हे सुरांनो...
जीवनाच्या अंतकाली हे सुरांनो साथ
द्या,
चाललो मी दूर आता, एकदा मज हात द्या |
रंगलेल्या मैफिली अन् भंगलेल्या बैठकी,
जाहलेले सोहळे अन् छेडलेल्या बंदिशी |
श्रीफळे अन् शालजोड्या रास त्यांची ती
पहा,
मी जहालो मात्र साधन, त्या सुरांचा मान हा |
भारलेल्या त्या स्वरांनी मैफिली या
गच्च भरती,
सूर ते विरता उरे जी मोजकी गर्दी
अनोखी |
संपले ते सर्व आता आसनेही रिक्त झाली,
दाटला अंधार सारा आळवू द्या भैरवी |
गीत माझे ऐकणारे कोणी येथे आज नाही,
गीतसुद्धा शुष्क आहे, पूर्वीचा तो साज नाही |
सूर मजला स्पष्ट दिसतो पोहोचणे पण
शक्य नाही,
कंप हा कंठास माझ्या भिवविते वार्धक्य
राही |
तरीही पुन्हा एकदा मज पैलतीरी पार
नेणे,
शिकविले ना केधवांही जीवनी या हार
घेणे |
संपलेल्या या दिव्याला, आज पुन्हा वात द्या,
जीवनाच्या अंतकाली, हे सुरांनो साथ द्या |
---विक्रम
---विक्रम
Superb ..
ReplyDeletedhanyavad Vishal.
Delete