"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, September 11, 2011

गुलामाचे गुलाम!


भारताच्या सुरक्षिततेला धक्का पोहोचवणारी अजून एक मोठी गोष्ट गेल्या काही दिवसात घडली आहे. अजून एक गोष्ट म्हणण्याचे कारण एवढेच की, प्रत्यहीच अशा गोष्टी घडत आहेत. पण ही गोष्ट दूरगामी परिणाम होणारी आहे. आणि यातून धडा न घेतल्यास महागात पडणारीही आहे.
अमेरिकेच्या एफ.बी.आय. या गुप्तचर संस्थेने गुलाम नबी फई या ६२ वर्षीय पाकिस्तानी हेराला अटक केली आहे. आता या फईचे आणि भारताच्या सुरक्षिततेचे काय सबंध आहेत? यासाठी आधी फईचे ‘कर्तृत्व’ पहावे लागेल.

फईची पार्श्वभूमी – फई चा जन्म जम्मू काश्मीर मधल्या बडगाम जिल्ह्यातील वाडवन गावचा. त्याचे पदवी शिक्षण त्याने श्रीनगर च्या श्री प्रताप कॉलेजातून पूर्ण केले. खरी मजा पुढे आहे. पदव्युत्तर अभ्यासासाठी त्याने ‘अलिगढ मुस्लीम विश्वविद्यालय’ निवडले. तिथून तो शिष्यवृत्ती मिळवून मक्का, सौदी अरेबिया इथे गेला. तिथून पीएचडी साठी अमेरिकेत. भारतात असतानाच तो ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेचा सदस्य होता. त्याचा बालपणीचा मित्र म्हणजे ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ चा अतिरेकी नेता मोहम्मद युसुफ शाह उर्फ सय्यद सलाहुद्दीन.


फईचे कार्य - तो अमेरिकेत “काश्मीर अमेरिकन कौन्सिल” (KAC) आणि इंग्लंडमध्ये “जस्टिस फौंडेशन” अशा दोन संस्था चालवतो. वॉशिंग्टन, लंडन आणि ब्रुसेल्स या तीन ठिकाणी त्याची “काश्मीर सेंटर्स” आहेत. अत्यंत चलाखीने जवळपास २५-३० वर्षे फई हे काम करतो आहे. काश्मीर बद्दल पाकिस्तानची भूमिका नेत्यांच्या, राजकीय विश्लेषकांच्या, विचारवंतांच्या, स्तंभलेखकांच्या गळी येनकेनप्रकारेण उतरवणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरुद्ध पाकिस्तानची बाजू मजबूत करणे, स्वतंत्र काश्मीरसाठी वैचारिक दबावगट निर्माण करणे, एकूण जम्मू-काश्मीर भारतापासून तोडण्यासाठी एक जबरदस्त पार्श्वभूमी तयार करण्याचे काम तो गेली ३ दशकं करतो आहे. यासाठी विविध मार्ग अवलंबले आहेत त्याने. भेटीगाठी तर झाल्याच, पण वेळप्रसंगी पैशाचे आमिष दाखवून आपले मत बदलायला भाग पाडणे, मोठेपणा देऊन आपली बाजू पटवून देणे हे आणि असेच कूटनीतीतील अन्य मार्गही चांगलेच वापरले आहेत.
तो विचारवंतांचे संमेलन घडवून आणतो. त्यात बोलणाऱ्या वक्त्यांना आधी पूर्वपीठिका तयार करून देतो. जेणेकरून वक्ता भारताची बाजू अन्याय्यकारक रंगवून पाकिस्तानी बाजू सबळ करेल. मग या पंचतारांकित संमेलनाचे वृत्त छापून आणायचे. अशी त्याची कार्यपद्धती.

आर्थिक बाजू – यात प्रचंड प्रमाणात पैसा लागत असतो. ९० च्या दशकापासून पाकिस्तान ने फईच्या संस्थांसाठी ४ मिलियन डॉलर्स म्हणजे २० कोटी रुपये खर्च केले आहेत. शिवाय फईला स्वतःला सुमारे ५,००,००० ते ७,००,००० डॉलर्स दरवर्षी मिळतात खर्च करण्यासाठी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज वनवासी भागात आणि पूर्वांचलात दुर्गम भागात शाळा चालवतो. यात प्रचंड पैसा आणि मनुष्यबळ लागत असते. यातील काही मदत विदेशातून येते. ती मदत येऊ नये म्हणून आपल्या देशातील काही राष्ट्रविघातक शक्तींनी वेबसाईट्स काढल्या आहेत. आणि त्याचा ते जोरदार प्रचार अमेरिका, इंग्लंड इथे करत असतात. पण फई आणि त्याचे ‘फंडिंग’ याबद्दल अजून कोणी चकार शब्द काढलेला नाही. तेव्हा या अशा वेबसाईट्स आणि त्यात असणारे लोक यांचे लागेबांधेच स्पष्ट होतात. सूज्ञास अधिक सांगणे न लगे!

आमचे मूर्ख/विद्वान मित्र/शत्रू – ‘मूर्ख मित्रापेक्षा शहाणा शत्रू परवडला’ असं म्हणतात. आपल्या देशात मूर्ख मित्रांची कमी नाही. पण त्यांची इतरवेळची विद्वत्ता पाहता त्यांना मूर्ख म्हणवत नाही..आणि त्यांचे कार्यकलाप पाहता त्यांना मित्रही म्हणवत नाही. असे हे विद्वान बिलंदर शत्रू आपल्या देशात आहेत. ते फई च्या जाळ्यात सापडलेले आहेत. आणि आता फई चा खरा चेहरा समोर आल्यावर ‘आम्हाला हे काहीच माहित नव्हतं हो’...असा गळा काढायला त्यांनी सुरुवात केली आहे. फईकडून पैसे घेऊन त्यांनी आपली मते बनवल्याचे नाकारता येत नाही. पैशासाठी राष्ट्राची बाजू कमकुवत केल्याचे आणि राष्ट्रद्रोह केल्याचेच हे उदाहरण आहे. परंतु ह्यांच्यावर आपले नेभळट सरकार काही कारवाई करेल असे वाटत नाही. फईच्या इशाऱ्यावर नाचणारे  कोण आहेत हे कलाकार?
१.    कुलदीप नायर – हे भारताचे उच्चायुक्त होते इंग्लंडमध्ये. आता निवृत्त. भारत-पाकिस्तान मैत्रीचे अगदी हिरीरीने प्रतिपादन करणारे. ह्यांनी फई च्या कित्येक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. त्यांचे बचावात्मक म्हणणे असे की त्यांनी वेळोवेळी भारतीय वकिलातीला कळवले होते.
२.    न्या. राजिंदर सच्चर – हे एक निवृत्त न्यायमूर्ती. ह्यांचे नाव तुमच्या चांगलेच स्मरणात असेल जर तुम्ही सामाजिक, राजकीय, धार्मिक घडामोडींवर लक्ष ठेऊन असाल. ह्यांना काँग्रेसने भारतातील मुसलमान समाजाच्या परिस्थितीचा अभ्यास करून त्यावर एक अहवाल तयार करायला सांगितला होता. ह्या महाशयांनी असा अहवाल सदर केला की जणू काही मुस्लीम समाज अत्यंत मागासलेला आहे, त्यांच्यावर खूप अन्याय सर्वच क्षेत्रात चालू आहे आणि त्यांना सर्वप्रकारच्या सहाय्याची गरज आहे इ. हा अहवाल ‘सच्चर अहवाल’ याच नावाने प्रसिद्ध आहे. न्यायालयात ज्यावेळी बहुसंख्यक हिंदू समाजावरील अन्यायाच्या केसेस असतात त्यावेळी हमखास विरुद्ध बाजू या अहवालाचा उपयोग करून घेतात. तर अशा ह्या सच्चर चे फई शी सबंध! फई अजून एक संस्था चालवतो ज्याचे नाव आहे ‘ऑर्गनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स’. उगाच नसेल त्यांनी तो अहवाल असा केला. फई च्या मीठाला जागले म्हणायचे!
३.    दिलीप पाडगावकर – मराठी माणूस! टाईम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक. केंद्र सरकारने काश्मीरबाबत जो ३ माणसांचा अभ्यासगट नेमला आहे त्याचे प्रमुख. जागतिक स्तरावर भारताची काश्मीरबाबत काय भूमिका असेल हे ठरवणारा एक प्रमुख विचारगट आणि त्याचे हे प्रमुख. हेही अडकले फई च्या जाळ्यात. जम्मू-काश्मीर फिरून वगैरे आले पण ज्या खमकेपणाने आणि कठोरतेने भारताची बाजू मांडायला हवी होती ते केले गेले नाही. त्याचे कारण आता समजते आहे. २००५ साली ह्यांनी फई ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्याचा सर्व खर्च फई ने केला होता. अजूनही ह्यांची उचलबांगडी सरकारने केलेली नाही. त्यांचाही लुळा बचाव हाच आहे की मला माहित नव्हते फई असा आहे म्हणून. ३ जणांच्या अभ्यसगटाचे दुसरे सदस्य श्री. अन्सारी ह्यांनी पाडगावकरांच्या राजीनाम्याची अपेक्षा केली आहे. त्यांचे म्हणणे आता समजले आहे की व असा होता आणि आपण त्याच्या पाटाला पाट लावून बसलो होतो, तर आता तरी राजीनामा द्यायला हवा.
४.    मेरी – ह्या व्यक्तीचे मेरी हे नाव खरे नव्हे. तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. पण एकूण वर्णनावरून तुम्हीही ओळखू शकाल ही मेरी कोण आहे ते! ह्या मेरीवर फई ने लक्ष ठेवले होते. भारतात जन्मलेली, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेली, काश्मीरवर भारतविरोधी बोलणारी आणि भारत सरकार तिला काहीच न करणारे. तिच्या पिंजारलेल्या केसांपैकी एकालाही धक्का लागलेला नाही. अशा तिचे भारतविरोधी विचार हे पाकिस्तानला मदतगार ठरू शकतात हे चाणाक्ष फई ने हेरले नसते तरच नवल. मार्चमध्ये फई ने तौकीर मेहमूद बट्ट ला ईमेल केला की, “संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) एक बैठक आहे. आणि त्यात ही मेरी असणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेची (Human Rights Counsil) १७ मार्चला १३ वी सभा होणार असून, त्यात ३ ते ५ या वेळात तिला बाहेर भेटून घेतो.”
तशाप्रकारे तिला भेटून यशस्वी काम झाल्याचा ईमेल फई ने बट्ट ला पाठवला. तेव्हा ही मेरी कोण असेल?

अशाच प्रकारे आय.एस.आय ने फई ला २००८ मध्ये ६ माणसांची (भारतीयांची) यादी पाठवली आणि त्यांना आमंत्रित करायला सांगितले. त्याप्रमाणे फई ने त्या सर्वांना बोलावून एक कार्यक्रम आयोजित केला होता!

ऑगस्ट २००८ मध्ये फई ला काश्मीरमधील लोकांच्या ‘स्वायत्त मताधिकारावर’ जोर द्यायला सांगितले होते. जो अधिकार भारत त्यांना देत नाहीये. त्यावर फई भेटला अमेरिकेच्या दक्षिण आशियाई संबंधांसाठी सह सचिव असणाऱ्या व्यक्तीला-(Assistant Secretary of state for south Asian affairs)  आणि त्याला त्याने भारतीय बुद्धीजीवी लोकांनी, मानवाधिकार संस्थांनी आणि तथाकथित लोकांनी काश्मीर बाबत प्रकट केलेल्या विचारांचे पद्धतशीर आणि संगतवार संकलनच दिले! ज्यात भारताची बाजू चुकीची, अन्याय्यकारक दाखवण्यात आली होती, हे वेगळे सांगयला नको.


सध्या फई ला व्हर्जिनिया न्यायालयाने १,००,००० डॉलर्स च्या जामिनावर सोडले आहे आणि त्याला सध्या नजरबंदीत ठेवण्यात आले आहे. हा जामीन मिळताच न्यायालयाबाहेर जमलेल्या  त्याच्या ५० हून अधिक समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला! त्याच्या बायकोचा पासपोर्ट जमा करण्यात आला आहे. पुढे पाहूया काय होते ते. फई आणि त्याचे काम हे भारताला घातक असल्याने, अमेरिकेशी त्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसल्याने त्याला पुढे काही होणार नाही असे वाटते.

असे फई घातक तर आहेतच पण त्याहीपेक्षा वरील मंडळी अधिक भयंकर आहेत. घराबाहेर आलेला हिंस्त्र पशू तर भीतीदायक होयच, पण त्याहीपेक्षा तुमच्या-आमच्या चुलीच्या उबेवर वळचणीला वेटोळी घालून बसलेले हे विखारी-विचारी साप अधिक भयद्रावक!  


7 comments:

  1. You rocked once again! This article deserves wider audience. I suggest you creating another blog/portal in English. I would be happy to volunteer to provide you with translations.

    ReplyDelete
  2. I know you can very well do the job, just that I have only been putting suggestions, not "doing" anything. Therefore volunteering, NOT undermining your capability in any way :)

    ReplyDelete
  3. i liked it. well worded and nicely presented. it is sad thing that even in the case of external affairs we, as a nation, were not seen united. kya kare!

    ReplyDelete
  4. इंग्रजीत ही लिहावे ही विनंती !

    ReplyDelete
  5. This is a critical and trivial case and needs attention of entire country. I hope you have links for all what you placed here. Those should be kept safe or rather downloaded and securely stored. You may take help of CBI also. They have a public email. In addition you may approach media too.
    North Indians can't understand English much so the article should be at least in Hindi and English apart from Marathi.
    My blog http://janahitwadi.blogspot.com is in 3 languages. All the posts are not in 3 languages though. Keep it up.

    ReplyDelete
  6. भारतविरोधी काम करणारा हा एक विषारी सापच म्हणायला हवा.. पण तुझा हा लेख समाजात नक्कीच या अशा छुप्या देश विघातक शक्तींबद्दल जागृती निर्माण करेल यात शंकाच नाही.

    ReplyDelete
  7. Vikram, very well written. As for "Mary", I hate her guts, always have. If she is so cut up about Kashmir, why does she not bugger off to Pakistan!! They both deserve each other to the hilt if you ask me. The article reflects the reality of the modern "secular" India!! Sad but true. Keep up the excellent work. Love your flowing Marathi. Kedar Pandit, London.

    ReplyDelete