"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Sunday, December 12, 2010

The Ballad of Father Gilligan

The Ballad Of Father Gilligan

The old priest Peter Gilligan
Was weary night and day;
For half his flock were in their beds,
Or under green sods lay.

Once, while he nodded on a chair,
At the moth-hour of eve,
Another poor man sent for him,
And he began to grieve.

'I have no rest, nor joy, nor peace,
For people die and die';
And after cried he, 'God forgive!
My body spake, not I!'

He knelt, and leaning on the chair
He prayed and fell asleep;
And the moth-hour went from the fields,
And stars began to peep.

They slowly into millions grew,
And leaves shook in the wind;
And God covered the world with shade,
And whispered to mankind.

Upon the time of sparrow-chirp
When the moths came once more.
The old priest Peter Gilligan
Stood upright on the floor.

'Mavrone, mavrone! the man has died
While I slept on the chair';
He roused his horse out of its sleep,
And rode with little care.

He rode now as he never rode,
By rocky lane and fen;
The sick man's wife opened the door:
'Father! you come again!'

'And is the poor man dead?' he cried.
'He died an hour ago.'
The old priest Peter Gilligan
In grief swayed to and fro.

'When you were gone, he turned and died
As merry as a bird.'
The old priest Peter Gilligan
He knelt him at that word.

'He Who hath made the night of stars
For souls who tire and bleed,
Sent one of His great angels down
To help me in my need.

'He Who is wrapped in purple robes,
With planets in His care,
Had pity on the least of things
Asleep upon a chair.'

--- W. B. Yeats

देवाच्या अस्तित्वाचा होणारा अनुभव तरल शब्दात यीट्सने चितारला आहे. मी त्याच्या भावार्थ (स्वैरानुवाद) देण्याचा प्रयत्न केलाय. शब्दशः नाही. पोस्ट चा उद्देश केवळ रसास्वाद घेणे आहे.  फादर गिलिगन नावाचा एक मिशनरी एका गावात राहत असतो. त्या गावात मृत्यूचं तांडव सुरु असतं. आणि दरवेळी अंतिम प्रार्थनेसाठी (/कबुलीजबाबासाठी-Confessions) ह्या फादर गिलिगन ला बोलावलं जात असतं. तो नुकताच एका ठिकाणाहून येऊन खुर्चीवर रेलतो तोच अजून एक गरीब माणूस बोलावणं घेऊन येतो. फादर थकलेला, कंटाळलेला असतो. तो म्हणतो,

'I have no rest, nor joy, nor peace,
For people die and die';
“लोकं नुसती (एकामागून एक) मरतायत्..त्यामुळे मला ना विश्रांती, ना आनंद, ना शांती!” आणि असा खेद व्यक्त केल्याकेल्या तो लगेच उपरती होऊन म्हणतो,

And after cried he, 'God forgive!
My body spake, not I!'
“देवा मला माफ कर...माझे (थकलेले) शरीर म्हणाले..मी नव्हे”! 
समाजकार्यात, ईश्वरी कार्यात व्यग्र असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या, प्रचारकांच्या जीवनात थकवा, कष्ट, वेदना हे अपरिहार्य आहे. पण  अशावेळी या ओळी बलदायी आहेत.
पुढे एवढं म्हणून त्याला खुर्चीतच झोप लागते. संधिप्रकाश कमी होऊन रात्र पसरू लागते. तारे आकाशात उगवतात. आणि काही वेळाने त्याला अचानक जाग येते. त्याला आठवतं की आपल्याला एका घरी जायचं अजून राहून गेलंय. तो त्याच्या घोड्याला झोपेतून उठवतो... आणि वेगाने निघतो. त्या घराजवळ पोहोचताच बाई दार उघडतात आणि म्हणतात, 'Father! you come again!'. फादर ला हा धक्काच असतो. ही ओळ मला मध्यवर्ती वाटते. फादर विचारतो, 'And is the poor man dead?'. त्यावर त्याला उत्तर मिळतं की तो माणूस तर तासाभारापूर्वीच गेला. बाई म्हणतात, “तुम्ही (प्रार्थना करून) गेलात आणि त्यानंतर तो लगेच अगदी आनंदी पक्ष्याप्रमाणे मुक्त झाला”.

फादर गुडघे टेकतो आणि म्हणतो, “ज्याने ही ताऱ्यांनी चमचमणारी रात्र बनवली त्याने माझ्या गरजेच्या वेळी मदतीसाठी एक देवदूत खाली धाडला”. आणि शेवटची ओळ मुळातूनच वाचण्यासारखी आहे. त्याचा अनुवादसुद्धा नको!

'He Who is wrapped in purple robes,
With planets in His care,
Had pity on the least of things
Asleep upon a chair.'

No comments:

Post a Comment