"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Saturday, April 16, 2011

मार्तंडराव आणि फ्रेंच मिसळ

फ्रान्स चे राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांनी त्यांच्या देशामध्ये मुस्लिम स्त्रियांनी बुरखा परिधान करण्यावर बंदी घातली आहे. निर्णयामागील धार्ष्ट्याचे कौतुक आहे; पण निर्णयाचे काय? या घोषणेने भारतातील काही लोकांनीही अगदी आनंद व्यक्त केला. आणि ‘मुस्लिम समाजाला अशाप्रकारे सार्कोझी यांनी एक प्रकारे जबरदस्ती केली आहे आणि ते योग्य आहे’, ‘भारतातही हे व्हायला हवे, पण आपले सरकारच लेचेपेचे आहे’ इ. अशाही प्रतिक्रिया ऐकायला, वाचायला मिळाल्या. पण हे ‘स्वधर्माभिमानी’(?) हे सोयीस्कररित्या विसरतात की भारतात विशेषतः उत्तरेत बऱ्याच जातींत, समाजात हिंदू स्त्रिया सुद्धा अवगुंठनात असतात. ‘घुंगट’ तेवढा चालेल आणि ‘बुरखा’ नाही ही असहिष्णुता आणि भेद चुकीचा आहे.



या विषयात जबरदस्ती होऊ शकत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव चेहरा पाहण्याची मुभा सुरक्षाकर्मींना द्यायला हवी. पण समाजात वावरताना तुम्ही बुरखा/घुंगट घेऊ नका असे लादणे चुकीचे आहे. काही ठिकाणी उलट समाजातूनच जबरदस्ती होते, त्या स्त्रीची इच्छा नसतानाही. अशा ठिकाणी चाप लावायला हवा, जर खरी हिम्मत असेल तर!

तसेच काहीसे कोल्हापूर मधे! फ्रान्स आणि कोल्हापूर, तसे साधर्म्य काहीच नाही. पण 'मार्तंडराव' दोन्हीकडे आहेत! आणि ते मानवतेच्या तत्त्वांची सरमिसळ बनवत असतात; तिखटजाळ! ती असते 'मार्तंडरावांची फ्रेंच मिसळ'! कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात आत्तापर्यंत स्त्रियांना प्रवेश नव्हता हे ऐकून धक्काच बसला. त्यावर मनसेचे आ. राम कदम आणि भाजपच्या सौ. नीता केळकर यांनी आंदोलन केले ही एक स्वागतार्ह बाब आहे. राजकारणी लोकांवर आगपाखड करताना चांगल्या कामाकडे काणाडोळा करून चालणार नाही. अशा ठिकाणी केवळ प्रवेशासाठी जोर जबरदस्ती केली तर ते योग्यच आहे. बरं इथेही धर्ममार्तंडांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. त्यांनी चूक दुरुस्त करण्याचे सोडाच, पण या स्थितीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. काहीतरी भोंगळ शास्त्रीय कारणे देऊन तार्किकदृष्ट्या या चुकीच्या प्रथेचे स्पष्टीकरण दिले. वाचा ‘सनातन प्रभात’ - http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2011/04/blog-post_4640.html

कारण असे दिले की, स्त्रियांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश का करू नये, यामागे शास्त्र आहे. मंदिरात पूजा करतांना वेदमंत्र म्हटले जातात. वेदमंत्र म्हटल्यामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. स्त्रियांची जननेंद्रिये ही शरिराच्या आतील बाजूस असल्यामुळे त्यांनी वेदमंत्र म्हटल्यास या उष्णतेचा त्यांना पुष्कळ त्रास होऊ शकतो. त्यांच्या गर्भाशयावर तिचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते; म्हणून शास्त्रानुसार स्त्रियांना वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार नाही, परिणामी वेदमंत्रांसहित पूजा करण्याचाही अधिकार त्यांना नाही.हे वाचल्यावर तर हसावे की रडावे हेच कळत नाही. ह्यांना वेदही कळले नाहीत आणि शास्त्रही कळले नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाबाबत किती झुंज दिली. त्यावेळीसुद्धा असल्या स्वयंघोषित बुद्धीशून्य कर्मठ लोकांनी विरोध केला. अक्षरशः दगडफेक केली. आणि धर्मात हे असलं मान्य नाही वगैरे तारे तोडले. असा धर्म सोडावा असं बाबासाहेबांच्या मनात आलं तर मग त्यात वावगं ते काय? जम्मू-काश्मीर मधेही या असल्या तथाकथित धर्मनेत्यांनी त्याकाळी परधर्मात जावे लागलेल्या लोकांना राजा हिंदू करून घेताना धमकी दिली, की जर त्यांना हिंदू केले तर आम्ही सरोवरात उड्या घेऊन प्राणार्पण करू. राजा घाबरला. आणि ते अहिंदूच राहिले. म्हणून ती बट्ट वगैरे आडनावे! म्हणजेच हे असे प्रकार घडतच आले आहेत आणि हेच खरे हिंदू धर्माचे शत्रू आहेत.

दुसरं कारण पुढे करण्यात आलं आहे की, दुसरे असे की, गाभाऱ्यात मंत्रोच्चार करून देवतेच्या तत्त्वाला आवाहन केलेले असते. त्याचे पावित्र्य राखायलाच हवे. धर्मशास्त्राने सांगितलेल्या कोणत्याही शास्त्रविधानामध्ये अभ्यासहीन पालट करणे, त्याच्या विरोधात वर्तन करणे, हे पाप आहे. ते करणार्‍याला त्याचे फळ भोगावे लागते.हास्यास्पदच आहे हे कारण. देवतेच्या तत्त्वाला आवाहन आणि ते देवतेच्याच अंशाने अपवित्र होते? भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, “सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो” – सर्वांच्या हृदयात माझा निवास आहे. पुरुषांना जी माता उदरात वाढवते तिच्यामुळे मंदिर अपवित्र होईल? मनात विकार आणि अविचार घेऊन जाणारे पुरुष मंदिर विटाळत नसतील तर कोणाही महिलेमुळे केवळ ती महिला आहे म्हणून मंदिराचे ‘पावित्र्य’ नष्ट होईल हे अशक्यच आहे.

शिवाय ह्यावर प्रतिवाद करताना मशिदी, मुसलमान ह्यांचे उदाहरण देऊन आव्हान केले आहे, की तिथेही महिलांना प्रवेश नसतो, तिथे आंदोलन करा. हे म्हणजे समोरच्याच्या घरात कचरा आहे, तो काढा, आमच्या घरातला तसाच राहू दे, असं म्हणण्यासारखं आहे. अथवा इस्लामसुद्धा मग हिंदू धर्माप्रमाणेच शास्त्रशुद्ध आणि तार्किक आहे असं म्हणावं लागेल..तेही आमच्या ‘मार्तंडरावांना’ पचनी नाही पडणार!

उगाच धर्मशास्त्र-धर्मशास्त्र म्हणून भुई थोपटून धर्माचे पालन केल्याचा आव आणणे चुकीचे आहे. हिंदुत्वाला पुष्ट करायचे असेल तर अशा भेदाभेदांच्या भावना संपुष्टात आणाव्या लागतील. त्याचे उगीच समर्थन करत बसू नये. कालौघात जो बदलत नाही तो विलयाला जातो. हिंदुत्वाचे टिकून राहण्याचे कारण म्हणजे तो लवचिक आहे उपचारांच्या बाबतीत आणि कट्टर आहे मूलतत्वांच्या बाबतीत उदा. सत्य, अहिंसा, सदाचार, प्रेम, विश्वबंधुत्व, ईश्वराचा सर्वांभूती निवास, आत्मौपम्य बुद्धि, समानता, पापभीरूता, परोपकार, कर्तव्यपालन, धर्माचरण इ. हे हिंदुत्वाचे अपरिवर्तनीय भाग आहेत. आणि अन्य कर्मकांड, पद्धती हे परिवर्तनीय भाग आहेत. त्यात युगानुकूल परिवर्तन झालेच पाहिजे. अन्यथा काळाच्या कठीण कसोटीवर कसा कस लागेल? एक गोष्ट आठवते- ‘प्रभाते तैलदीपं ज्वालयति’ अशा अर्थाचे सुभाषित होते. म्हणजे पहाटे तेलाचा दिवा लावून अभ्यासाला बसावे. आज जर ‘मार्तंडराव’ म्हणाले की, ‘मुला, बंद कर ती ट्युबलाईट आणि तेलाचा दिवा लावून बस अभ्यासाला’, तर मग दिवेच लागतील. म्हणून त्यातला ‘तेलाचा दिवा’ हा युगानुकूल परिवर्तनाचा भाग झाला. हे समजून हिंदुत्वाचे अनुसरण केले पाहिजे.

तालिबान, लादेन, फतवे असोत की अमेरिकेत झालेला कुराण जाळण्याचा प्रकार असो, सार्कोझींचा दडपण्याचा प्रयत्न असो की वर्ल्ड ट्रेड सेंटर ला दिलेली धडक असो ही सर्व असहिष्णुतेची उदाहरणे आहेत. जगभरात सांप्रदायिक असहिष्णुता डोकं वर काढत असताना हिंदुत्वाकडून जगाच्या (विचारी माणसांच्या, अभ्यासू लोकांच्या) आशा आहेत. विश्वबंधुत्वाचा आणि मानवी जीवन उन्नत बनवणारा (आयुर्वेद, योग, संस्कृत, संगीत इ.) हिंदुत्वाचा आशय जगात सर्वमान्य होत आहे. आपल्यालासुद्धा त्यात निर्णायक भूमिका बजावायची आहे.


अपेक्षित चित्र! "विराट सागर समाज अपना, हम सब इसके बिंदु है,
संस्कृती सब की एक चिरंतन, खून रगों में हिंदू है |"


तेव्हा ‘मार्तंडराव’, उगीच वायफळ गोष्टींत शक्ती न दवडता धर्मांतरित होणारा वनवासी, आजही असमानतेचे चटके सोसणारा दलित वर्ग, तुटणारा पूर्वांचल, धुमसणारे काश्मीर, दक्षिणेतील लव्ह-जिहाद अशा कित्येक बाबी आहेत. तेव्हा गाभाऱ्यातून बाहेर या आणि अशा वस्त्या, वाड्या, पाडे इथे मनात समरसतेचा भाव घेऊन जा आणि प्रेम द्या. स्नेहसूत्रात बांधा सर्वांना. तिथे तुम्हाला मनात सल आणि वेदना घेऊनही हिंदू म्हणून टिकून राहिलेली पण तुमची वाट बघत असलेली मंडळी दिसतील. त्यांच्या डोळ्यातली आशा संपण्याच्या आत पोहोचूया. नाहीतर उशीर होईल... 

34 comments:

  1. दोन्ही मुद्दे
    १] फ्रेंच सरकारचा बुरखा न घालण्याचा कायदा

    २] अंबेच्या मंदिरात स्रीयांना प्रवेश
    हे दोन्ही.........सर्वथा असमर्थनीय !!!!

    ReplyDelete
  2. Vaidya ji,

    can you please explain your argument a littlebit?

    ReplyDelete
  3. विक्रम ! अप्रतीम लिहिलंय .... पण तरी विषयाला अनुसरून नसला तरी वाटत कि हिंदू सहिष्णू , अहिंसावादी आहे हि चुकीची छाप निर्माण झाली आहे .... आणि अति सहिष्णू आणि अतिरेकी अहिंसे मुळे आपण बरच गमावलाय ..... शठम प्रती शाठ्यं हे आपण कुठेतरी विसरून गेलो .... अशा कडवेपणासाठी पण आपण ओळखले जावो हि सदिच्छा .... आपल्यावर आहे सगळं....

    ReplyDelete
  4. विक्रम, खूप छान, मुद्देसुर आणि परखड (पण सत्य) लिहितोस. आवडले!
    तुझे ब्लाग आजकाल मी नियमित वाचतो.
    मी तुझ्या मतांशी अगदी सहमत आहे.
    धन्यवाद,
    निलेश

    ReplyDelete
  5. @ वैद्य प्र.प्र.व्याघ्रसूदन - म्हणजे देवाच्या दारी आपण स्त्री आणि पुरुषांना केवळ ती स्त्री आहे म्हणून वेगळी वागणूक द्यावी हे पटते तुम्हाला? तेही अंबाबाई च्या मंदिरात? एकवेळ कार्तिकेयाच्या मंदिरात समजू शकतो.

    ReplyDelete
  6. @ Dr. Abhijit - अरे अगदी बरोबर आहे. 'देवो दुर्बल घातकः' हे मलाही मान्य आहे पण, आपल्याच अंतर्गत सुधारणा करण्यात अन्य लोकांचा सबंध कुठे येतो? आपल्यातल्या वाईट रुढी, कुप्रथा यांचे समर्थन न करता जर त्या सदसद्विवेकबुद्धीला पाटल्या नाहीत तर त्या सुधारण्यात काहीच वावगं नाही. आणि असं केलं तरच आपण टिकू शकू असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

    ReplyDelete
  7. @ Nilesh Pathak - धन्यवाद. अशा प्रतिक्रियांमुळेच वेळ काढून लेख लिहिण्याचा उत्साह मिळतो. वाचत रहा, आणि प्रतिक्रिया देत रहा.
    आभारी आहे.

    ReplyDelete
  8. कर्मकांड आणि मूलतत्त्ववादाच्या विरोधात प्रखर, जाज्ज्वल्य आणि डोळस हिंदुत्व हि आपली जुनी परंपरा आहे. अनेक संत, समाजिक कार्यकर्ते, पुढारी, कर्मकांडाच्या विरोधात वर्षानुवर्षे लढा देत आहेत. तुकोबांनी सांगितलेच आहे, "नाठाळाच्या माथी हाणावी काठी." जे कोल्हापुरात झाले, ते स्तुत्य आहे, ह्याची पुनरावृत्ती, देशभर होणे आवश्यक आहे. संत रामदास, ज्ञानोबा, गाडगे बाबा ह्यांच्या लढ्याला अद्याप संपूर्ण यश मिळाले नाही..
    परंतु, आज आणखी एक 'तात्याराव' जरूर मिळालेत!

    ReplyDelete
  9. अहो खूप सुंदर लख आहे....

    ReplyDelete
  10. ajibat patale nahi....je reason sanatan chya lokanni dile ahe tyavar tu abhyas kela ahes ka??? kiti gynecologist na jaun bhetlas ani tyat tathya ahe ka vicharlas?? tu Dr. ahes ka?? Ved ucharnamule kay kay effects hotat body var he kiti janakar lokanna vicharalas?? ka tuzya manala nahi patale mhanun virodh karat ahes...??? krupaya abhyas n karata tika karu naye..... kharach ajibat avdle nahi tuze mat....

    ReplyDelete
  11. sanatan chya lokanni je karan dile tyavar maza pan abhyas titaka nahi.. pan ved uchharanamule ushnata nirman hote he mi anek janakar lokankadun aaikal ahe ani tyach barobar stree chya shariratil rachana hi jitki flexible titki pregnancy sathi changli aste he sarvmany ahe tyamule ya ushnatemule flexibility kami honyachi shakyata nakarata yet nahi.... kadachit attache science pan yavar uttar deu shaknar nahi.. karan te titak pragat nahiye jitke purvi aple rushi-muninna mahit hote... tyamule lagech tika karu naye as vatat....dusare mhanje stri chya masik dharmache je 3 diwas astat teva unhygienic bacterias baher padtat he apana sarvanna mahit aslech tyamule tya diwasat devajaval jau naye ase purviche lok sangtat... kolhapur chya mandirat yenarya bayakanche darshanachyi veli tya babtit kay sthiti ahe he kalan nakkich ashakya ahe tyamule jar stiyanna tithe pravesh nakarala hota tar to stri varacha anyay ahe as mala 1 stri honachya natyani kharach vatat nahi....

    ReplyDelete
  12. विक्रम अतिशय मुद्देसुद लेख...शेवट आवडला अन पटलाही.

    ReplyDelete
  13. अप्रतिम.आत्मपरीक्षण करायला भाग पडणारे लिखाण आहे. कुठल्याही धर्मातले, समाजातले आत्म मग्न लोक त्या त्या समाजाला वर्तमानापासून दूर नेतात. परिस्थितीनुसार ना बदलणारा प्रत्येक प्राणी, मनुष्य, समाज, धर्म काळाच्या गर्तेत गडप होतो.

    ReplyDelete
  14. Comments war comment karna kitpat yogya te mahit nahi. Pan bacteria pasru nayet mhanun purushanna kay anghol kelyashivay mandirat pravesh navta ka? Mutaritun direct ale nahit he tyanchya vivekbuddhivarach avlambun thevla gela hota na? Manushya tasach ala tar tyacha pap tyachyakade asa mhatla jat asel kadachit pan to mandirat bacteria na shirnyacha agdi bullet-proof marga nave. Mag vivekbuddi kinva ticha pap tichyakade asa striyanchya babtit ka nahi? Shivay he je reproductive systemcha karan dila tech jar khara karan asel tar 9 varshakhalil mulinna kinva long term effects mhanun tyanna yeu dila nasel tar 55/65/75 varshanvaril baykanna pravesh hota ka? Je adhichyanni kela tech amhi karnar hya attahasapayi na patnari karna dili geli hoti asa mala vatta.

    ReplyDelete
  15. Ahaha. Vachave titke thode! Dharmashastracha abhyas asel kinva nasel, pan Gargi, Maitreyinchya 'level' cha yancha changlach abhyas disto. 90% hun adhik adhyatmik patali tyanni gathli hoti. Kashache 90%? Sarvadhik patalichya purushachya manane 90%? Sundar! Ashich jar vicharanchi suruvat asel tar tyancha shevatahi asach honar!

    ReplyDelete
  16. Sanatanmadhlya lekhakhali lekhakacha naav disat nahi. Aso.. pan mashid ani mandiratla mukhya ani kanadola na karta yenyasarkha farak mhanje, mashid he prarthanasthal ahe. Tithe pratyakshat devacha darshan hot nahi. Tithe prarthanesathi ekatra yeun Makkechya dishene tond karun prarthana keli jate. (Net-surfing warun asa dista ki bayka Makkela jau shaktat). Aplya devlanmadhe bhavik dev ahe ya bhavanene yetat.

    ReplyDelete
  17. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  18. Wondering.. adhyatmik patali gathnyasathi adhi ved vachave lagle astil Gargi, Maitreyinna, ki adhi ved na vachta adhyatmik patali gathun mag tyanni ved vachle astil? (sanatan-nusar dusra uttar barobar. Karan patali gathli mhanun tyanna ved vachaychi parvangi milali) Mhanje ved na vachta 90% hun adhik adhyatmik patali gathta yete. Mag dharmashastrancha abhyas na karta dharmashastrat badal karnyachi patratahi yeu shakel nahi ka?

    ReplyDelete
  19. @Anamika - Sanatan chya lokanni mashidicha mudda pudhe karayla nako hota he maany, tyanni itar sangitlelya goshti jya ahet (% pragati) tyavar mala farshi mahiti nahi karan mi follower nahiye pan tumchya eka comment baddal he sangu ichhite - Shariratil ghan baher takun jhalyavar devach darshan ghen ani ti ghan takane chalu astana darshan ghen ya donhi madhe khup farak ahe..... mala kay mhanaychay te tumhala kalala asel

    ReplyDelete
  20. बर्याच लोकांना वेद अजून समजलेच नाही.. कदाचित ह्यालाच, 'पुराणातली वांगी पुराणातच' असे म्हणतात!

    ReplyDelete
  21. @Sayali.. ghan? It is the lining that is there for just in case a fetus starts growing.. if it does not, it is thrown away.

    But, for a moment, let us keep all other issues aside including the above, calling all other irrelevant and may be my personal opinions. But LET US ANSWER ONLY THIS QUESTION: when the 'Rajgharana' women are allowed.. all the reasons in favor of not letting women in the gabhara fade away. I mean, ALL! Those women have the same anatomy as other women!!! Where does hindu dharmashastra differentiate between them and other women? (let our most learned dharmashastris tell the exact veda/purana verse)? Or is it that the Rajgharana women are pavitra no matter what, or their conscience is placed above all other women's conscience?

    ReplyDelete
  22. @Anamika-

    menstural blood contains 'dead cells' so I used word 'ghan' but regarding 'allowing ladies from Rajgharane and not allowing others',- I agree with you 100% and it is wrong.. no doubt....

    ReplyDelete
  23. lage raho. this is good peice of writing. it is well worded, articulate and balanced.

    ReplyDelete
  24. @ Manoj, Shubham, Vikram, Yogesh, Atul, Sharadmani Ji,
    लेख वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. बरं वाटलं.:-)

    ReplyDelete
  25. @ Anamika and Sayali -
    ह्या लेखाने चर्चा-प्रवर्तकाचे काम केले आहे. हेच आनंदाचे आहे. लेखात टीका-टिप्पणी होणारच. त्याने कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व. पण अशा बाबींकडे काणाडोळा नाही करता येत.

    ReplyDelete
  26. sundar likhan aahe. tumcha blog vachu aapan hi kahi lihave yala prosahan milate. dhanyvad

    ReplyDelete
  27. lekhache sirashak vachun jara kay aahe te nemake kalat nahi.....

    ReplyDelete