"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Saturday, August 4, 2012

वाघ्या...




रायगडावर शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या इमानी कुत्र्याची समाधी/स्मारक आहे. हा वाघ्या शिवरायांचा इमानी कुत्रा तर होताच परंतु शिवराय गेल्यानंतर या वाघ्याने त्यांच्या चितेत उडी घेऊन आत्मसमर्पण केले असे म्हणतात. ते शिवरायांच्या समाधीसमोर चे स्मारक काही समाजकंटकांनी उखडून टाकल्याचे वाचनात आले. हे समाजकंटक ‘संभाजी ब्रिगेड’ (संब्रि) या समाजविघातक संघटनेशी सबंधित असल्याचेही वृत्त आहे. लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळाही यांनीच कापून काढला  होता. तेव्हा सध्या या संब्रि लोकांना फारच सराव झालेला आहे. तुमच्याही येथील काही जुनेपुराणे नासधूस टाकायचे असेल तर यांना अवश्य बोलवा.

गंमत ही आहे की, अशाप्रकारे राष्ट्रीयतेचे परिचायक असणारे पुतळे अथवा स्मारके काढून टाकून इतिहास बदलता आला असता तर बघायलाच नको होते. गुलामगिरीचे आणि अन्यायाचे चिन्ह मिटवायलाच हवे याबद्दल दुमत नाही पण आपली शक्ती अशाप्रकारे जर प्रेरणादायी इतिहास बदलायला कोणी लावणार असेल तर खचितच ते निंदनीय आहे.


मजेचा भाग असा की, एका निर्जीव कुत्र्याचे ब्रॉन्झ मधील शिल्प उखडायला कितीजण लागावेत? वृत्तानुसार पोलिसांनी आत्तापर्यंत संब्रि च्या ७३ जणांना पकडले आहे ज्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आणि अजून २०० जण फरार/बेपत्ता आहेत. म्हणजे जवळपास २७५ जण लागले एका निर्जीव कुत्र्याची समाधी उखडायला? चांगलाच घामटा काढलास की रे वाघ्या! वाचूनच दया येते, की बिचारे २७५ भ्रमित तरुण आपला वेळ आणि आपली शक्ती आपल्याच इतिहासाची मानचिन्हे मिटवायला लावतात.

अरे तुम्हाला कार्यक्रम हवाच होता ना काही, तर अशा कित्येक गोष्टी आणि स्मारके आजही आपल्या उरावर बसून आहेत जी जेवढ्या लवकर नष्ट होतील तेवढे बरे, त्यासाठी वेळ घालायला हवा होता. मजहबाच्या नावावर राष्ट्रविघातक शिक्षण मिळणाऱ्या काही शिक्षणसंस्था(?) सरकारी अनुदान घेऊनच चालत आहेत. त्याला विरोध करा. तिथे जाऊन विरोध प्रदर्शन करा. आहे खरी खुमखुमी, तर आसामला जा आणि तुमच्या हिंदू बांधवांचे रक्षण करा. जम्मू-काश्मीरमध्ये जा आणि श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा. एवढे लांब कशाला महाराष्ट्रातल्या खेडोपाडी हिंदू समाजातल्याच ठराविक वर्गाला हिणवले जाते आणि सार्वजनिक ठिकाणी पाणीही दिले जात नाही, तिथे तुमची शक्ती दाखवा. ‘लव्ह जिहाद’ च्या अंतर्गत तुमच्या आमच्या बहिणींना आज भयानक रीतीने जाळ्यात ओढून, बाटवून, नासवून टाकण्याचे मोठे कारस्थान पुणे, नागपूर, जालना अशा ठिकाणांहून चालू आहे. तिथे वापरा शक्ती. नुसते शिवरायांच्या नावाचे तुणतुणे वाजवून काहीच व्हायचे नाही.

12 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. सही ,विक्रम अगदी खरे आहे ....अरे असे पुतळे हलवून इतिहास बदलता येत नाही ..पण काही लोकांना ते उमजत नाही ..

    ReplyDelete
  3. ज्यांच्या बुद्धीत आणि विचारात कधीच वाढ झाली नाही त्यांना हें असं फुकट आणि बे मतलब चा काम सुजता ....ह्यांचे नेते म्हणे इतिहासकार आणि सत्यशोधक .....ज्याला साध उत्तर पण कुठल्या देता येत नाही अश्या हाताश लोकांना असे फालतू धंदे करायला लागतात........................दुसरा म्हणजे विक्रम ह्यांना तू हिंदूंना वाचवायला साग्तोय्स पण हें 'बाटगे' आहेत हें काय काम करणार.....जे शिवरायांच्या धर्माचे नाही राहिले ते शिवरायांचा काम काय करणार पुढे??

    ReplyDelete
  4. सर्वप्रथम प्रताप गडावरील अफजल खानाला हकालावा

    ReplyDelete
  5. रायगड जिल्ह्याचे तडफदार जिल्हाधिकारी श्री होनाजी किशनराव जावळे यांनी झपाट्याने कार्यवाही करून वाघ्या चा पुतळा परत बसवला आहे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दरीत फेकून दिलेला रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काल पुन्हा त्याच ठिकाणी सन्मानपूर्वक बसवण्यात आला.
    रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळील हा पुतळा पोलिसांनी बुधवारी दरीतून श
    ोधून जप्त केला होता. त्यानंतर काल सकाळी जिल्हाधिकारी एच.के. जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, पोलीस उपअधीक्षक अश्‍विनी सानप, प्रांताधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार प्रियांका कांबळे आदी अधिकार्‍यांसह शिवभक्तांनी हा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी बसवला. त्यानंतर कोकण परिक्षेत्रचे पोलीस महासंचालक सुखबिंदर सिंह यांनीही किल्ल्याची पाहणी केली.

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. Vikram ji, they are not Hindu but cousin of Muslims (not Indian Muslims but of those support Jehad against India). I have read one or two articles in some magazine (name not remembered) published by this Brigade where they wrote "We do'nt support Laden but in such scenario-----". They were not supporting Laden but only subject to the condition that Brahmins have made condition in India against Muslims for the revenge. So presumably no fault of laden in waging war against India. Ha! Ha! Ha! In fact, ATS should try to find out the possible link between Zunaid Ansari and SB.

    ReplyDelete
  8. Vikram
    Was Vaghya a bramhin dog? I do not understand what the hatred SB has got for a Dog. Any way one can not expect any thing better from these people who are doing all this with political agenda and political backing.

    ReplyDelete
  9. संब्रि चा विरोध "वाघ्या"ला नसावा. त्यांचा विरोध वाघ्याच्या गुणांना असावा. वाघ्या स्वामीनिष्ठ व इमानी होता. म्हणून संब्रि चा त्याच्या पुतळ्याला विरोध. जातीविद्वेषाच्या भावनेने आंधळे झाल्यामुळे संब्रि ला आपल्या धर्माशी इमान राखणे दुय्यम वाटते. मागे एकदा म्हटल्याप्रमाणे संब्रि चे एक कुजके डबके झाले आहे. गेल्या आठवड्यात त्या डबक्यातून काही बुडबुडे वर आले इतकेच. संब्रि बद्दल अनावश्यक चर्चा करूच नये. त्यांना अनुल्लेखाने विसरणेच योग्य.

    ReplyDelete
  10. Vikramji, eka changlya vishayala yogya uttar deun sarvana tyavar vichar karayala lawalat yabaddal abhinandan!!! SB tyache karyakarte(?) yanchyabaddal n bolalelech bare. Shivaji Maharajani je kele nahi, mhnajae jaat ani dharm dwesh, te aaj he tyanche naav gheun karat aahet yapeksha Maharajanchya jeevala kay jast vedana hot asatil? Pan yancha mendu gudaghyatach asalyamule udya "GAGABHATT" prakaranala aitihasik aadhar nahi v he brahmananche karsthan aahe tyamule Maharajanchya Rajyabhishekamadhye konihi asa brahman vaidik mantra mhanayala navhata ase yani jahir kele tar aashary vatayala nako.

    ReplyDelete
  11. My comment is just published as "unknown" but my name is Nandan Pendse

    ReplyDelete
  12. मी एकदम सहमत आहे विक्रम..तुझ्या मताशी..! नाव काय तर म्हणे..."संभाजी ब्रिगेड"...आणी कृती मात्र "अफजलखाना प्रमाणे"....संभाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी प्राणांचे बलिदान दिले..आणि हे मात्र "त्यांचे" नाव घेऊन समाज विघातक कृत्ये करतात...."वाघ्या कुत्र्याचा" तो प्रसंग खरा किंवा खोटा याचे विश्लेषण करत बसण्यापेक्षा...."त्या कुत्र्याच्या " "इमानदारीचा" कुणी विचारच करत नाहीत..हेच तुमचे आपल्या धर्माशी, आपल्या मातीशी इमान का? "परिवर्तन" करण्यासाठी देशात आज अनेक संधी उपलब्ध आहेत...जिथे तुमच्या या "पराक्रमाचा (??)" जास्त उपयोग होऊ शकतो...हि गोष्ट "या" लोकांच्या कुणी तरी ध्यानात आणून दिली पाहिजे...

    ReplyDelete