"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Tuesday, July 6, 2010

“नावात काय ( नाही) आहे?”“नावात काय आहे?”  असं हिटलरने म्हटलं आहे. का चमकलात? जर नावात काही नसेल तर हिटलर काय आणि शेक्सपियर काय...काय फरक पडणार आहे? परंतु असं चालणार नाही. नावाशिवाय गोष्टी अनाकलनीय आणि दुर्बोध होतील. आणि गोंधळ उडेल तो वेगळाच. म्हणजे विशिष्ट नावाची आवश्यकता तर आहे.

पण ही आवश्यकता केवळ एखाद्या गोष्टीचा निर्देश करण्यासाठी आहे का? अगदी मुळात जेव्हा शब्द अस्तित्वात आले किंवा येतात त्यावेळेला निर्देशनासाठी म्हणून. परंतु त्याचा जसजसा वापर होऊ लागतो तसा त्या शब्दामागचा संभार वाढत जातो. वर्षानुवर्षांच्या, पिढ्यांपिढ्यांच्या वापराने नावाला विशिष्ट वजन, अस्मिता, इतिहास, प्रेरणा जोडत जाते. त्या नामोच्चाराबरोबरच त्याला चिकटलेला इतिहास जागृत होतो. पानिपत. म्हटले तर ठिकाणाचे नाव. पण आठवतोच ना इतिहास? पावनखिंड, हळदीघाटी, झाशी, कुरुक्षेत्र, सिंहगड’ अशा नावांनी वीरश्री संचारते आणि आपण यशस्वीरित्या परतून लावलेल्या रानटी आक्रमणांची आठवण येते. तसंच काशी, वृंदावन, केदारनाथ, प्रयाग’, ‘रामेश्वरम्’ ही नावे येताच आपल्या मनात ईश्वर, भक्ती, अध्यात्म असे पवित्र भाव दाटून येतात. आपली तीर्थक्षेत्रे आहेत ती. पण तेच अयोध्या, सोमनाथ, अमरनाथ, तुळजाभवानी या नावांनी वेगळे आणि संमिश्र भाव येतात. आपण सत्य रक्षणासाठी, न्याय मिळवण्यासाठी वेळोवेळी दिलेले, देत असलेले लढे आठवतात.

म्हणजेच आपल्या भारतात आपल्याला जो संघर्षरत परंतु विजिगीषु इतिहास, जी वैभवशाली परंपरा आणि ज्या समृद्ध, अर्थवाही, आशयघन भाषा लाभल्या आहे त्यामुळे स्थानांच्या नावाला अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळेच आपण ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’, ‘बॉम्बे’, ‘कलकत्ता’ ही नावे बदलली. असं म्हणतात की रविंद्रनाथ टागोरांचे आडनाव हे खरे तर ‘ठाकूर’. पण ब्रिटीशांनी त्याचे केले ‘टागोर’. ते तसेच चालू राहिले! तशीच बंडोपाध्याय, चट्टोपाध्याय व मुखोपाध्याय ही नावे उच्चारायला कठीण म्हणून त्याचे केले गेले अनुक्रमे ‘बॅनर्जी’, ‘चटर्जी’ व ‘मुखर्जी’! आणि त्यातच आपल्याला स्वभाषेची अॅलर्जी आणि राखायची  ब्रिटीशांची मर्जी! म्हणून जो येईल तो सोयीनुसार बदलतो नावे.

भारतात आपण अजूनही अशाच काही स्थानांची नावे जपून आहोत, जी बदलण्याची आवश्यकता आहे. औरंगाबाद. औरंगजेबाच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे नाव! आणि औरंगाबाद म्हणजे औरंग्या ‘बाद’ झाला असे नव्हे, तर आबादी-आबाद मधला आबाद जोडला औरंगला आणि झाला औरंगाबाद. तसंच उस्मानाबाद, अहमदनगर, हैदराबाद, अहमदाबाद, दौलताबाद, अलाहाबाद, निजामपूर, गाझियाबाद, मोरादाबाद अशी एक न संपणारी जखमांची यादी भारतभर विखुरलेली आहे. ज्या निजामाने अत्याचार केले, औरंग्याने मुलुख च्या मुलुख बेचिराख केले त्यांची आठवण आपण जपत आहोत का? धर्मांध औरंग्याने संभाजीराजांनी हिंदू धर्म सोडावा म्हणून हालहाल करून मारले. परंतु सिंहाचा बछडा मृत्यूला घाबरला नाही. ‘स्वधर्मे निधनं श्रेय:’ हे वचन जगून दाखवले त्या धर्मवीर संभाजीराजांचे नाव तिथे हवे. तिथली राष्ट्रभक्त जनता जिल्हा-‘संभाजीनगर’ म्हणूनच सांगते. अन्य ठिकाणीही आपण औरंगाबादला संभाजीनगर म्हणणेच सुरु केले पाहिजे. असे बदल हळूहळूच घडत असतात.

त्यामुळे भारतभर असे विविध आबाद आहेतच.. आणि आबादीही वाढते आहे! तिथल्या जनतेने जागृत होऊन आणि शासनाने पुढाकार घेऊन ही अपमानजनक आणि कटू स्मृतींची चिन्हे मिटवायला हवीत.
जर कोणी असा युक्तिवाद केला की “आम्हाला बुवा औरंगाबाद म्हटल्यावर केवळ स्थानाचाच बोध होतो, इतिहास-बितिहास काऽही आठवत नाही.” तर त्याचे स्पष्टीकरण वर काही स्थानांचा उल्लेख करून पुरेसे झालेले आहे.

नावाबाबतीत आपल्या देशाचेही तसेच. विचारून पहा- आपल्या देशाचे नाव काय? ‘भारत अथवा हिंदुस्थान’ लगेच उत्तर येते...आणि इंग्रजीत? -‘इंडिया’. सोप्पे आहे! मग त्या व्यक्तीला त्याचे नाव विचारा.. उदाहरणार्थ प्रकाश. मग इंग्रजीत? Mr. Light?? नाही. प्रकाशच राहणार. फार तर Mr. प्रकाश. जपानीत? प्रकाश. अरबीत? प्रकाशच. एव्हाना तो माणूस चिडायला लागलेला असतो. मग जगातली कोणतीही भाषा असो आसामी, तामिळ, सिंधी, रशियन, फ्रेंच; हे प्रकाश काही बदलणार नाही. मग जर आपले नाव जगाच्या पाठीवरल्या कोणत्याही भाषेत बदलत नाही तर मग आपल्या देशाचे नाव तरी का बदलावे? हिंदी-मराठीत भारत आणि इंग्रजीत इंडिया हा हास्यास्पद प्रकार थांबवूया. मान्य आहे की शतकांच्या गुलामगिरीमुळे हा पगडा आहे. पण आता आपल्याला जर जाणीव झाली आहे, समजले आहे तर तरी बदलूया.

आपली राष्ट्रीयता भारतीय आहे. इंडियन नव्हे! तेव्हा इंग्रजीत लिहितानाही (अर्ज भरतानाही) Nationality (राष्ट्रीयता) समोर अभिमानाने Bharateey लिहूया. सुदैवाने आपल्या घटनाकारांनी संविधानाच्या सुरुवातीलाच म्हणून ठेवले आहे ‘India that is Bharat’. त्यामुळे कोणी आपल्याला आक्षेप घेऊ शकत नाही. काही बुद्धिजीवी विचारवंत मला म्हणतीलही की “एकच बोध होणार आहे तर हे भारत आणि इंडिया असा भेद कशाला?” अगदी बरोबर. तर मग आपण भारत हेच म्हणूया ना. आणि ज्या पूर्वसूरींनी, संविधान बनवताना ‘India that is Bharat’ अशी सुरुवात केली ती का केली? ती केली नसती. सरळ इंडिया म्हणून पुढे गेले असते. पण आज न उद्या भारत हे नाव प्रस्थापित व्हावे आणि इंडिया हे गळून पडावे ही अंतर्निहित इच्छा असल्यानेच त्यांनी असे म्हणून ठेवले.


तेव्हा नावात काय आहे असे शेक्सपियरला वाटले असेल ते भाषेमुळे अथवा अन्य कारणांनी. स्वाभाविकही आहे ते. पण इथे त्यामुळे ‘जॅक अँड जिल्’ आणि ‘हम्प्टी-डम्प्टी’ एवढे ते सोपे नाही. इथल्या ‘राम-शाम’ लाही इतिहास आणि प्रीती आहे आणि ‘सीता-गीता’ लाही वनवास आणि नीती आहे! भारतातील अर्थवाही, सुस्पष्ट आणि आशयघन भाषांमुळे नावांना विशिष्ट अर्थ तर आहेच पण समृद्ध परंपरेमुळे, संघर्षरत आणि विजिगीषु इतिहासामुळे नावांना एक विशिष्ट बोध आहे.

झुगारा ते अन्यायाचे आणि गुलामीचे जोखड आणि अभिमानाने सांगा आपल्या देशाचे नाव.

भारतमाता की जय!18 comments:

 1. "इथल्या ‘राम-शाम’ लाही इतिहास आणि प्रीती आहे आणि ‘सीता-गीता’ लाही वनवास आणि नीती आहे! " हे तर मस्तच आहे!

  ReplyDelete
 2. पटकन मनात आलेला विचार : हा लेख बाकी लेखांपेक्षा थोडा हलका-फुलका वाटला !
  पण आहे छानच! हाच धागा घेउन एक छान गोष्टही लिहिता येईल.
  मला तर उच्चारांच्या बाबतीतही असं वाटत : आपल्यावर सदैव इंग्रजी उच्चारांबाबत सक्ती - आणि मग फ्रेंच लोकांनी दीक्सनरी म्हटलं तर त्याला आक्षेप नाही! मी स्वतः मूळ उच्चारांप्रमाणे उच्चार करावा या मताचा असलो, तरी केवळ उच्चार ठीक नाहीत, म्हणून international companies नोकरी द्यायला नाकारतात हे नवीनच कळलं मला! हे अन्यायकारक आहे असं मला वाटत.
  माझी ही post तू वाचली असशीलच :
  http://makarandkane.blogspot.com/2010/01/blog-post_31.html

  ReplyDelete
 3. मस्त लिहीले आहे. ह्यातील कित्तेक मुद्यांचा मी विचार सुध्दा नव्हता केला.

  अनिकेत

  ReplyDelete
 4. Waa!!!!
  Thodkyat pan logical ahe .

  ReplyDelete
 5. @ भूषणजी - धन्यवाद. लेकराकडे (आणि लेखाकडे) असंच लक्ष राहूद्या.
  @ मकरंद- धन्यवाद. तुझा लेख परत एकदा वाचला आणि प्रतिसाद दिला. आपण स्वतःला कमी समजतो हीच चूक असावी.
  @ अनिकेत- धन्यवाद.
  @ गुणेश- आभारी आहे. वाचत राहा...
  @ प्रसन्न- धन्यवाद. फोरवर्ड करत राहा..

  ReplyDelete
 6. विक्रम लेख छान वाटला.भारतमाता की जय!

  ReplyDelete
 7. mast lihila ahe... simple ani chan ahe.... ani kharach vichar karayla lavnara ahe...

  ReplyDelete
 8. नमस्कार,
  वाह रे मेरी भारत भूमि के सच्चे सपूत , तुम्हारी जय हों, तुम सदा सर्वदा ऐसी ही प्रेरणा देते रहना , शेवटी नावातच सर्वकाही आहे ,
  इंग्रजांच्या कुटील कारस्थानाने आज भारतीय आपल्या संस्कृती, संस्कार ,शब्द ,संबोधन आणी सादाराचारा पासून दूर-दूर होत चालले आहेत , अस्या वेळी तुझासारख्या भारतीय झाव्या ची देशाला खूब-खूब गरज आहे, थांबूनको चालत राह-चालत राह ------
  स्वामी परमचेतना नंद
  प्रवर्तक, आचार्य: नटराजक्रिया योग
  संस्थापक :- भारतमाता आदर्श गो-ग्राम योजना (संपूर्ण भारत में गो-संस्कृती कि पुनर्स्थापना )

  ReplyDelete
 9. naavatach saara kahi aahe...avadla aplyala...

  ReplyDelete
 10. Chhan ahe re Vikram...avadale he article!

  ReplyDelete
 11. @ किरण जी आणि @ सायली- प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  @ स्वामी श्री जी.- वेळ काढून लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिसाद/आशीर्वाद दिल्याबद्दल आभारी आहे. असेच आशीर्वचन राहू दे.
  @ आशुतोष- धन्यवाद.
  @ अभिजीत - आभारी आहे.

  ReplyDelete
 12. Baarhaspatyua Samhita it says:-

  Himalyam Samarabhya
  Yavadindusarovaram
  Tam Deonirmitam Desham
  "Hindusthanam" Prachakshate

  Meaning: The country which starts from Himalayas and the borders of which reach till the Indian Ocean (Indu Sarovaram), has been created by Gods and its name is Hindusthan. It is Gods own country

  हिंदु स्थान

  ReplyDelete
 13. gr8 Sir!!!
  really awesome!!
  Gavin Wagh.

  ReplyDelete
 14. Vikaran ji chhan aahe, Apan vishay khup chan padhatine mandla aahe.
  Bharat Mata ki Jay!

  ReplyDelete
 15. vikramjee, lekh tar chaangalach aahe. vichar aani kruti yancha mel ghaalanara aahe. ya nantar aanakhihi kaahi apekshit aahe. pratiksha karato.
  veevee

  ReplyDelete
 16. Abhinandan.
  Changala lekh aahe.
  Ya goshti aapan sagalyani aacharanat aanayla havyat.

  ReplyDelete