'जळण' ही माझी एक जुनी आणि आवडती कविता. वनवासी बंधू, उपेक्षित गिरिजन, भटके-विमुक्त अशांबद्दल चाललेले संघाचे प्रकल्प याबाबतीत अधिक ऐकायला मिळाले होते. आणि १२ वी म्हणजे काव्य स्फुरले नसते तरच नवल! एका वर्षी कॉलेजच्या स्वरचित काव्य स्पर्धेत प्रथम बक्षीस मिळवून दिले या कवितेने. आणि दुसऱ्या वर्षी एका राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत बहुधा दुसरे बक्षीस मिळाले. पण ती डोंबिवलीची संस्था अशा भागात शिक्षण प्रसाराचे काम करत असल्याने पुरस्कार रक्कम त्या कार्यक्रमातच संस्थेला परत केली. असा अवर्णनीय आनंद आणि समाधान या कवितेने मला दिले.
मी तुझा आभारी आहे.