"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Tuesday, April 12, 2011

जरा चुकीचे, जरा बरोबर ! अण्णा हजारे आणि आंदोलन.


आदल्या दिवशी मलिंगाला शिव्या घालून, सचिनला डोक्यावर घेऊन, दणाणा नाचून भारत झोपला होता. गादीवर आळसत पडला होता. जणू स्वर्गातून खाली भूलोकी न्याहाळावे काय चालू आहे म्हणून टी.व्ही. चा अंगाखाली आलेला रिमोट चाचपून काढला आणि टी.व्ही. चालू केला. सगळ्याच वृत्तवाहिन्यांवर कोणीतरी गांधी टोपी घातलेला एक वयस्कर ‘मराठी’ माणूस दिसायला लागला. जरा कूस बदलून ‘इंडिया’ पण ‘अटेन्शन’ मधे आला. हा स्टार माझा अथवा झी २४ तास नव्हे...अगदी गेला बाजार आयबीएन-लोकमत पण नाही. हे तर हिंदी-इंग्लिश २४ तास दळण दळणारे. पण मग कोण आहे बरं हा माणूस?

भारताने ग्लासमागे आल्याने मोठ्ठी दिसणारी सिगारेट हेरली. कालचा रिता ‘ग्लास’ बाजूला करून ती उचलली. शिलगावली. चुरगळलेली चादर बाजूला केली. समोर ठणाणा सुरूच. “अण्णा ने शुरू किया अनशन”, “जन-लोकपाल पर अडे अण्णा”, “अण्णा की चेतावनी”. चला काहीतरी ‘मॅटर’ झालेला दिसतोय! उठून निदान चहा-बिहा बघायला हवा.

इंडिया ने आपले वाढवलेले केस खाजवले. जाम डोक्यात काही शिरेना. कोण बरं हा. कधी पहिला तर नाही. पण दिल्लीत ठाण मांडून आहे आणि सगळे मिडीयावाले चिवचिवाट करतायत म्हणजे नक्कीच काहीतरी इश्यू झालाय! चला उठायलाच हवं. वेफर्स पण थोडेच उरलेत. फ्रीजमधला डाएट कोक काढून धब्कन कोचावर बूड आदळले. समोर सुरूच “अण्णा की मांग”, “सरकार पर बढा दबाव”, “Anna Hajare demands people’s participation”. ब्लॅकबेरी वर सफाईदारपणे बोटं फिरली ‘whos dis Anna yaar?!’ समोरून निमिषार्धात उत्तर ‘Donno yar, letz google it’.

तोपर्यंत दिवस बऱ्यापैकी वर चढला होता. दूध टाकणाऱ्या मुलांनी दूध टाकले होते, हातगाडीवाले वजनदार हातगाडी संथपणे ओढत पुलावर चढले होते, रस्त्याचे खोदकाम सुरु झाले होते, शेतकरी ढवळ्या-पवळ्या ला हाकारत नांगरट करत होता, सिग्नलवर लिंबू-मिरची, फुलांचे गुच्छ, पुस्तक-मासिकांचे गठ्ठे घेऊन लगबग सुरु होती, रस्ते झाडले जात होते, शांताबाई पदर खोचून भांड्यांचा ढीग घासत होती.

जंतर-मंतर वर माणसं दिसू लागली. टळटळीत दुपार झाली. कष्टकरी वर्गाने डबे उघडले, रखमा शेतावर कांदा-भाकर घेऊन गेली. इंडिया ने परत msg धाडला, ‘its sumthng biggr thn wht V thoght, letz join’. समोरून उत्तर, ‘k. b redy dwn. cming in ma car’. इंडिया ने कपाट उघडले ... कोणती जीन्स या ‘इव्हेंट’ ला सूट होईल...ठीक. आता which belt....७ पट्ट्यांमधील एकाचे भाग्य उदेले. पुढे fab India चे कडक इस्त्री केलेले काही आणि मुद्दाम थोडेसे चुरगळून तयार करून ठेवलेले काही कुडते होते. ओके. या ‘अॅजिटेशन’ ला ‘मॅच’ झाला पाहिजे ना. ती ‘--- चॅनेल’ ची बेब मलाच गाठणार. so I will be on air! कपडे करता करता मनोमन - yaar Anna is doing sumthng gret but!

भारताने चहा करून घेतला. समोर सुरूच “अण्णा का अल्टीमेटम”, “शरद पवार ने दिया इस्तीफा” ... अरे हे तर आपले राळेगणसिद्धीवाले! अण्णा हजारे. भारताच्या डोक्यात काहीतरी चमकले. त्या नादात अर्धे भिजलेले बिस्कीट कपात गळून पडले. चरफडत त्याने चमचा आणला. उद्या ऑफिसात चर्चा होणार नक्की तेव्हा आता बाहेर निघण्याची तयारी करावी लागणार हे तो समजून चुकला!

इंडियाच्या घराखाली हॉर्न वाजला. इंडिया १७ व्या मजल्यावर दोन्ही लिफ्टची बटणे दाबून वाट बघत उभा होता. एक लिफ्ट १५ वर तर एक १३ वर! हातात स्क्रोल सुरूच होते. अपडेट राहायला हवे. ‘this anna is bringing revolution’! लिफ्टमध्ये महागडा पण घुसमटणारा उंची सुवास मागे ठेऊन इंडिया गाडीत शिरला. जंतर-मंतर कडे सुसाट! ‘do u feel he wil win d battle’? ‘letz c’. जंतर-मंतर आले. घोषणाबाजी सुरु.

भारताला तर स्टेजवर कोणी हवशे-नवशे-गवशे दिसून राहिले. ‘बे हे एरवी तर त्याहिंची बाजू घेऊन भांडतेत आज काहून अण्णाले साथ करून ऱ्हायले?’ ‘मायला तो भगवी पागोटे-कफनीवाला तर लुच्चा एक नंबरी. ‘अग्नीतच प्रवेश’ करायला हवा त्याने. अण्णाला संगत करतेत!’ ते बग टी.वी.वर कोकलते. मायला सगळ्या चटक-चांदण्या, भटक-भवान्या, गॉगलवाले हिरो अण्णाला पाठिंबा देतेत. xxव्यांनो एवढी वर्षं कुठे व्हतात?  

संध्याकाळ होऊ लागली. घोषणाबाजी करून घसे सुकले होते. बिसलेरी, पेप्सी, सेवन-अप् वाहिले. कोकलून कोकलून गरज भासली कोकची. ‘letz go to McDnld’, ‘no, plz yar, Anna is on fast, V wil go 2 CCD, only cofi 2de’. ‘decide fast yaar, v hav 2 join Anna, battl isnt ovr!!’. इंडियाच्या चलाख आणि तयार मित्राने झोळीतून मेणबत्त्यांचे बॉक्स आणले होते. प्रत्येकाला वाटली गेली. कँडल मार्च निघाला. Youth is united! Fight against corruption. We are with U Anna! पुठ्ठे हलत होते! रात्र व्हायला आली. अण्णांच्या मागण्या मान्य झाल्या. सामान्य जनता वगैरे जिंकली. इंडिया आणि मित्र घराकडे निघाले. पिझ्झा घरपोच ऑर्डर झाले.

भारत विचार करत होता, अण्णांनी कसली गॅप काढली यार..वर्ल्ड कप संपला आणि आय.पी.एल. सुरु व्हायच्या मधल्या वेळात. मिडिया तर ब्लँक होती चिंतेत. साला मिडीयाला पण मसाला मिळाला. नाहीतर कुठे कळणार होतं काय जजंतरम्-ममंतरम् चालू आहे ते. ड्राफ्ट कमिटीत समावेश झाला पण कोणाचा? इतक्या सहजगत्या? बेदी कुठे राहिल्या? २-२ ‘आभूषणं’ काय करतायत? की पुन्हा एकदा तोच अदृश्य ‘हात’ या सर्व बाहुल्या सफाईदारपणे नाचवणारा? असो. झालं ते काहीतरी सॉलिडच झालं. आता हा कायदा आला की नंदनवन म्हणतात ते हेच होणार! चंदूच्या वेळी डोनेशन द्यावं लागलं, आता श्रद्धाच्या वेळी नाही द्यावं लागणार. कायदा येतोय ना! आई गेल्यावर पाण्याचा मीटर नावावर करायला वॉर्डात---...जाउदे. आता तसं नाही व्हायचं. कायदा येतोय ना! शिक्षणसम्राट झाले, साखर कारखाने होतेच, त्यांच्या वाईनरीज उघडल्या. पण उद्या बंद होणार हे सर्व. कायदा येतोय ना! पोलिसाला पावती फाडायलाच लागणार, चहापाण्यावर नाही चालायचं. कायदा येतोय ना! आर्.टी.ओ. स्वच्छ होणार. कायदा येतोय ना! भारत हर्षवायूने वेडा व्हायची पाळी आली. हे स्वप्न बघता बघता दिवसभराच्या श्रमाने तो कधी झोपून गेला त्याचं त्यालाच कळलं नाही. झोप आलीये की ग्लानी आली हेही समजण्याएवढे त्राण त्याच्यात राहिले नव्हते! रस्त्यावर पिवळा प्रकाश ओकणारे दिवे लागले होते. संधिप्रकाश पसरला होता.

हातगाडीवाले चंची उघडून गावगप्पा मारत होते, खोदकाम करून पुष्ट झालेले काळेकभिन्न बाहू बाळाला घेऊन घरी चालले होते, सिग्नलवरची दिवसभराची कमाई लहान हात मोजत होते, ढवळ्या-पवळ्या ला वैरण-आंबोण टाकून धोंडीबा ओट्यावर विसावत होता, झाडू-टोपल्या एकत्र ठेऊन कामगार हात-पाय धूत होते, शांताबाई कडोसरीच्या चुरगळलेल्या नोटा पाहत होती आणि रखमा निढळाचा घाम पुसून कंदील लावत होती. 

42 comments:

 1. मस्त लिहीलंय. इंडीया आणि भरतची मनोवस्था.........१००% खरी. कृपया हे पण वाचा. मी शतपावलीवर लिहीलेला कोंबडा आरवला......http://shatapavali.blogspot.com/2011/04/blog-post_08.html आणि फेबु वर लिहीलेली नोट http://www.facebook.com/#!/note.php?note_id=10150254395079502

  ReplyDelete
 2. काय लिहले आहेस रे....
  कानात काहीतरी सूंसूंसूंसूंsssssssss वाजत आहे.. डोक्याला शॊट लागला राव!

  ReplyDelete
 3. If u want me to respond lyk India, its prety kool man.. I lyk it.. awesome... :)
  And Bharat within me can say...
  च्या मारी.. काय भयाण खरडता राव? त्येंनी मेणबत्त्या चेतीवल्या तुम्ही मशाली जाळून राहीलेत बा..

  ReplyDelete
 4. xxव्यांनो एवढी वर्षं कुठे व्हतात?
  येथे पहिला X = भ आणि दुसरा X = ड असा वाचवा.
  -जनहितार्थ

  ReplyDelete
 5. @ शांतीसुधा - धन्यवाद. मी आपला लेख वाचून मग तिथे प्रतिक्रिया देईन.

  ReplyDelete
 6. @ राजे - राज जैन - धन्यवाद. मी ही 'compliment' समजतो. लेख चांगला झालाय असेच म्हणणे असावे आपले. :-))

  ReplyDelete
 7. @ मनोज - दोन्ही प्रतिक्रिया सही. हसून राहिलो आम्ही! :-)) पायरी सोडता येत नाही किती झाले तरी म्हणून xx!
  :p

  ReplyDelete
 8. कशावर प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही ! भाषेवर ? लिहण्याच्या शैलीवर ? दुसर्‍या बाजूने विचार करण्याबद्दल ? सर्वच अद्भूत .अप्रतिम .. !! भारत आणि India तील द्वंद्व अधोरेखित करणारे लिखाण !!

  ReplyDelete
 9. अप्रतिम... INDIA ची खरी मानसिकता दाखविली आहे

  ReplyDelete
 10. Mast. Ani lokpal kay jaminitle khodun kadhnar ahet kay? Te tar aplyatlech nivadnar. Corruption-proof kuthun asnar te? Samajala bhrashtachar karaychach asel tar lokpal asun kay upyog?

  ReplyDelete
 11. विक्रम,
  छान लिहिलयस. असेच लिहित रहा.
  शिरीष

  ReplyDelete
 12. अप्रतीम लेख लिहीला आहेस...

  ReplyDelete
 13. Vikram, ek number...
  shabda nahi oure padnar sundar mhanayala...!!

  ReplyDelete
 14. अप्रतिम लेख !! शैली, मांडणी, तपशील सगळंच आवडलं !! सुंदर !!

  ReplyDelete
 15. छान लिहलेय. लिहीत रहा. सन्माननिय अण्णांच्या कायद्याचे फायदे खरोखरीच मिळतील काय? मिळाले तर कोणाला? कपिल सिब्बलची लायकी सर्वज्ञात आहे. परंतु चुकुन का होईना त्याने सत्य सांगितले. कायदे कसेही करा. ते धाब्यावर बसवून मलई कशी खावयाची या मध्ये आम्ही निपुण आहोत. कोठल्याही कायद्याची ऐशी का तैशी करणे आमच्या डाव्या हाताचा मळ. अण्णानीही गुन्हा होईपर्यंत गप्प रहा व केल्यावर कसे वठणीवर आणतो ते पहा हे सोडून गुन्हा होऊच नये म्हणून काही तरी करावे. थ्याबद्दल भरपूर येथे वाचावयास मिळेल.
  http://janahitwadi.blogspot.com/2010/10/preparations-needed-for-fighting.html

  ReplyDelete
 16. अप्रतिम....चाबुक लिहल आहे...ज..ह...ब...री...

  ReplyDelete
 17. मस्त रे मित्रा...जमलं आहे...
  भारत आणि इंडिया यांची मानसिकता नेमकी पकडली आहेस..
  शेवट चटका लावणारा....

  ReplyDelete
 18. विक्रम अतिशय बाप !! उपरोध ठासून भरलायं !! बोलल्याला जागलास :) एक फुलची आठवण झाली !! वाल्या विवेकवाल्यांना कळेल अशी अपेक्षा !!

  सूचना: वाल्या किंवा विवेक किंवा विवेकवाल्या यातील कोणत्याही शब्दावर कोटी करण्याचा हेतू नाही याची नोंद लेखक आणि वाचकांनी घ्यावी !

  ReplyDelete
 19. कसलो जबरदस्त लिवता रे तू!!आजच्या भारतीय समाजाची मानसिकता "भारत" आणि "इंडिया" मधून अगदी अचूक पकडली आहेस.

  ReplyDelete
 20. विक्रम,

  दैनन्दिन गोष्टीचा धागा उत्तम पकडला आहेस.अणि आजुबाजुचे वर्णन तर अप्रतिम शब्दात केले आहेस..
  छान लेख...लिहित रहा !!

  ReplyDelete
 21. विक्रम मस्त बोचरे लिहिले आहेस ... ज्याला बोचेल तो नक्कीच मनोमन ओशाळेल

  ReplyDelete
 22. मस्त लेख.. अगदी अंतर्मुख होऊन वाचावा असावा!

  ReplyDelete
 23. mast lekh aahe........aannani uposhan kele jantamantar var.........Youth cha pratisad pahun vatale, ajun hi rastrabhakti aahe mhanayachi....

  ReplyDelete
 24. India that is Bharat अस नाही हे पटत अशा घटना घडतात तेव्हा!

  ReplyDelete
 25. vikram ..... no comments ..... A P R A T I M .....

  ReplyDelete
 26. कैलास जी, भूषण जी, अमृत, अनामिका, शिरीष जी, विक्रम, प्रवर्तक, वरदा, हेरंब, जना, योगेश, उन्मेष, ॐकार, तेजश्री, सिद्धार्थ पुराणिक, शंतनू,विनायक, शरद, सिद्धार्थ, भुंगा, रोहन, आतिवास, राजेश जी -

  तुम्हा सर्वांचे लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप आभार. लेख वाचून बरेचजण जातात. प्रतिक्रिया दिली की लेखकाचाही हुरूप आणि उत्साह वाढतो.
  धन्यवाद.

  ReplyDelete
 27. विक्रम लई भारी. खरच अप्रतिम लेख लिहिला आहेस

  ReplyDelete
 28. त्रास देणारा लेख झालाय. मस्त.

  ReplyDelete
 29. एकाच दगडात सोनिया म्याडम नि किती पक्षी मारावेत याला काही मर्यदाच नाहित राव....
  पवार साहेब,
  बीजेपी
  आणि जनता ..........आणि .......

  ReplyDelete
 30. अण्णांना जो कोट्यवधी लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला, त्यामध्ये मला सर्वात महत्वाची भूमिका इंटरनेट आणि मीडियाची वाटते. देशातल्या माजलेल्या भ्रष्टाचाराचा फटका देशातल्या तरूणाईलाही बसला आहे, However Cricket, CCD , Pizza have become part of their lives. baki lekh Mast Aahe. Tu far Khara Boltos.- geeta mulekar

  ReplyDelete
 31. Kharatar bhartala Chalval karnyachi garj mala watate India ni khup support kele Pan Lokshahiche mahatva Bharatala kalel tevha revolution Ghadel

  Karan ya sagalyat khara toch thechala jato

  ReplyDelete
 32. Good. Lekh jamaly, fakt abruptly sampato. Good, keep it up.

  ReplyDelete
 33. @ Kiran ji Damle, Blue Feather, Kaustubh Bahulekar, Boxer, Mrs. Geeta Tai Mulekar, Sayali Thatte, Waman, Ratan ji Sharda -
  मनःपूर्वक धन्यवाद.

  ReplyDelete