"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, April 21, 2011

निष्पर्णा...

कोकणातले माळावरचे हे
  निष्पर्ण अन् एकाकी झाड पाहून...निष्पर्णा

निष्पर्णा कधी तुला वाटले, पान-कळ्यांनी भरून जावे,
फुला-फळांनी अवचित केव्हा, पानोपानी बहरून यावे |
माळावरती उभा एकटा, कुणीच नाही तुला सोबती,
जसा उगवला दिवस एकटा, तशीच सरते रात्र एकटी |
तप्त उन्हाच्या झळा सोसता, वठून गेली अवघी काया,
अपुले कोणीच नाही म्हणता, कोणावरती करशी माया |
दाटून येता घन आभाळी सळसळ अपुली व्यक्त करावी,
बरसून जाता मेघ चि अवघा, पिऊन घ्यावा पानोपानी |
अंगोपांगी शहारणारा थंड हिवाळा शीतल वारा,
शुष्क तुला पण कसा कळावा थरारणारा गोड शहारा |
चैत्र पालवी, वसंत अथवा, येऊन जावो ग्रीष्म उन्हाळा,
उरी निरंतर जपत रहाणे, वांझपणाच्या तप्त झळा |
असे एकटे किती जहाले सोसत अपुले भाग्य निरंतर,
अंती सारे एकएकटे, हेच खरे तर फक्त चिरंतन!
                                               
                                                -विक्रम20 comments:

 1. excellent. you are sensitive and have a mastery over this medium. keep it up.

  ReplyDelete
  Replies
  1. शरदमणी जी, आपल्यासारख्याकडून ही प्रतिक्रिया मिळाली याचा खूप आनंद वाटतो.

   Delete
 2. Aathavani jagya hotat saheb..

  ReplyDelete
 3. छानच - तुझा काव्य वृक्ष सदा टवटवीत राहो!

  ReplyDelete
 4. Chaan! Liked the way you empathised with the tree. And then your way with words.

  ReplyDelete
 5. Khoop chhan..........madhe madhe blog la bhet det asato. chhan lihitos......keep it up!

  ReplyDelete
 6. वा कवी विक्रम!
  सुंदर काव्य.

  आपला
  (प्रभावित) प्रवासी

  ReplyDelete
 7. फारच अप्रतिम शब्द आणि त्यामागील भावना.

  ReplyDelete
 8. विक्रम, तुझी कविता निव्वळ अप्रतिम झाली आहे. ती वाचून मला सुचलेली कविता प्रतिक्रिया म्हणून देत आहे. या औधत्याबद्दल क्षमस्व

  व्रतस्थ...
  वठलेली जरी असली काया, वठले नाही अजून अंतर
  शुष्क कोरड्या देहातूनी या, चैतन्याचा झरा निरंतर ॥
  आजही येता निज आकाशी आषाढीचा गर्जत मेघ
  थकलेल्या या गात्रांमधूनी आळवितो मी सर्जनराग ॥
  ग्रीष्मर्तुचा दाहक भास्कर तळपे दिवसा माथ्यावरती
  शरदातील पण स्निग्ध सुधांशु रात्री पखरे चांदणनक्षी ॥
  उजाड डोंगरमाथ्यावरती सोबत करतो मजला वारा
  रात्रंदिन मी मोजीत राही, या विश्वाचा असीम पसारा ॥
  शतपुत्रांची असूनी माता निपुत्रिका ठरली गांधारी
  असल्या या विषवल्लीपरती वांझपणाचीच मातब्बरी ॥
  एकलाच मी पृथ्वी एकली ध्यानी उभा हिमवंत एकला
  व्रतस्थ राहूनी माळरानी या नित्यनिरंजन ध्यासच मजला ॥

  ReplyDelete
  Replies
  1. ॐकार जी, मला काय म्हणायचे ते फक्त तुम्हाला कळले असावे...आणि तुम्हाला काय म्हणायचेय तेही फक्त मला कळले असावे! ;-)
   दोन्ही प्रकारच्या वृक्षांची गरज आहे हे मात्र खरे..! काय! :-))

   Delete
 9. विक्रम आणि ओमकार, दोघांच्याही कविता अप्रतिम. विक्रमजींकडे लेखन प्रतिभेबरोबरच काव्य प्रतिभाही आहे हे समजले.

  ReplyDelete
 10. vikram ani omkar.. kavita donhi sundar.

  ReplyDelete
  Replies
  1. अनामिका बाई, आभारी आहे..

   Delete