"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Saturday, January 1, 2011

महाराष्ट्र 'डीग्रेड"

पूर्वीच्या एका लेखात राजकारण्यांची, नेत्यांची नावे घेऊन स्पष्ट लेखन केले होते. त्यानंतर लगेचच ब्लॉग ‍‌हॅक झाला. अर्थात या दोन गोष्टींचा परस्परसंबंध कितपत असेल हा भाग वेगळा. परंतु जेव्हा अनेकांनी ईमेल करून, ‘कृपया नावे घेऊन घाणीत दगड मारण्यापेक्षा केवळ सूचक लेखन करावे, त्यातून नावे कळतातच’ हा भाव व्यक्त केला. तेव्हापासून शक्यतो व्यक्तींचे नाव न घेता लेखनाचा प्रयत्न.

दादोजी कोंडदेवांचा पुतळा लाल महालातून कापून काढण्याचा ठराव काही करंट्यांनी पुणे महानगरपालिकेत संमत केला. आणि त्यानुसार कार्यवाहीसुद्धा केली. दादोजी शिक्षक होते की नव्हते याहीपेक्षा ते कोणत्या जातीचे होते यावरून हा सारा प्रकार घडला आहे. वेडगळपणाची झाक असलेल्या काही नतद्रष्ट संघटना याच्यामागे आहेत. जातीय विद्वेष पसरवणे हेच ज्यांचे उद्दिष्ट आहे अशांकडून महाराष्ट्राला ‘Dgrade’ करणाऱ्या अशा घटना न घडल्या तरच नवल! ‘अठरापगड जातींना एकत्र करणाऱ्या’ हिंदूनृसिंहाच्या राज्यात असे लांडगे राज्यावर यावेत आणि त्यांनी हैदोस घालावा यापरते दुर्दैव कोणते?

आश्चर्य वाटते ते प्रत्येकाच्या भूमिकेचे. या लांडग्यांना विरोध करून पळता भुई थोडी करणे कठीण नव्हते. कित्येक जणांकडे अशी शक्ती आहे. सर्वप्रथम या राज्याचे शासन! पण ते स्वतःच जर जातीवर आधारलेले असेल तर अपेक्षा ठेवणेच फोल आहे. काहीजणांनी तर जाळपोळीचे ‘आदेश’च दिल्याचे ऐकिवात येते आहे. ‘अमुक ठिकाणी बसेस जाळा, दगडफेक करा, म्हणजे तणाव निर्माण होईल इ.’ कोंडदेव राहिले बाजूला! अर्थात असे ‘काळे-गोऱ्हे’ प्रत्येकच पक्षामाजी असतात! त्यांच्याकडे पोळ्या तयारच असतात..सामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे जळण घातले की झाली पोळी भाजून तयार! बाबासाहेब पुरंदऱ्यांना व्यासपीठावर हौसेने बसवणारे, कौतुक करणारे गप्प का? आम्ही बाबासाहेबांनी, गोनीदांनी, सरदेसायींनी सांगितलेला शिवेतिहास वाचत-ऐकत मोठे झालो. दादोजी कोंडदेव होतेच गुरु शिवरायांचे. पण कुठे आहेत बाबासाहेबांचे शिलेदार? एरवी राष्ट्रीयत्वाचा विचार करणाऱ्या आणि हिंदुत्वाचा हुंकार भरणाऱ्या काही स्वयंसेवी संघटनांनी या दुर्दैवी प्रकाराबद्दल एखादे निषेधाचे पत्रक काढल्याचेही ऐकिवात-पाहण्यात आले नाही (निदान माझ्यातरी!) याचेही सखेद आश्चर्य वाटते.

नगरपालिकेत ज्यांनी हा ठराव मांडून संमत करून घेतला त्यांना भ्रष्टाचार, अनागोंदी यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आहे हे स्पष्ट आहे. तेव्हा जणू पापाचे शेवटचे काही घडे राहिलेत आणि तेही वेगाने भरण्याची सुरुवात केलेली दिसते. वाट पाहायची आता यांना त्यांची जागा दाखवण्याची.

तेव्हा सध्या आपण काहीच करू शकत नाही. खोली बंद करायची, महाराजांच्या तेजस्वी मुद्रेसमोर म्लानमुखाने नतमस्तक व्हायचे, दादोजींसाठी दोन अश्रुफुले वाहायची आणि आत खोलवर रुतलेला बाण मूकपणे सलत ठेवायचा...

11 comments:

  1. ‘अमुक ठिकाणी बसेस जाळा, दगडफेक करा, म्हणजे तणाव निर्माण होईल इ.
    nailaj Asato kahi vela todphod kelyashivay kuni eikatach nahi

    ReplyDelete
  2. विक्रम, या सगळ्या प्रकारात खेदाची बाब म्हणजे मूळ गोष्ट बाजूला राहिली आणि नको त्या विषयावर चर्चा सुरू झाली. सरत्या प्रत्येक दिवसागणिक महाराष्ट्राची परिस्थिती खालवतच चालली आहे...

    ReplyDelete
  3. कलयुग सुरु आहे अणि निर्जीव पुतळे सोयीस्कर रित्त्या काही सजिवांद्वारे सजिवांच्याच जीवनात कलह निर्माण करण्यासाठी वापरण्यात येत आहेत,हाही कलयुगचाच एक भाग..!

    ReplyDelete
  4. बरोबर आहे तुमचे म्हणणे विक्रम जी... आज देशातील परिस्थिती, राजकारण, समाजकारण, तथाकथित विचारवंत अत्यंत खालच्या पातळीवर उतरले आहेत आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती अत्यंत उंचीवर चढल्या आहेत... जे हवे त्यापेक्षा नेमके उलटे झाले आहे... त्यावरून लक्ष हटविण्यासाठीच हे असले उपद्व्याप केले जातात... पण म्हणून जे जे होते तैसेच साहावे, असे तर नाही ना...? जे चालले आहे ते बदलण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहीजेत...

    ReplyDelete
  5. मराठी समाजामध्ये फुट पाडण्याचे कारस्थान सुरु आहे. अशा संघटनांना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ आहे.

    ReplyDelete
  6. आता फुटीचे राजकारण जातीयवादाचे मूळ धरून उघडउघड होऊ लागले आहे !जाती-पोटजाती ही हिंदू धर्माची व म्हणून हिंदुस्थानाची शोकांतिका आहे !आपला गैरफायदा घेणार्‍यांना शासन शिकवता येत नसले तरी चालेल ! आपण फूट पाडणार्‍या मुद्द्यावर लक्ष द्यावे ! तो नाहीसा केला तर काम झालेच ! प्रक्रिया मोठी जटील आहे ! वेळ लागेल !पण त्याच दिशेने कार्य हाती घेतले पाहीजे !
    अतृणोपतितो वन्ही स्वयमेवोपशाम्यति ॥
    जातीय वाद नाहीसा करण्यासाठी मूळ जाती प्रजातींना कायद्यातून मिळणार्‍या सोई सवलती बंद करून सर्वांना आर्थिक व शैक्षणिक दर्जा वरुन सोई सवलती व अधिकार मिळाले तर उत्तम कार्य साधेल !
    जाती पोट जाती हा concept हळू हळू मुंबई सारख्या शहरात लोप पावत चालला आहे, पण ज्या भागातील जनतेत अजून शिक्षण व एकून रहाणीमान विचारसरणीत बदल झालेला नाही तेथे ह्या जातीयवादाची मूळे अजून ही खोलवर रुजलेली आहेत !
    सर्वप्रथम हिंदूत्वाच्या छत्राखाली ह्या सर्वांना एकसमान न्याय व अधिकार दिला म्हणजे प्रश्न सुटतील ! त्याला १-२-३-४-५ पिढ्या खर्ची पडल्या तरी चालेल !!

    जात-पोटजात उल्लेख टाळा.... हिंदुस्थान ला पवित्र व आदर्श राष्ट्र बनवण्यात हातभार लावा !!

    ReplyDelete
  7. Nave lihayachi nahit he many pan he krutya natadrashtpane karnarya nagarsevakanche v tyana dabavakhali sath denarya prashanik adhikaryanche jiwantpani aapan ughadyawar putale ubhe kele pahijet mhanaje zade kami zalyamule kavlyanchi ji basayachi panchait zali aahe ti tari dur hou shakel.

    ReplyDelete
  8. विक्रम जी, लेखाबद्दल धन्यवाद! हे सर्व कारस्थान जातीय विद्वेष पसरविण्यासाठीच केलेले आहे ह्याबद्दल दुमत नाही. शिवाजी महाराजांबद्दल इतके अनिवार प्रेम व आदर असणारयांची गेल्या वर्षीच्या मिरज दंगलीबाबत काय भूमिका होती, हे समजले तर बरे होईल. "अफजल खान वधाचे" पोस्टर लावण्यावरून ती दंगल उसळली होती. त्याच मिरज-सांगलीतील शेकडो तरुण फाल्गुन महिन्यात दिवसातून एकदाच जेवतात, कारण संभाजी महाराजांना औरंगजेबाने याच फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी मारले होते. त्यांच्यात (उपास करणारयात ) हे ब्रिगेड वाले किती असतात? अहो महाराष्ट्रात ब्राह्मण समाज उरलाय तो किती आणि त्यांची ताकद ती काय? त्यांच्यावर दादोजीन्च्या पुतळ्याच्या मदतीने प्रतीकात्मक हल्ला करण्याची काय आवश्यकता आहे? आपली शक्ती दाखवण्यासाठी असे करणे केवळ हास्यास्पद आहे. शक्ती दाखवायची एवढीच खुमखुमी असेल, बाहू इतकेच स्फुरण पावत असतील तर दाखवा औरंगाबादेचे संभाजीनगर करून, दाखवा प्रताप गडावरून अफजल्याची कबर उचकटून. हिंदवी स्वराज्याच्या निर्माणासाठी शिव-शम्भून्नी आपले आयुष्य वेचले, पण त्यांचेच वंशज म्हणवणारे आज इटालीयन मदमेच्या ताटाखालचे मांजर होऊन राहिलेत. असेल हिम्मत तर दाखवा त्यांना त्यांची जागा. पण हे ब्रिगेड वाले असे करणार नाहीत. कारण सिंहाचा छावाच अशी हिम्मत दाखवू शकतो, छाव्याच सोंग घेतलेली गाढवे नाहीत.
    आज ब्रिगेड वाले आणि तत्सम समाज घटकांना खरी गरज आहे ती संयमी, विचारी, द्रष्टे नेतृत्व मिळण्याची. असा नेताच ह्या गटारांना वळवून गंगेत आणून पवित्र करू शकेल. अन्यथा ही गटारे तुंबून त्यातून घाण आणि डासच पसरत रहातील.

    ReplyDelete
  9. he je kuni kele ahe tyana ghar-bhedi asech mhatle pahije!
    Putla halavinyamagche je karan sangitle gele, te aikle ki kunahi shivpremi nagrikachya talpayachi aag mastakala janarach!
    Hi mhanje maharajanchya tatvanchya viruddha krutich mhanavi lagel! Jya maharajani, jatibhedanchya var uthun sakal hindu samajachya kalyanasathi hindavi samrajyachi sthapna keli, tyach maharajanchya gurucha putla jatiyatecha adhar gheun halavla jato, ya sarkhi durdaivi goshta ti ankhi konti? Aaj jara maharaj aste, tar ya ashya gharbhedi mansanach adhi ukhdun lavle aste!

    ReplyDelete
  10. tithle sagle putale kadhun taka an tithe janta raja "SHARADCHANDRA PAWAR", AJIT PAWAR, SHREEMANT KOKATE,PURUSHOTTAM KHEDEKAR asha nalayakanchi putale bandha .....

    ReplyDelete
  11. @ Kiran ji, Omkar, Madhur -
    धन्यवाद.
    .
    @ राजेश जी -
    कधीकधी अशा घटनांमुळे जाणवते की आपले प्रयत्न कमी पडतायत. आपला मार्ग योग्य असला तरी गती वाढायला हवी.
    .
    @ Bharat ji, व्याघ्रसूदन, Nandan ji -
    धन्यवाद, आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल.
    .
    @ विनय जी, प्रसाद जी, विजय जी -
    आपल्या मनातील सल आपल्या लेखनातून उतरला आहे. धन्यवाद वेळ काढून प्रतिक्रिया दिल्याबद्दल. न्यायालयावर आता बरीचशी भिस्त आहे. पाहूया.

    ReplyDelete