"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Monday, September 28, 2009

सप्रेम नमस्कार,
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ब्लॉग सुरु केला आहे. सहाजिकच विचार येतो की ब्लॉग लिहिण्यामागचे कारण काय? ही व्यक्तिगत दैनंदिनी नव्हे..कारण ती ह्या 'वैश्विक चव्हाट्यावर" (internet) मांडण्याची काहीच गरज नाही. मग हे लेखन नक्की काय असेल? दैनंदिन आयुष्यात घडत असलेल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, साहित्यिक अशा विविध पैलूंचं आपल्याला जे दर्शन होतं आणि त्याने आपल्या मनात जे तरंग उठतात त्याचं प्रकटीकरण असेल. नियमित सातत्याने लेखन करण्याचा प्रयत्न राहील..मसालेदार लेखनापेक्षा मासलेवाईक आणि खुसखुशीत वाचनासाठी जरूर भेट द्या.. ..ब्लॉगला! प्रतिक्रियांचे स्वागत आहे. ब्लॉग सुरु करण्यामागे ज्या २ मित्रांची प्रेरणा आहे त्या वेधस आणि शतानंद ह्यांचेही आभार.
आपला,
विक्रम.

2 comments:

  1. छान आहे रे....प्रेरणा महत्वाची आहेच...पण सातत्य ही हवेच.

    ReplyDelete
  2. अभिनंदन ! शुभेच्छा!!
    नियमित लिहित रहा असा अनाधिकार उपदेश !!!
    भाषेतील उपहास ,व्यंग तर जोरदारच ...!!!!

    ReplyDelete