"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, March 3, 2011

न जुळणारे समीकरण



संपूर्ण जगालाच भयानक दहशतवादाने वेढले आहे. आणि त्याला विविध कारणं आहेत. कुठे वांशिक संघर्ष, कुठे ऐतिहासिक लढाई, प्रस्थापित राजेशाहीविरुद्ध, सांप्रदायिक कट्टरतेतून, धार्मिक असहिष्णुतेतून अशी दहशतवादी कृत्ये चालू आहेत. भारताला ज्या प्रकारच्या दहशतवादाने विळखा घातलाय त्यासंबंधी अधिक सांगायला नको! संपूर्ण जग पादाक्रांत करायला निघालेली ती एक रानटी टोळधाड आहे. एका विशिष्ट रंगातच सगळ्यांना जबरदस्तीने रंगवण्याचा तो घृणास्पद प्रयत्न आहे. “तुम्ही सर्वजण एकतर पापी आहात..आणि पापमुक्तीसाठी आकाशातील बापालाच तुम्ही प्रार्थिले पाहिजे” दुसरा मार्ग नाही. अन्यथा नरकात खितपत पडाल. किंवा “बोला आहे का ह्याच्यावर विश्वास की भोसकू”? अशी असहिष्णू वृत्ती झपाट्याने, सरकारी मदतीने पसरली आहे. ह्याला तोंड देण्यासाठी भारतातील सज्जनशक्ती संघटित आणि जागृत होणे गरजेचे आहे. ही सज्जनशक्ती जोपर्यंत संघटितरित्या उभी राहत नाही तोपर्यंत कुणीही यावे आणि मारून जावे असेच चालू राहणार.

दहशतवादी कृत्य कुणीही केले तरी ते समाजव्यवस्थेला घातकच असते. कोणत्याही कोनातून ते पूरक, पोषक होऊ शकत नाही. परंतु दहशतवादाला धर्माशी जोडण्याचे काम काही नतद्रष्ट करत आहेत. सत्ता, मतपेटी आणि एकगठ्ठा मतं यावर डोळा ठेवून हे केलं जातंय हे सांगायला आणि समजायला विद्वानांची गरज नाही. परंतु आपल्या देशातील स्वयंघोषित विद्वान आपल्या अकलेचे तारे तोडतात आणि समाजातील सौहार्दच धोक्यात येते.

दिग्विजय सिंग हे असेच एक मेषपात्र! मालेगावचे एक प्रकरण असे सापडले ज्यात ‘संशयित’ काही हिंदू आहेत. परंतु घाईघाई करून ‘संशयित’ हेच ‘आरोप सिद्ध झालेले गुन्हेगार’ आहेत अशा तऱ्हेची मांडणी करण्यात आली. ठराविक समाजाला लक्ष्य बनवण्यात आलं. ‘हिंदू दहशतवाद’ अशी नवीनच संकल्पना काढली गेली. पण हिंदू समाजाने त्यावर जबरदस्त प्रतिक्रिया दिली. मग म्हटले गेले ‘भगवा दहशतवाद’, त्यावरही टीका झाल्यावर ‘बहुसंख्यांचा दहशतवाद’ ही आणखी एक संकल्पना आणली. कोण बहुसंख्य? संपूर्ण जनताच दहशतवादी? हे सगळं कोणाला खूष करायला? कोणाची दाढी कुरवाळण्यासाठी? पण प्रसारमाध्यमातील मिंध्या बाहुल्यांनी लगेच इशाऱ्यावर नाचायला सुरुवात केली. लोकसत्तात तर “भगवे दहशतवादी” अशा ठळक नावाने अग्रलेख लिहिला गेला. ह्या ‘अग्र’लेखामागे कोणाची ‘पार्श्व’भूमिका होती हे वेगळे सांगायला नको. विकता का नीतीमत्ता तुम्ही? वैय्यक्तिक स्वार्थापोटी तुम्ही समाजालाही शिव्या घालायला आणि दूषणे द्यायला कमी करत नाही. तुम्हाला राज्यसभेवर पाठवण्यासाठी हे असे प्रकार? काय दिवे लावणार तुम्ही जाऊन तिथे? एक बरे झाले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’ ने ही विषवल्ली वेळीच ओळखून बाजूला करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. बहुधा १०० घडे भरण्यासाठी थांबले असावेत. आता हकालपट्टी निश्चित झाली आहे असे समजते. लोकसत्ताच्या घसरणीला जबाबदार असणाऱ्यांना आता लवकरच जावे लागणार ही आनंदाची बातमी आहे.

आता वरचे गणित आणि प्रश्न न सुटणारे आहेतच, पण काही बिंदूंचा विचार खाली केला आहे ज्यावरून काँग्रेसचे स्वत्वहीन नेते, प्रसारमाध्यमांचे दलाल, मानवाधिकारांचे दुकानदार असे सर्वजण एक ‘न जुळणारे समीकरण’ जुळवण्याच्या घोर प्रयत्नात असल्याचे दिसते. आपणही त्याचा नीट विचार करू. मालेगाव मधे प्रज्ञासिंग ठाकूर आरोपी आहे. ती व अन्य आरोपी म्हणजेच कर्नल पुरोहित, दयानंद पांडे, स्वामी असीमानंद यांना गजाआड केले आहे. आणि हे सर्व हिंदू असल्याने हिंदू दहशतवाद असे म्हटले आहे. केस अजून चालू आहे. पण ह्यांना दहशतवादी आणि तेही ‘हिंदू दहशतवादी’ म्हटले गेले. आणि ह्याचा संबंध ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ह्या हिंदूंच्या संघटनेशी जोडला गेला. मग तो एक ऐकलेला विनोद खराच वाटू लागतो – एकदा अमेरिकन, रशियन आणि भारतीय पोलिसांचा संयुक्त सराव सुरु असतो... दरवेळी एक लांडगा सोडला जातो आणि तो शोधून आणण्याचे काम दिलेले असते. पहिल्यांदा अमेरिकन पोलीस. ते आपल्याजवळील उपकरणे वापरून १० मिनिटांत शोधून काढतात ठावठिकाणा आणि मग ५ मिनटात हजर करतात. रशियन पोलीस २० मिनिटे घेतात लांडगा हजर करायला. आता पाळी येते भारतीय पोलिसांची. लांडगा रानात सोडला जातो. वेळ सुरु होते. पोलीस केवळ काठी घेऊन निघतात. जबरदस्त आत्मविश्वास. सर्वजण आश्चर्य व्यक्त करतात. पण तासभर उलटून जातो, लांडगा तर नाहीच, पण भारतीय पोलिसांचाही काही पत्ता नसतो. शेवटी अमेरिकन आणि रशियन पोलीस मागावर निघतात. रानाच्या मध्यभागी पोहोचतात तर काय, एक विलक्षण दृश्य दिसतं. भारतीय पोलीस एका कुत्र्याला झाडाला उलटे टांगून मारत असतात काठीने..तो लालेलाल होऊन केकाटत असतो आणि पोलीस त्याला सांगत असतात, “म्हण, मीच तो लांडगा!”  

मुस्लिमविरोधी, पाकविरोधी तरी ISI कडून मदत? - हिंदुत्ववादी म्हणजेच पाकिस्तान आणि मुस्लिमविरोधी अशी धारणा आहे. आणि हा प्रचारही काँग्रेसने निष्ठेने केलाय! खरंतर संघाला हिंदूंचे संघटन अभिप्रेत आहे. कोणाचाही विरोध नाही. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांनी स्पष्ट केले की ‘संघाचे काम हे ‘सर्वेषां अविरोधेन’ चालणारे आहे’. आणि शिवाय एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “या देशात एकही मुसलमान आणि ख्रिश्चन नसता आणि आजच्यासारखेच हिंदू असंघटीत आढळले असते तरीही हिंदू संघटन केलेच असते”. म्हणजेच हे काम परिस्थितीसापेक्ष आहे. पण काँग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे हे पाकिस्तान आणि मुस्लिमविरोधी आहे. ठीक. तूर्तास हा (अप)प्रचार मान्य केला तर मग संघाच्या मा. इंद्रेश कुमार जी या प्रचारकावर आरोप केला की त्यांना ISI कडून मदत मिळते, त्याचे काय? ..... ‘न जुळणारे समीकरण’!

हिंदुत्ववादी. तरी सरसंघचालकांच्या हत्येचा कट? - मधेच हेही एक पिल्लू सोडण्यात आले की रा. स्व. संघाच्या परमपूजनीय सरसंघचालकांच्या हत्येचा कट हा मालेगाव प्रकरणातील ‘हिंदूंनी’ रचला आहे.  http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5776271.cms . अरे मग निदान त्यांना हिंदुत्ववादी तरी म्हणून नका! ह्या गौप्यस्फोट करणाऱ्यांना पायाखाली काय जळतंय ते दिसत नाही. नसत्या उठाठेवी बऱ्या जमतात. त्याही असंबद्ध! हिंदुत्ववादी दहशतवादी, संघाचा सहभाग आणि संघाच्याच सरसंघचालकांच्या हत्येचा कट? काय आहे हे? .... ‘न जुळणारे समीकरण’!

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट नक्की कोणी केला? - पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये बॉम्बस्फोट झाल्यावर यात हिंदुत्ववाद्यांचा हात असू शकतो अशी मुक्ताफळं उधळली राज्य सरकारने म्हणजे बाहुल्यांनी! आणि धड काही न सांगता आले, या राज्याचे गृहराज्यमंत्री बागवे यांना (हेच ते ज्यांनी स्वामीनिष्ठा दाखविण्यासाठी राहुल गांधींचे जोडे उचलून कवटाळले होते! त्यांच्याकडून अधिक काय अपेक्षा असणार म्हणा!). या २ बातम्या पहा- १) http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=9937 २) http://www.esakal.com/esakal/20100409/5654627742262238642.htm. या परस्परविरोधी बातम्या आहेत. एक तर तपास पूर्ण झाल्याशिवाय बडबड का करावी? असा संभ्रम पसरवून काय नक्की साध्य केले? .... ‘न जुळणारे समीकरण’!

संघप्रचारक सुनिल जोशींची हत्या कोणी केली? – एका ठिकाणी सुनील जोशी या मृत संघप्रचारकाचा अजमेर, मालेगाव येथील स्फोटात हात असल्याचे सांगितले जातेय, आणि त्याचवेळी दुसरीकडे त्याची हत्याही हिंदुत्ववाद्यांनीच केल्याचे सांगितले जाते. स्वामी असीमानंद म्हणे म्हणाले की सुनील जोशी असं बोलले आणि त्यांनी असं सुचवलं इ. आता सुनील जोशी मृत आहेत, हयात नाहीत. त्यांना विचारता येणार नाही. त्यांची चौकशी करता येणार नाही. करायचीच असेल तर त्यासाठी ‘वर’ जावे लागेल. म्हणजेच खरे मारेकरी शोधता येत नाहीत म्हणून ही अशी ढकलाढकली? यातून काय साध्य करायचेय? .... ‘न जुळणारे समीकरण’!

इंद्रेश कुमारांना अडकवण्याचे खरे कारण – मा. इंद्रेश कुमार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक. जम्मू आणि काश्मीर या राज्यात बरीच वर्षे प्रचारक म्हणून काम केल्याने तिथल्या परिस्थितीची उत्तम आणि सखोल जाण. तिथे फुटीरतावाद्यांना मोकळे रान सरकारने दिले आहे. इतके की तिथे श्रीनगरमधे तिरंगा फडकावू शकत नाही आपण. भारताच्या काश्मीरचा भाग चीनमध्ये दाखवणाऱ्या मेहबूबा सईद आणि ‘भूखे-नंगे हिंदुस्थान से अलग हो जाओ’ म्हणणाऱ्या अरुंधती रॉय ला सरकार काही करू शकत नाही.




पण या प्रतिकूल परिस्थितीतही तिथे शाखा चालवणाऱ्या प्रचारकांचे आदर्श इंद्रेश कुमार. भारतीयत्वाची भावना परिपुष्ट करणाऱ्या स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान इंद्रेश कुमार. सध्या गेली काही वर्षे त्यांच्याकडे काम आहे ते ‘राष्ट्रीय मुस्लीम मंच’ या संस्थेचे. मुस्लीम समाजाला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणारे इंद्रेश कुमार. ह्या कामातली सफलता पाहून काँग्रेसचे पित्त न खवळते तरच नवल. म्हणून अडकवले नाव. संशयाचे धुके निर्माण केले.
ह्यातून पुन्हा एकदा समोर आले .... ‘न जुळणारे समीकरण’!

हिंदू आणि दहशतवाद – ‘हिंदू’ आणि ‘दहशतवाद’ हे २ परस्परविरोधी शब्द आहेत. हिंदू हे पूजापद्धतीचे अथवा विशिष्ट संप्रदायाचे नाव नव्हे. धर्म आणि रिलीजन हे २ वेगवेगळे शब्द आहेत हे घटनेनेही स्पष्ट केले आहे (Art. 25) आणि सर्वोच्च न्यायालयाचे खंडीभर निर्णय हे स्पष्ट शब्दात निसंदिग्धपणे मांडतात. उदा. A.S. Narayana Deekshitulu v. State of A.P., (1996) 9 SCC 548, at page 590  : The word ‘dharma’ or ‘Hindu dharma’ denotes upholding, supporting, nourishing that which upholds, nourishes or supports the stability of the society, maintaining social order and general well-being and progress of mankind; whatever conduces to the fulfilment of these objects is dharma, it is Hindu dharma and ultimately “Sarva Dharma Sambhava”. उत्तम जीवनपद्धती म्हणजेच हिंदुत्व. दहशतवादाशी याचा सबंध कसा असेल? ज्याक्षणी एखादा ‘हिंदू’ दहशतवादी बनतो त्याक्षणी तो ‘हिंदू’ राहात नाही. आणि ज्याक्षणी दहशतवादी त्याचा चुकीचा मार्ग सोडून मानवतेच्या दिशेचा शोध घेतो, तो हिंदू बनण्याच्या दिशेने अग्रेसर होतो. मानवतेचे मूल्य म्हणजेच हिंदुत्व. ‘जगा आणि जगू द्या’ याहीपलीकडे जाऊन ‘जगा आणि दुसऱ्याला जगवा’ हे हिंदू जीवनपद्धती सांगते. इथल्या या शांतताप्रिय, सहिष्णू, शतकानुशतके अत्याचार सहन करत आलेल्या हिंदू समाजाला लक्ष्य करून, दहशतवादी संबोधून ही नेतेमंडळी काय करत आहेत? .... ‘न जुळणारे समीकरण’!

पडोसन किशोरकुमार, सुनिल दत्त, मेहमूद यांच्या पडोसन चित्रपटासारखे सध्या देशात झाले आहे. खिडकीतून तोंड हलवणारा वेगळाच आणि त्याला स्वर देणारा, आवाज देणारा वेगळाच! शिवाय सध्याचे केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेतृत्व पाहता एक चतुर नार कर के सिंगार मेरे मन(मोहन) के द्वार ये घुसत जात, हम मरत जात, अरे हे हे हे | यक चतुर नार कर के सिंगार...अशीच अवस्था दिसते आहे. दिग्विजय सिंग आणि प्रभृतींना संदेश सुद्धा आहे गाण्यात
जा रे,जा रे कारे कागा
का का का क्यों शोर मचाये,
उस नारी का दास ना बन जो
राह चलत को राह बुलाए’ ||


त्या चित्रपटात मेहमूद ला किशोरकुमार आणि सुनिल दत्त चिडवतात, एकदा म्हणतात ‘अय्यो घोडे तेरी आणि एकदा एक चतुर नार’ तेव्हा शेवटी कंटाळून मेहमूद सांगतो क्या रे ये घोड़ा\-चतुर, घोड़ा\-चतुर बोला, येक पे रहना या घोड़ा बोलो या चतुर बोलो...तसंच हिंदू समाजाला दहशतवादी म्हणायचं आणि मग शब्द बदलायचा..परत म्हणायचं आणि बदलायचं असं चालू आहे. एकदा काय ते सांगा आम्ही इथला समाज दहशतवादी आहोत की हिंदू आहोत...दोन्ही तर असू शकत नाही!

13 comments:

  1. अप्रतिम !! छान परखड मते मांडली आहेत

    ReplyDelete
  2. हा हा, १००% सत्य.
    लिखाणातील सर्वोत्तम भाग म्हणजे....
    ‘जा रे,जा रे कारे कागा
    का का का क्यों शोर मचाये,
    उस नारी का दास ना बन जो
    राह चलत को राह बुलाए’ ||

    ह्या दिग्याला गाढव म्हणणे म्हणजे समस्त गाढव जातीचा अपमान...

    ReplyDelete
  3. @vikram

    he sarv Hindu samajala confuse karaychi kame chalu ahet :(

    lekh nakkich vichar karayla lavnara ahe

    ReplyDelete
  4. Vikramji

    Dhanywad. Atyant sampark shabdat samarth vishay mandani. Indreshji sarkhech P.P. Shankaracharyana sudha khotya gunhyat adkavun jameen milayala tras dila hota he aamhi visarun chalnar nahi. Karan kay? Karan ekach ki P.P. Shankaracharyani saktiche christchanikaranala Tamilnadut payband ghatla.

    ReplyDelete
  5. विक्रम
    अतिशय सडेतोड आणि समर्पक उदाहरण दिले आहे.
    एक पे रहना ... या घोड़ा बोलना या चतुर ..... खुप हसलो.
    चतुर असल्यानेच (अरबी ) घोड़ा ठरवू पहात आहेत द्वेष करणारे.

    ReplyDelete
  6. आपण सर्व काँग्रेसच्या प्रचाराला बळी पडत आहोत. रास्वसं हिंदूंची संघटना आहे हा विचार जुना झाला आहे. ही संघटना भारतीयांची आहे हा विचार पुढे आला पाहिजे. या संधटनेमध्ये वेदकाळापासून आजपर्यंतचे विचार येणे स्वाभाविकच आहे. याचा असाही अर्थ होतो की रास्वसं बांधीलकी फक्त वेदकाळाशी नसावी. संपूर्ण जगामध्ये भारतच एक असे राष्ट्र आहे की ते सर्वांचे भले व्हावे असाच विचार करते. पाकिस्तान किंवा चीन सारख्या देशांचेही भले व्हावे असाच विचार करते. हा विचार जिवंत ठेवण्याकरिता भारताने सक्षम होणे आवश्यक आहे. रास्वसंने काँग्रेस काय म्हणते इकडे लक्ष न देता आपले मार्गक्रमण चालू ठेवावे. भारत अपराजेय कसा करता येईल ते शोधून कार्य करत रहावे. पहा:
    मराठी: http://janahitwadi.blogspot.com/2010/10/universal-brotherhood.html
    English: http://janahitwadi.blogspot.com/2006/04/brotherhood.html
    http://janahitwadi.blogspot.com/2010/10/was-chhatrapati-shivaji-maharaj-hindu.html
    http://janahitwadi.blogspot.com/2010/10/are-places-of-worship-essential.html
    http://janahitwadi.blogspot.com/2010/10/are-rules-preached-by-son-of-god-etc.html
    http://janahitwadi.blogspot.com/2010/10/is-god-kind-and-fulfils-wishes-of.html
    http://janahitwadi.blogspot.com/2010/10/are-religious-books-written-by-god_17.html
    http://janahitwadi.blogspot.com/2010/10/deterioration-of-religion-and-god.html
    http://janahitwadi.blogspot.com/2010/10/society-religion-and-god.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/01/information-on-some-of-religions.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/01/there-is-only-one-god-in-universe.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/01/why-people-worship-idol.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/01/barest-minimum-requirement-for-worship.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/01/was-lord-shree-krishna-god.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/01/how-to-worship-god.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/01/how-human-beings-should-choose-karma.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/01/how-shakti-ie-god-produces-effects.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/01/concept-of-god.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/01/circumstances-make-person.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/02/does-severe-punishment-discourage.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/02/are-christens-and-muslims-idol.html
    http://janahitwadi.blogspot.com/2011/02/accounting-karma.html

    ReplyDelete
  7. काँग्रेसच्या किंवा इतर कोणाच्याही भुंकण्याकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नये. स्वतःला सिद्ध करत राहावे.

    ReplyDelete
  8. Christan mansiketun hammer publicity karnare 'digged'Vijay sigh Ani tyachi pilvalila perfect uttar atatari shane zale tar thik

    ReplyDelete
  9. these all things i may not aware but one thing i am aware very much that the Muslim and Christen are taking abroad help to spoil India / Hindustan. till war not yet over, they are not satisfied after parting pak and b.desh. they want to divide complete country. we all to be gather and should be one with one organization. Because these wild people took their person and involve into indian society to do all, in same case few of us person are ready as they desire because for money. If we awake and avoid buying doing vyavahar with Muslim and Christen than this will avoid automatically.

    ReplyDelete
  10. विक्रम, लेख छान जमलायं !
    विचारांची लढाई इथून पुढे खूप महत्वाची ठरणार आहे. त्यासाठी खूप अभ्यासाची गरज भासणार आहे. त्याचबरोबर, संघटनेतील लोकंची उक्तीबरहुकूम कृतीपण आवश्यक आहे.

    ReplyDelete
  11. नेहमी प्रमाणेच चांगला जमलाय!

    ReplyDelete
  12. १९७५ च्या आणीबाणी च्या काळात तुरुंगात असताना पू. बाळासाहेबांनी असं म्हटलं होतं, की ही लढाई तोच जिंकेल जो अधिक काळ दम धरून राहू शकेल. १९४७ साली गांधी-नेहरूंनी "प्रत्यक्ष कृतीला" घाबरून लवकर दम सोडला आणि भारताची फाळणी झाली. भारतातील दहशतवाद्यांविरुद्धाची लढाई सुद्धा अशीच आहे. ह्या दहशतवादयांत पाक-पुरस्कृत इस्लामी दहशतवादी आहेत, तसेच हिंदू शक्तींविरुद्ध गरळ ओकणारे काही भारतीय दहशतवादी सुद्धा आहेत. हे दुसऱ्या प्रकार चे दहशतवादी मुद्दामहून अशी "न जुळणारी समीकरणे" तयार करत आहेत. त्या समीकरणाना काहीही उत्तर नाही. आणि हे त्यांनाही माहीत आहे. पण संभ्रम निर्माण करणे एवढेच त्यांचे मर्यादित उद्दिष्ट आहे. पण आपण "दम" सोडता कामा नये. यथावकाश हा अपप्रचाराचा धुरळा खाली बसेल. आणि मग सर्व चित्र स्पष्ट होईल.

    ReplyDelete