Tuesday, September 29, 2009
बंडोबांचे प्रताप!
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु ही निवडणूक लक्षात राहील ती 'बंडोबांच्या' प्रतापामुळे. सर्व पक्षात एवढे बंडखोर निघालेत आणि निवडणुकीला उभे आहेत की महाराष्ट्राच्या वैचारिक वारश्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहावे. चमत्कारिक बाब ही आहे की फुटून आलेल्या बंडखोराला लगेच तिकीट मिळते?!?! ज्या पक्षाला, त्याच्या ध्येयधोरणाला आपण शिव्या मोजत आलो, टीका करत आलो, त्याच्याच तिकीटावर आपण उभे राहायचे? त्याचा प्रचार करायचा? आणि लोकांना आवाहन करायचे की त्या पक्षाला (नव्हे, मला स्वतःला!) मत द्या? सर्वच प्रकार हास्यास्पद आहे आणि त्याहीपेक्षा चिंताजनक आहे. वैचारिक बांधिलकी ही सत्तेच्या आणि फायद्याच्या दावणीला बांधलेल्या या शुभ्र पोषाखातील जनावरांकडून आपण कायदे बनण्याची आशा करायची? बंडखोरांना जमीन दाखवली पाहिजे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment