"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Friday, April 29, 2016

कन्हैय्याचा खेळ...

कोणत्याही समाजव्यवस्थेत जेव्हा एखादा गट, एखादी विचारधारा सर्वात प्रबळ होते तेव्हा त्याचा व्यत्यास म्हणून स्वाभाविकपणेच विरुद्ध विचारधारा, विरोधी नेतृत्व प्रबळ होण्याचा प्रयत्न करते. मग भांडवलशाहीच्या विरोधात उदयाला आलेल्या साम्यवाद असेल किंवा साम्यवादाला टक्कर देणारा धार्मिक उन्माद असेल, अशारीतीने एक गट प्रबल झाला की दूसरा आपलीही हत्यारे परजून येतो, त्यात नेतृत्व उभे राहते, घडत जाते.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन हे आणि असे अन्य नेते हे त्यांना संघटनात्मक प्रशिक्षणाची पार्श्वभूमी असली तरीही त्यावेळच्या विरोधाच्या वातावरणामुळे अधिक झळाळून उठले. त्यांचे नेतृत्व हे काळाच्या कसोटीवर तावून-सुलाखून निघाले. आंदोलनातून नेतृत्व सिद्ध होत गेले. संघर्षातून फळ साध्य होत गेले. अर्थात त्यामागे केवळ विरोध नसून विधायक कार्याची आस, साधनशुचिता, ध्येयनिष्ठा, तळमळ या आणि अशा गुणांचा आग्रह होताच. पण तरीही विरोध असला की अधिक बलवान कोंब बाहेर पडून सशक्त बनत जातो हा निसर्गनियमच आहे.

हार्दिक पटेल, कन्हैय्याकुमार हे या निसर्गक्रमाचेच निकाल आहेत. आऊटकम आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजप यांचा विजय जसा निश्चित होऊ लागला तसे अगदी शिवसेनेने सुद्धा (अर्थात त्यांच्या सवयी आणि संस्कारांप्रमाणे) दामोदरदास मोदी यांचेही नाव जाहीर सभेतून काढायला कमी केले नाही. अफजलखानाच्या फौजा वगैरेही आले. विरोधकांनी मोट बांधायचा प्रयत्न केला. अगदी कसोशीने केला. पण प्रत्यही दिसणारे प्रचंड घोटाळे, विकासकामांबाबतची उदासीनता, बिनकण्याचे नेतृत्व या आणि अशा गोष्टींमुळे विटलेल्या जनतेने बदल घडवून आणला. आणि भाजप अगदी सुरक्षित बहुमताने सत्तेवर आला. नरेंद्र मोदींचे निर्विवाद नेतृत्व शीर्षस्थानी जाऊन बसले आणि विरोधक म्लानमुखाने आपला पराभव स्वीकारता झाले. अगदी त्याचवेळेला हे स्पष्ट होते की विरोध वाढणार.

विरोधकांना सावरायला वेळ हवा होता. नवे हीरोज शोधायला अवकाश हवा होता. गुजरातेत हार्दिक पटेल ला हवा देऊन झाली. त्यावेळी पटेल समाजाने हार्दिक नावाच्या नवतरुणाच्या नेतृत्वाखाली असे आंदोलन छेडले की कुणाला वाटले हा मोदींना आता आव्हान उभे करणार. बिहारमधील नितीशकुमार आणि आघाडीच्या विजयाने पुन्हा धुगधुगी आली. आणि इथेच कन्हैय्याचा जन्म निश्चित होता!

कन्हैय्यामध्ये विशेष काहीच नाही. मोदींच्या झंझावाती लाटेने विरोधकांच्या भूगर्भात जी प्रचंड पोकळी निर्माण झाली ती भरून काढायला कोणीही चालला असता.. राहुल गांधीत तेही झेपण्याचे, झेलण्याचे किमान सामर्थ्य नाही त्यामुळे मग कन्हैय्या सारखे नेतृत्व उभे राहते, मिरवते! आणि त्याला दत्तक घ्यायला सप्तर्षी, केतकर, मानव, नितीश अशा टुकारांची रीघ लागते. समाजवादी विचारसरणीला, चळवळीला घरघर लागून कित्येक वर्षे झाली. झब्बा-लेंगा घालून आणि शबनम लावून फिरणाऱ्या काळ्या दाढ्या पांढऱ्या झाल्या पण म्हणावा तसा तरुणांचा भरणा झाला नाही. युवक क्रांती दल, राष्ट्र सेवा दल वगैरे फसलेले प्रयोग आशा ठेवून बसले. संघटना बांधता आल्या नाहीत. आणि त्याचवेळेला ह्या समाजवादी विचारसरणीने ज्या संघ विचारधारेला विरोध केला ती वाढत गेली. खाकी चड्डी, प्रत्यक्ष शाखेत महिलांना नसलेला प्रवेश, हिंदुत्व, भगवा झेंडा या सर्वावर टीका-टिप्पणी, टिंगल करूनही संघाचे काम भारतभर वाढले. अधिकाधिक तरुण संघधारेत स्वतःहून सामील होत गेले. संघविचार घेऊन चालणाऱ्या अन्याय संस्था विविध क्षेत्रात आदर्श काम उभे करू लागल्या. सेवाकार्यांचे प्रचंड जाले अनेक समाजोपयोगी प्रकल्प संघ कार्यकर्त्यांनी उभे केले. आणि तशातच सार्वत्रिक निवडणुकात संघ विचारधारेला सर्वात जवळ असणारा राजकीय पक्ष भाजप राजकीय व्यासपीठाचे केंद्रस्थान व्यापून राहिला.

ह्यामुळे विरोधाच्या अळंब्या उगवणार हे निश्चित होते. हार्दिक पटेल चे आंदोलन, FTII मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन, जेएनयू मधील विद्यार्थ्यांचे (बेरोजगारांचे?) आंदोलन याला भाजपविरोधी पक्ष, नेते यांजकडून हवा मिळत गेली. प्रस्थापित व्यवस्थेच्या, सरकारच्या विरोधात लढा देण्यात नेहमीच मजा असते, तरुणाईला ते हवेहवेसे असते. विधायक कार्यापेक्षा ते सोपे असते. आणि नेहमीच विघातक कार्य हे तुलनेने सोपे असते. झाड तोडणे सोपे पण वाढवणे कठीण! सुरुंग लावून शाळा उडवून देणे सोपे पण चार विद्यार्थ्यांना एकत्र करून शिकविणे कठीण! त्यामुळेच असे Anti-establishment लढे जगभर होत राहतात आणि त्यातला विचार हा खरोखरच चांगला असेल, अन्याय्यकारक राजवटीच्या विरोधात असेल तर समाज तो विचार उचलून धरत वेळप्रसंगी जुलमी सत्ता उलथवूनही टाकतो.

त्यामुळे हे समजून कन्हैय्या आणि जागोजागच्या आंदोलनांशी व्यक्त होण्याची रणनीती आखली पाहिजे. प्रसारमाध्यमांना कुणीही चालतो. बातम्या देणे याहीपेक्षा बातम्या तयार करण्याकडे हल्ली कल असतो. बातम्या दरवेळी असतातच नाही. किंवा विधायक बातम्या असतातही. पण त्यावर च्यानेल चालत नाही. अशावेळेला घटना फुगवून दाखवणे, हवा देणे, भडकवणे अशी कामे प्रसारमाध्यमे शांतपणे करीत असतात. तेव्हा जेएनयू मधील अफजल गुरूच्या वर्षश्राद्धाच्या वेळेला जमलेली टोळकी ही तद्दन रिकामटेकडी आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे Anti-establishment खाज असलेली आहेत. अन्यथा अन्य संस्थांमध्ये खरंच मान मोडून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे करायला वेळाही नसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच उदाहरण घ्या ना! कशा खडतर अवस्थेतून त्यांनी आपला मार्ग बनवला. असे कित्येक दलित, सवर्ण विद्यार्थी आज विविध शैक्षणिक संस्थानांमध्ये विद्याभ्यास करत आहेत. त्यामुळे पहिल्या भाषणात आपली जी गरिबी कन्हैय्याने गाईली तिच्या अगदी विपरीत वर्तन त्याचे आहे. आणि तो तथाकथित पुरोगामी पक्षांनी उभा केलेला एक कठपुतली बाहुला आहे जो त्याचे बोलविते धनी हलवत राहणार तोपर्यंत हलत राहणार. त्यावर अधिक वेळ घालविण्याची आवश्यकता नाही. अगदी संपूर्ण देशातील तरुणाई अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली होती. आज काय अवस्था आहे? तेव्हा अशा तात्कालिक, धनपूरित, राजकीय हेतूप्रेरित आंदोलनांना विरोध करायची आवश्यकता नाही. ती आपोआपच थंड होणार आहेत कारण ते तोतयांचे बंड आहे.

या सर्वांमध्ये नरेंद्र मोदी काय करत आहेत हेही जाणून घेणे औत्सुक्याचे आहे. नरेंद्र मोदी अक्षरशः अनुल्लेखाने अशांना मारत आहेत. परदेश प्रवास, त्यात भारताला दूरगामी फायदे मिळवून देणारे करार, संबंध दृढ करणे, हिंदू संस्कृतीचा विश्वसंचार कसा होईल हे पाहणे, देशांतर्गत विकासकामे, वीजनिर्मिती, रस्ते बांधणी, पारदर्शी व्यवहार, स्वच्छता, आरोग्य अशा विषयांवर ते काम करत आहेत. त्यांच्याकडे अशा आंदोलनांवर बोलायलाही वेळ नाही. कन्हैय्या “मोदी जी का सूत पकडकर बोलू” असं बोबड्या शैलीत टाळीखेचक म्हणाला तरी मोदी गप्पच! मन की बात मधेही एकदम वेगळेच विषय. म्हणजे थोडक्यात कबड्डीच्या खेळाप्रमाणे आपल्या पाल्यात घुसून ‘असहिष्णुता, असहिष्णुता, आजादी, आजादी’ असे ओरडणाऱ्या, घुमणाऱ्या खेळाडूला मोदींसारखा अनुभवी कप्तान फक्त जोखत आहे. अक्ख्या टीमला मागेच राहायची खूण करत आहे कारण अजून खऱ्या समस्यांची टचलाईन कन्हैय्याने टच केलेलीच नाही. मोदींचे उत्साही पाठीराखे पुढे गेले तर ते बाद होणार आहेत कारण कन्हैय्याला समस्या सोडवण्यात रस नाहीचे. त्याला केवळ गडी बाद करायचे आहेत, जाळ्यात ओढायचे आहेत, चांगल्या कामावरून लक्ष हटवायचे आहे. वात पहायची ती त्याचा दम निघेपर्यंत. तो उत्तेजक विधाने करणार, मोदी मराठवाड्यात आले नाहीत म्हणणार पण विचलित होण्याची काहीच गरज नाही कारण मराठवाड्यातील जनता जाणेल सरकार काय करते आहे. त्याचा दम निघाला की जाईल वापस! हार्दिक आहेच तिथे उभा घाम पुसत. तेव्हा घटनेने दिलेल्या अधिकारात तो सभा घेत असेल, भाषणे ठोकत असेल तर करू द्या त्याला. भाषणांना गर्दी होऊनही पुढे काय होते हे आपण जाणत नाही काय! त्याला भारतभर फिरू द्या. त्याच्यामागच्या शक्तींना आसुरी आनंद मिळू द्या. न्यायालयाने त्याला संपूर्ण निर्दोष ठरविलेले नाही. तो निर्णय योग्यवेळी होईलच तूर्तास नाटकाचे खेळ पाहत राहणे, आज मुंबई, उद्या पुणे, परवा अमरावती.. निवडणुकात विशेष खेळ..काही जागा राखीव!

24 comments:

  1. Vikramji Chaan aani upyogi vichar. Kanhaiya sarkhana jasta mahatav na deta vidhyai karya kart rahne. Uttam

    ReplyDelete
  2. धन्यवाद राजीवकुमार जी

    ReplyDelete
  3. sakhol chintan karun lihalela yuva lekh ... vishleshan aflatun.. lihat raha

    ReplyDelete
  4. कन्हैय्या हा फक्त एक प्यादा आहे. खरी क्रांती म्हजे काय हे बघायचे असेल तर बाबा राम देवांना बघा. पुढील दहा वर्षात गौ आधारित क्रांती ते करून दाखवतील. जे गांधीना जमले नाही, ते स्वदेशीचे अभियान बिना सरकारी अनुदानाचे करून दाखवितात आहे.

    ReplyDelete
  5. विक्रम लेख अतिशय सुंदर आणि पूर्णपणे अभ्यास करून लिहिला आहे या बद्दल खरेच तुझे खूप अभिनंदन. परंतु एक गोष्ट नक्की कि मोदी यांच्या कडे बघून अनेक लोकांनी त्यांना २०१४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळून दिले आणि अनेक राज्यात BJP ची सत्ता पण आली परंतु म्हणावे तसे फार काही चांगले मोदी आणि त्यांची team (केंद्र आणि राज्यातली ) करू शकली नाही पण त्यांचे भाषणेच फार मोठी असतात. आता हेच बघा black money, अच्छे दिन, भारत पाकिस्तान संबंध (आधी हे मोदी युद्धाच्या गोष्टी करत होते पण ते आता कॉंग्रेस च्या line मध्ये आले आहेत) शेती विषयक घोषणा, भ्रष्टाचार, सरकारी कारभार या मध्ये सुतराम सुद्धा बदल झालेला नाही आणि सर्व काही आधी सारखेच चालू आहे मग आम्ही या BJP वाल्यांना मत देऊन चूकच केली असे म्हणावे लागेल. कन्हैय्या येतो आणि भारत विरोधी घोषणा देतो परंतु सरकार एका शब्दाने काही प्रतिक्रिया देत नाही, तसेच MIM चे ओवैसी काही बोलतात तरी हे गप्पच, तसेच पाकिस्तान येतो आणि काही बोलून जातो तसेच BJP चे आमदार आणि खासदार यांचा भ्रष्टाचार व्यास्थित चालू आहे तरी पण मोदी शांत. कन्हैय्या ला फार महत्व देणे योग्य नाही पण हे सरकार लोकांसाठी काही काम नाही केले तर २०१९ मध्ये यांना मोठ्या सुट्टीसाठी जावे लागेल हे नक्की. मग परत आहेच या देशाचा अधोगतीच्या दिशेने प्रवास.

    ReplyDelete
    Replies
    1. अमितजी आपण अचूक निदान केले आहे, परंतु कोणताही राजकीय पक्ष या भारत भूमीला चांगले दिवस देतील यात सुतराम शक्यता नाही. महाराजांनी निवडणूक लढवून हिंदवी स्वराज्य स्थापन नाही केले किव्वा पेशव्यांनी अटकच्या पलीकडे भगवा निवडणूक लढवून नाही फडकवला त्याचप्रमाणे धर्मक्रांती करून हिंदू राष्ट्र स्थापन करणे हाच सर्व समस्यांवर एकमात्र उपाय आहे. यासाठी आपण सज्ज होवुया. हर हर महादेव…

      Delete
    2. "शेती विषयक घोषणा, भ्रष्टाचार, सरकारी कारभार ह्या मध्ये सुतराम सुद्धा बदल झालेला नाही" - हेअमितजींचे विधान अंमळ धाडसी म्हणावे लागेल.

      Delete
  6. अप्रतिम ! अभ्यास पूर्ण लेखन !!

    ReplyDelete
  7. अप्रतिम ! अभ्यास पूर्ण लेखन !!

    ReplyDelete
  8. योग्य तेच लिहिले आहे.

    ReplyDelete
  9. योग्य तेच लिहिले आहे.

    ReplyDelete
  10. विक्रम, सुंदर analysis. मला कुमार केतकर,डॅा. कुमार सप्तर्षि यांची किव कराविशी वाटते. वयाप्रमाणे माणसाची बुद्धि प्रगल्भ होते असे म्हणतात. पण यांचे म्हणजे साठी बुद्धि नाठी असे झाले आहे आणि मदतीला लोकशाहीचा चौथा स्तंभ (?) आहेच.--------नंदन पेंडसे

    ReplyDelete
  11. Sir
    Khupach Chan & mojkya shabdat uttam lekh aahe!
    - Sukanya

    ReplyDelete
  12. लेख अतिशय सुंदर

    ReplyDelete
  13. संघ विचारधारेने कॉंग्रेस विचारधारेला केलेला विरोध हा विचारांच्या पातळीवरचा होता व आहे. आज कॉंग्रेस विचारधारेकडून केला जाणारा व पुरस्कार वापसी, दादरी प्रकरण, हार्दिक पटेल, कन्हैया कुमार, "गांधी आमचे व सावरकर तुमचे", ई. च्या माध्यमातून प्रकट होणारा विरोध हा विचारांच्या पातळीवर केलेला नाही. तो केवळ प्रचाराच्या पातळीवरचा आहे. कारण विचाराच्या पातळीवर काही काम करायचे असल्यास त्यासाठी संयम लागतो, अभ्यास करावा लागतो, आपल्या विचारधारेवर पराकोटीची श्रद्धा असावी लागते, आपल्या नेत्यांवर परिपूर्ण विश्वास असावा लागतो; आणि ह्या सर्व गोष्टींचा पूर्ण अभाव आज कॉंग्रेस विचारधारेचे पाईक म्हणवणाऱ्या मंडळींच्यात दिसतो आहे. विचार स्वत: करावा लागतो, तर प्रचार करणारे पैसे फेकून विकत घेता येतात. आणि पैसे तर ह्या कॉंग्रेसवाल्यांनी गेल्या ६५ वर्षात भरपूर कमावलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात असा प्रचारकी विरोध भरपूर अनुभवायला मिळेल, ह्याबद्दल खात्री वाटते. ह्या प्रचारकी विरोधातील फोलपणा सिद्ध करायला २०१९ च्या निवडणुकीआधीचा "प्रचार" पुरेसा ठरेल. पण तोपर्यंत आपण सर्वांनी विरोधकांच्या ह्या सापळ्यात अडकू नये. कॉंग्रेसींना मनसोक्त शडडू ठोकू द्यावेत.

    ReplyDelete
    Replies
    1. विनय, मस्त. ------नंदन पेंडसे

      Delete
  14. हाथी चले बज़ार कुत्ते भुके हजार इस कहावत को सार्थक कर रहे है।

    ReplyDelete
  15. हाथी चले बज़ार कुत्ते भुके हजार इस कहावत को सार्थक कर रहे है।

    ReplyDelete
  16. Because of half knowledge do not kiss camel hipps

    ReplyDelete