभातिल उदिल रविछवि 
पूर्व-उदय-गिरि-भाले

गाहे विहन्गम
, पुण्य समीरण 
नव-जीवन-रस ढाले

तव करुणारुण-रागे
 
निद्रित भारत जागे
 
तव चरणे नत माथा

जय जय जय हे
, जय राजेश्वर
भारत-भाग्य-विधाता

जय हे
, जय हे, जय हे
जय जय जय जय हे
 

- रवीन्द्रनाथ ठाकुर

पंजाब सिंध ? - सध्या एक विषय चालू आहे. आपल्या राष्ट्रगीतात ‘पंजाब सिंध गुजरात मराठा’ असे आहे तिथे खरेच सिंध हवे की सिंधू हवे? काही जणांच्या मते मूळ रचनेत जरी सिंध असले तरी आता ते बदलून सिंधू करायला हवे. यावर चर्चा, लेख झालेच पण आता याचिका दाखल झाली आहे मुंबई उच्च न्यायालयात! आणि त्यावर न्यायमूर्तीनी केंद्राला अशी विचारणा केली आहे की, ‘का न काढावा सिंध हा शब्द? जर तो प्रांत आता नाही आपल्या देशात तर काढून टाकूया’! राष्ट्रगीताशी सबंधित विषय असल्याने आणि दोन्ही मतप्रवाह असल्याने या विषयासंबंधाने थोडे लिहावे वाटले.

‘पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग’ ही प्रदेशांची, प्रांतांची  नामावली आहे हे स्पष्टच आहे. ‘विंध्य हिमाचल यमुना गंगा’ यात पर्वत-नद्या असे प्राकृतिक वर्णन आहे. प्रश्न असा की आता जर भारतात सिंध प्रांत नाही, परक्या देशात निघून गेला आहे,  तर अन्य देशाच्या भूभागाचा उल्लेख करून राष्ट्रगीत गावे का? आणि मग ते बदलून तिथे सिंधू करावे कारण तिचा काही भाग तरी अजून भारतात आहे. दुर्दैव त्या भारताचे ज्यात लोकांना अन्य विषय न दिसता याचिका करायला हा विषय मिळावा. असो.

राष्ट्र संकल्पना - विभाजनपूर्व भारत हा अखंड होता. आताचा भारत हा खंडित भारत आहे. भारतावर एकछत्री अंमल होता अथवा नव्हता यावर इतिहासकारांमध्ये एकवाक्यता नाही. पण भारत हे एक राष्ट्र होते याचे पुरावे आपल्याला साहित्यातून, वेद वाङ्मयातून, विविध श्लोकांतून, प्रार्थनांमधून मिळतात. आजही गणेशोत्सवात जी आरती-मंत्रपुष्पांजली घराघरात म्हटली जाते त्यात ‘पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति’ असाच उल्लेख आपण करतो. राष्ट्र ही संकल्पना भौतिक नाही. मानसिक आहे. हे आधुनिक राज्यशास्त्रानेही मान्य केले आहे. देश अस्तित्वात येण्यासाठी ४ गोष्टींची आवश्यकता असते- १.ठराविक भूभाग, २.लोकसंख्या, ३.सरकार/शासन, ४.स्वायत्तता. ह्या ४ गोष्टी असल्या तर तो भूभाग देश होतो. राष्ट्र नव्हे. राष्ट्र तेव्हाच होते जेव्हा लोकांच्या मनात एकराष्ट्रीयत्वाची भावना असते. आणि म्हणूनच ही संकल्पना मानसिक अवस्थेतून जन्म घेणारी आहे.  इतिहासात अशी उदाहरणे आढळतात.

आज ज्यूंचे स्वतंत्र इस्त्रायल हा देश अस्तित्वात आहे. पूर्वी इस्त्रायल अस्तित्वात नव्हता. जगभर विखुरलेल्या ज्यूंना असंख्य हालअपेष्टा, अत्याचार सहन करावे लागले. केवळ जर्मनीतच त्यांच्यावर हडेलहप्पी झाली असं नाही. त्यावेळी जगभरातले ज्यू वर्षातून एकदा एकत्र जमत असत. आणि त्यावेळी जे भोजन होत असे त्याला ‘passover meal’ म्हणत असत. ते जेवण झाल्यावर सगळे एकरवाने म्हणत असत “next meal overthere!”.  त्यांच्या कित्येक पिढ्या हे म्हणत स्वर्गवासी झाल्या. जगाने त्यांना वेड्यात काढलं – ‘काय हे चिमूटभर लोक जमतात दरवर्षी आणि म्हणतात पुढच्या वर्षी आपल्या स्वतःच्या देशात, राष्ट्रात भेटू’, ‘शक्य आहे का हे?’ ‘आंतराष्ट्रीय परिस्थिती अशी आहे, हे शक्य नाही’ इ. आणि असेच काही. पण तो स्फुल्लिंग चेतत राहिला. आणि एक दिवस स्वप्नवत्‌ वाटणारे इस्त्रायल अस्तित्वात आले. ज्यूंचे स्वतःचे राष्ट्र म्हणून दिमाखात उभे राहिले. त्यांच्या आजच्या राष्ट्रउभारणीत आधीच्या जगभर पसरलेल्या, मनात प्रबळ इच्छा धरून स्वर्गवासी झालेल्या कित्येक पिढ्यांचा सहभाग आहे. (http://en.wikipedia.org/wiki/Passover_Seder)  

असंच काहीसं जर्मनीचं उदाहरण. जर्मनी विभागला गेला. पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असे दोन भाग पाडले गेले. मधे दोघांना दुभागणारी ‘बर्लिन वॉल’ बांधली गेली. पण मनात इच्छा धरून राहिले ते की आज ना उद्या आपण अखंड जर्मनी म्हणून एकत्र करून राहू. आणि त्याप्रमाणे कित्येक वर्षांनी ती भिंत, ते प्रतिक पाडण्यात आले. जर्मनी एक झाला. (http://en.wikipedia.org/wiki/Berlin_Wall).

“ हिंदुस्थानात सुद्धा अशी अद्भुत अस्मिता असा अचाट आवेश आणि अपरिमित आत्मविश्वास आहे. तो स्फुल्लिंग चेतत राहायला हवा.

अखंड भारत – भारताचं अनेकवेळा विभाजन झालं. आपल्या मात्र १४ ऑगस्ट १९४७ चं पाकिस्तान निर्मितीमुळे झालेलं विभाजनच लक्षात येतं पटकन्‌. त्याआधी ब्रह्मदेश, नेपाळ, श्रीलंका, तिबेट  कसे कधी तोडले आपल्या स्मरणातच नाही. अखंड भारतासाठी युक्तिवाद करणारे, शक्तीसंचय करणारे नेते या देशात झाले. पण त्यांच्या तर्काला, विचारांना म्हणावी तशी प्रसिद्धी नाही मिळाली. अर्थातच त्यांचा मार्ग कठीण आणि दुर्गम भासणारा आहे. आणि म्हणूनच समाजमान्यतेला कठीण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, गोळवलकर गुरुजी यांनी अखंड भारताची संकल्पना मांडली आणि उचलून धरली. आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी १४ ऑगस्ट ला ‘अखंड भारत दिन’ साजरा करतो. जागोजागी कार्यक्रम घेऊन याचं स्मरण करतो की या दिवशी अखंड भारत खंडित झाला, पण आम्ही पुन्हा आमच्या बाहुबलावर अखंड भारत अस्तित्वात आणू. त्यासाठी नित्य नियमित शक्तीसंचय आणि सुसंघटित समाजाची निर्मिती करतच राहू, पण ही आठवण-हे स्मरण नेहमी ताजं ठेवू. अशी कामं एका पिढीच्या हयातीत थोडीच होत असतात? त्याला अनेक पिढ्या बलिवेदीवर चढाव्या लागतात, तेव्हाच अशी स्वप्नं साकार होतात.
महाभारतात पितामह भीष्म म्हणतात – देशाच्या सीमा या आईच्या वस्त्रांप्रमाणे असतात, त्याचं रक्षण करणं हे पुत्रांचं आद्यकर्तव्य असतं. देशाच्या सीमांचे आकुंचन आणि प्रसरण हे त्या देशातील लोकांच्या पुरुषार्थाच्या कमी अथवा जास्त प्रमाणावर अवलंबून असतं.

पंजाब – सिंध? – तेव्हा आता पुन्हा मघाचाच प्रश्न. सिंध प्रांत आता आपल्या देशात नाही. तिथून कत्तल करून पाठवलेले हिंदू मृतात्मे मात्र आहेत.  निर्वासित म्हणून आलेले हिंदू-सिंधी आहेत. आणि आजही अश्रू ढाळत वाहणारी काही सिंधू आपल्या प्रदेशात आहे. सिंध ऐवजी सिंधू हा साधर्म्य असलेला शब्द सुदैवाने आपल्या देशात-भाषेत आणि भूभागात आहे म्हणून तिथे बदल करून सिंधू म्हणायचे? आणि जर हीच कसोटी लावली तर मग उद्या नवीन भूभाग आपण जिंकला तर त्याचा समावेश करायचा का राष्ट्रगीतात? शिवाय द्राविड, मराठा असे उल्लेख असलेले प्रदेश तरी कुठे आहेत? उत्कल कितीसा जणांना माहिती आहे?
उद्या कोणी पंजाब बळकावला युद्धात तर तो परत मायभूमीत आणायचे सोडून राष्ट्रगीत बदलायचे? त्यातून पंजाब काढून टाकायचा? आणि घालायचे काय मग? अशाने राष्ट्रगीत बदलत जाईल, आणि पुरुषार्थ कमी होत जाईल. मुलांना कळणारच नाही की आपला विशाल देश कसा होता, आपले पूर्वज कसे होते. अशाने विजिगीषु वृत्ती लोप पावत जाईल. आज सिंध काढलात, उद्या अजून काही काढाल. किंबहुना ते सिंध, ती जखम तशीच राहूद्या. पुढील पिढीला समजावून सांगा की, बाबा रे असा सिंध होता आपला, आता नाही, पण पुढे अवश्य मिळवू. लोक म्हणतील वेडे! खुशाल म्हणू द्या. अशी कामे वेड्यांच्याच हातून व्हायची असतात.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय – अशाप्रकारची याचिका या आधीच सर्वोच्च न्यायालयापुढे येऊन गेली आहे. सध्याच्या याचिकाकर्त्याला अथवा त्यांच्या वकिलांना ही गोष्ट माहित आहे की नाही कळायला मार्ग नाही. पण सर्वोच्च न्यायालयाने १३ मे २००५ रोजी संजीव भटनागर विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात ‘पंजाब-सिंध’ वर विस्तृत चर्चा केली आहे. याचिकाकर्ते संजीव भटनागर यांचे म्हणणेही असेच होते की आता सिंध हा भूभाग आपला राहिला नाही आणि त्यामुळे राष्ट्रगीतात ‘सिंध’ असणे हे आपला शेजारी पाकिस्तानच्या स्वायत्ततेला धक्का पोहोचवणारे आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका तर फेटाळून लावलीच, पण आपली महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत चर्चाही केली आहे. त्यातले काही उतारे येथे उद्धृत करतो. लेखाच्या शेवटी संपूर्ण निकालाची लिंक दिली आहे. अभ्यासूंनी त्याचा अवश्य वापर करावा. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश श्री. आर्.सी.लाहोटी आणि पी.के.बालसुब्रमण्यन् यांच्यासमोर ही याचिका चालली. निकालपत्र लाहोटी यांनी दिले आहे. परिच्छेद ११ मधे ते म्हणतात की, “राष्ट्रगीत हे वीरयुक्त भावना प्रकट करते. ते काही राष्ट्राच्या भूभागांची व्याख्या करणारे नियतकालिक नव्हे. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राजमुद्रा या आणि अशा काही मोजक्या गोष्टी आहेत ज्या आपल्या राष्ट्रीय स्वाभिमानाच्या आणि परंपरेच्या परिचायक आहेत. राष्ट्रगीत लिहिले गेले त्यावेळी असलेल्या राज्यांची अथवा प्रादेशिक भूभागांची सूची ते देत नाही. जेव्हा भूभाग, अंतर्गत मांडणी, भौगोलिक प्रदेश आणि प्रांत बदलतात त्यानुसार राष्ट्रगीत बदलले पाहिजे अशी आवश्यकता नाही. नुकतेच उत्तरांचल, छत्तीसगढ, झारखंड यांची निर्मिती झाली. त्यामुळे आता या नवीन नावांचा समावेश करण्यासाठी राष्ट्रगीत मोठे केले, पुन्हा लिहिले, की बदलले पाहिजे? स्वाभाविक उत्तर आहे – नाही. राष्ट्रगीत ही आपण आपल्या हिमालय ते महासागरापर्यंत पसरलेल्या आणि समुद्रांनी वेष्टित असलेल्या मातृभूमीला दिलेली लढाऊ (वीरश्रीयुक्त) मानवंदना आहे. काही प्रतिकात्मक नावांचा समावेश हे आपल्या भारताच्या गौरवशाली परंपरेचे संस्मरण आहे. ‘सिंध’ हा केवळ भौगोलिक भूभाग नव्हे. तो स्थानाचा आणि त्या लोकांचाही निर्देश करतो. सर्व देशभर पसरलेले सिंधी हे सिंध मधे मूळ असल्याने आणि तिथून आल्याने सिंधी म्हणवले जातात. ‘सिंध’ हा शब्द ‘सिंधू’ अथवा ‘इंडस’ या नदीचाही निर्देश करतो. तो अशाही एका संस्कृतीचा निर्देश करतो जी जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी आहे आणि आधुनिक भारतसुद्धा ही सिंधू खोऱ्याची संस्कृती आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचा अभिमान बाळगतो. सिंधू नदी भारतीय प्राचीन साहित्यात असंख्य संदर्भात आढळून येते अगदी ऋग्वेदात सुद्धा.”

This extract is taken from Sanjeev Bhatnagar v. Union of India, (2005) 5 SCC 330, at page 335  :
A National Anthem is a hymn or song expressing patriotic sentiments or feelings. It is not a chronicle which defines the territory of the nation which has adopted the anthem. A few things such as — a National Flag, a National Song, a National Emblem and so on, are symbolic of our national honour and heritage. The National Anthem did not, and does not, enlist the States or regional areas which were part of India at the point of time when it was written. Nor is it necessary that the structure of the National Anthem should go on changing as and when the territories or the internal distribution of geographical regions and provinces undergoes changes. Very recently Uttaranchal, Chhattisgarh and Jharkhand have been carved out by reorganising certain States. Does it mean that the National Anthem should be enlarged, rewritten or modified to include the names of these new States? The obvious answer is — no. The National Anthem is our patriotic salutation to our motherland, nestling between the Himalayas and the oceans and the seas surrounding her. The mention of a few names therein is symbolic of our recollection of the glorious heritage of India. “Sindh” is not just a geographical region. It refers to the place and to its people. Sindhis are spread throughout the country and they derive their such name as having originated and migrated from Sindh. “Sindh” also refers to River “Sindhu” or “Indus”. It also refers to a culture, one of the oldest in the world and even modern India feels proud of its having inherited the Indus Valley Civilisation as an inalienable part of its heritage. River Indus (Sindhu) finds numerous references in the Indian classical literature including Rig Veda.

पुढे सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारची निरीक्षणे नोंदवत याचिका तर फेटाळलीच, पण याचिकाकर्त्याला १०,००० रुपयांचा दंडही ठोठावला. कारण त्याने पूर्वीही अशीच एक याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याला ‘पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ नव्हे तर ‘पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन’ म्हटले आहे.

तर प्रस्तुतच्या विषयाचा अशाप्रकारे २००५ साली निकाल झालेला आहे आणि न्यायालयाने नि:संदिग्ध शब्दात मतं व्यक्त केली आहेत. मातृभूमी, तिचे गुणगान, आपली अस्मिता, देशाचा भूभाग अशी राष्ट्रीय भूमिका स्वीकारली आहे. त्याबद्दल न्यायालयाचे आभारही मानायला हवेत. आता आपले वैय्यक्तिक मत ज्याचे त्याने ठरवायचे. आणि ते इथे प्रतिक्रिया म्हणून नोंदवायलाही काही हरकत नाही.

22 comments:

 1. Chhan! Sagla pato va na pato.. lekh matra uttam zala ahe. Ani baryach varshanni Supreme Court Judgmentche bhag vachun bara vatla! :)

  ReplyDelete
 2. लेख एकदम झकास!! राष्ट्रगीताचे अनेक पैलू लक्षात आले ज्यांचा एरवी कधी आपण विचार करत नाही. तुझ्या लेखाच्या निमित्ताने संपूर्ण राष्ट्रगीत ऐकायला मिळालं. राष्ट्र ही संकल्पना वाचल्यावर श्रीगुरुजींच "राष्ट्र" हे पुस्तक वाचल्याचं आठवलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा आधीच जे मत होत कि, "सिंधू" नदीचा समावेश असावा ते पण बऱ्यापैकी निवळल....आता अनेकांनी हा लेख वाचावा आणि त्याचा अभ्यास करावा आणि विचार दर्शवावेत हीच सदिच्छा...!!

  ReplyDelete
 3. खृष्टानी mhanaje kay? I did Google search, but I am not able to get meaning of this word.

  ReplyDelete
 4. Thanks! I was discussing this topic the other day with Saumitra jee (Saumitra Gokhale) pointing him out that I have never ever been able to find a reference of sovereign Bharat from Gandhar to Brahma desh, and from Hindi mahasagar to Himalaya. To be frank with you, I was not fully convinced with the argument as it was mainly faith-based, and not historical reference based. However, I find this article more convincing, it attempts to distinguish "rashtra" (faith/psychology based) and "desh" (physical).

  ReplyDelete
 5. In either case however, re-modifying anthem, or filing PIL for the same is plain stupid. As you have rightly pointed out, its a hymn -not a definition of land claimed therein. Re-modifying it upon losing some piece of it, or upon winning from neighbors is not only practical, but goes against the very spirit of the hymn.

  ReplyDelete
 6. In retrospect. I find that Saumitra jee essentially said what you just pointed out here. You said Savarkar and Guruji proposed/introduced this concept of "Ankhada Bharat". I was told that even Chanakya had the same notion of "rashtra" in his mind when he approached local rulers of the land to fight united against Alexander. But again, origins or historic accounts/reasons for this concept of Rahstra are unknown (to me at least).

  ReplyDelete
 7. @ Anamika - धन्यवाद. सगळंच सगळ्यांना पटून मलाही चालणार नाही! ;-) मुक्त चिंतन हवे. सर्वोच्च न्यायालयाची निकालपत्रे वाचताना/चाळताना कसा वेळ निघून जातो कळतही नाही! :)

  ReplyDelete
 8. धन्यवाद खूप गोष्टीची उत्तरे मिळाली

  ReplyDelete
 9. @ Inspiring Reflections - धन्यवाद. आपले मत निवळल्याचे जाणून बरे वाटले. श्रीगुरुजींच्या विचारांचे ते "राष्ट्र" संकलन खूपच उत्तम आहे. त्या सूर्याकडून येणारा मूळ प्रकाश आरशाच्या तुकड्यांवर पडला की परावर्तित होतो. :-)
  .
  @ Pravartak - धन्यवाद बंधू.
  .
  @ Encounters with Reality - अरे संदर्भावरून साहजिकच आहे, की ते 'ख्रिश्चन' संप्रदायाला उद्देशून आहे. 'ख्रिस्तानी' च 'खृष्टानी' झालं असावं टाईप करताना. व्हिडिओत 'ख्रिस्तानी'च म्हटलं आहे.

  ReplyDelete
 10. @ sahdeV-वेधस- सर्वप्रथम नेहेमीप्रमाणे तू विचारप्रवर्तक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
  राष्ट्र ही संकल्पना खूप प्राचीन आहे. आपल्या वाङ्मयातून/व्यवस्थेतून याचे अनेक संदर्भ सापडतात.
  उदा. ॐ भद्रमिच्छंत ऋषयः स्वर्विदस्त्पो दीक्षामुपनिषेदुराग्रे |
  ततो राष्ट्रं बलमोजश्च जातं तदस्मै देवा उपसन्नमंतु || (अथर्ववेद 19.41.1)

  (भद्रम्‌) सुख और कल्याण को (इच्छन्तः) चाहते हुए (स्वर्विदः) स्वर्गीय जीवन वाले (ऋषयः) ऋषियों ने (अग्रे) पहले (तपः) तप और (दीक्षां) दीक्षा की (उपनिषेदु) शरण ली। (ततः) उसके बाद (राष्ट्रम्‌) राष्ट्र, (बलं) राष्ट्रीय बल, (य) और (ओजः) राष्ट्रीय ओज (जातम्‌) पैदा हुए। (तत्‌) इसलिये (देवाः) हे देव जनो! (अस्मै) इस राष्ट्रभाव, राष्ट्रीय बल और राष्ट्रीय ओज को (उप) प्राप्त करो और (संनमन्तु) एक होकर इसे नमस्कार करो।
  .
  अथवा 'सा नो भूमिः त्विषिं बलं राष्ट्रे दयातूत्तमे' (अथर्ववेद १२.१.८) अर्थ: ही आमची मातृभूमी आमच्या या राष्ट्रात तेज आणि बल धारण करून त्याचे संवर्धन करो.
  .
  उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्|
  वर्षं तद् भारतं नाम, भारती यत्र संततिः ||
  .
  आपली प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा अधिक बोलूच तोपर्यंत सौमित्र जी आणि संतोष जी आहेतच! त्यांना त्रास दे ;-))

  ReplyDelete
 11. good argument .... those folks who want to change the anthem need to get some therapy for their egos or take some history lessons

  ReplyDelete
 12. @ Dr. Abhijit Mukadam - धन्यवाद.
  @ Activ8 - Thanks for your comment. :-)

  ReplyDelete
 13. अतिशय सुंदर आणि संतुलित लेख. अगदी पटला. राष्ट्र म्हणजे केवळ भूगोल नव्हे, राष्ट्र ही एक भावना आहे. या दुसर्‍या याचिकेवरसुद्धा न्यायालयाचा निर्णय बदलणार नाहीच.

  अवांतर >> "जन गण मन " पंचम जॉर्जसाठी असेल यावर माझा अजिबात विश्वास नाही. ते संपूर्ण वाचल्यावर लक्षातही येते.

  ReplyDelete
 14. राष्ट्र आणि देश ह्या संकल्पना व त्यातील फरक जाणून घेतला जात नाही तोपर्यंत असे राष्ट्रगीतातील ओळ बदलण्याचे प्रयत्न होतच राहतील. कदाचित हे सर्व प्रकरण म्हणजे बुद्धीभेदाचा जाणून बुजून केलेला एक प्रयत्न सुद्धा असू शकेल. लेख चांगला जमला आहे.

  ReplyDelete
 15. sorrry**** ha keval budhhi bhed aahe########
  RAJEEVPARAB

  ReplyDelete
 16. @ Sanket - धन्यवाद संकेत. सध्यातरी असे वाटते आहे की निर्णय बदलणार नाही. पण कुणी सांगावे, सर्वोच्च न्यायालय आपले आधीचे निर्णय चुकीचे ठरवून बदलू शकते (overrule). बघूया काय होते ते.
  .
  @ विनय जी - नक्कीच अशा प्रयत्नातून बुद्धिभेद होत असतो. पण या लेखाने कित्येकांनी आधीचे मत बदलल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे बरे वाटते.

  ReplyDelete
 17. @ RAJEEV PARAB - Nakki konata buddhibhed aapan mhanat aahat?

  ReplyDelete
 18. Bengali script
  জনগণমন-অধিনায়ক জয় হে ভারতভাগ্যবিধাতা!
  পঞ্জাব সিন্ধু গুজরাট মরাঠা দ্রাবিড় উৎকল বঙ্গ
  বিন্ধ্য হিমাচল যমুনা গঙ্গা উচ্ছলজলধিতরঙ্গ
  তব শুভ নামে জাগে, তব শুভ আশিষ মাগে,
  গাহে তব জয়গাথা।
  জনগণমঙ্গলদায়ক জয় হে ভারতভাগ্যবিধাতা!
  জয় হে, জয় হে, জয় হে, জয় জয় জয় জয় হে।।

  অহরহ তব আহ্বান প্রচারিত, শুনি তব উদার বাণী
  হিন্দু বৌদ্ধ শিখ জৈন পারসিক মুসলমান খৃস্টানী
  পূরব পশ্চিম আসে তব সিংহাসন-পাশে
  প্রেমহার হয় গাঁথা।
  জনগণ-ঐক্য-বিধায়ক জয় হে ভারতভাগ্যবিধাতা!
  জয় হে, জয় হে, জয় হে, জয় জয় জয় জয় হে।।

  পতন-অভ্যুদয়-বন্ধুর পন্থা, যুগ যুগ ধাবিত যাত্রী।
  হে চিরসারথি, তব রথচক্রে মুখরিত পথ দিনরাত্রি।
  দারুণ বিপ্লব-মাঝে তব শঙ্খধ্বনি বাজে
  সঙ্কটদুঃখত্রাতা।
  জনগণপথপরিচায়ক জয় হে ভারতভাগ্যবিধাতা!
  জয় হে, জয় হে, জয় হে, জয় জয় জয় জয় হে।।

  ঘোরতিমিরঘন নিবিড় নিশীথে পীড়িত মূর্ছিত দেশে
  জাগ্রত ছিল তব অবিচল মঙ্গল নতনয়নে অনিমেষে।
  দুঃস্বপ্নে আতঙ্কে রক্ষা করিলে অঙ্কে
  স্নেহময়ী তুমি মাতা।
  জনগণদুঃখত্রায়ক জয় হে ভারতভাগ্যবিধাতা!
  জয় হে, জয় হে, জয় হে, জয় জয় জয় জয় হে।।

  রাত্রি প্রভাতিল, উদিল রবিচ্ছবি পূর্ব-উদয়গিরিভালে –
  গাহে বিহঙ্গম, পূণ্য সমীরণ নবজীবনরস ঢালে।
  তব করুণারুণরাগে নিদ্রিত ভারত জাগে
  তব চরণে নত মাথা।
  জয় জয় জয় হে জয় রাজেশ্বর ভারতভাগ্যবিধাতা!
  জয় হে, জয় হে, জয় হে, জয় জয় জয় জয় হে।।

  Ref- http://en.wikipedia.org/wiki/Jana_Gana_Mana_(the_complete_song)

  ReplyDelete
 19. चांगला लेख. उशिराने वाचला. बाकी वाचता वाचता एक राहून राहून वाटलं की या हिशोबाने एखाद्या माणसाचे वडील वारले की त्यांचं पण नाव काढून टाकायचं का? न्यायालयाने अशा याचिका घ्यायलाही नको असं मात्र वाटतं. शेवटी अभिव्यक्ती महत्त्वाची, आशय महत्त्वाचा की व्यक्तीस्थलसापेक्षता महत्त्वाची, वस्तुनिष्ठता महत्त्वाची हे ज्याचं त्याने ठरवावं. पण उगाच पब्लीसिटी स्टंट करू नये. तर असो.

  ReplyDelete
 20. "शता"!!! नाम ही काफी है! :P

  As usual, a very different, out-of-the-box perspective, but "bang on"!

  ReplyDelete